Thursday, 10 October 2019

Cloning .......Dolly sheep 🐑

*** डॉलीची गोष्ट*

‘क्लोनिंग’ म्हणजे सजीवांच्या हुबेहूब प्रती तयार करण्याचे तंत्र. १९९७ साली स्कॉटलंडमधील रोझलीन इन्स्टिटय़ूटच्या इयान विल्मुट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या क्लोनिंगच्या यशस्वी प्रयोगावरील शोधनिबंध ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्याअगोदर दहा वर्षे या संशोधकांचे क्लोनिंगद्वारे मेंढीच्या निर्मितीचे प्रयत्न चालू होते. या काळात या संशोधकांनी मेंढीची प्रत तयार करण्याचे सुमारे पावणे तीनशे प्रयत्न केले.

या प्रयोगासाठी ‘फिनिश डॉर्सेट’ या जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीचा वापर केला गेला. प्रथम त्यांनी या मेंढीच्या आचळातील पेशी काढून घेतल्या. त्यानंतर ‘स्कॉटिश ब्लॅकफेस’ या काळे तोंड असणाऱ्या जातीच्या मेंढीचे फलन न झालेले बीजांड घेतले. या बीजांडाचे केंद्रक काढून टाकण्यात आले. या दोहोंचे फलन घडवून आणण्यासाठी पेशी आणि बीजांड एकमेकांच्या जवळ आणण्यात आले. विद्युत स्पंदाद्वारे हे बीजांड पेशीच्या पटलातून आत ढकलण्यात आले. यामुळे पेशी आणि बीजांड एकत्र येऊन त्यांचे फलन घडून आले. बीजांड आणि पेशीच्या फलनातून तयार झालेल्या पेशीची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही, याचे सहा-सात दिवस प्रयोगशाळेतच निरीक्षण केले गेले. त्यानंतर ही फलित पेशी दुसऱ्या एका स्कॉटिश ब्लॅकफेस जातीच्या पाहुण्या मेंढीच्या गर्भाशयात प्रस्थापित केली गेली. गर्भारपणाचा सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यावर या ब्लॅकफेस मेंढीने, जिच्या आचळाच्या पेशी वापरल्या होत्या त्या फिनिश डॉर्सेट जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीला जन्म दिला. तिचेच नाव ‘डॉली’! डॉली ही मूळ फिनिश डॉर्सेट मेंढीची हुबेहूब प्रत होती. ही डॉली एकूण पावणेसात वर्षे जगली. फुप्फुसाचा विकार व तीव्र संधिवात जडल्यामुळे डॉलीला मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्लोनिंगमध्ये अपत्याच्या पालकाच्या केंद्रकातील डीएनएचा क्रम राखला जात असल्याने, जन्माला येणाऱ्या अपत्यात आणि त्याच्या पालकात अतिशय साम्य असते. डॉलीच्या क्लोनिंगच्या अगोदर, दोन्ही पेशी भ्रूणस्थितीतील घेऊन त्यांचे क्लोनिंग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात केंद्रक काढून टाकलेल्या बीजांडाशी एखाद्या भ्रूणाच्या केंद्रकसहित पेशीचा किंवा फक्त त्यातील केंद्रकाचा संयोग घडवून आणला जातो. अशी उदाहरणे १९५०-६० च्या दशकांपासून आढळतात. परंतु क्लोनिंगच्या तंत्रात स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या मीलनातून गर्भधारणा केली जात नाही. क्लोनिंगच्या तंत्राचे वेगळेपण हेच आहे!

Endocrine glands

📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙
***************************
आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.
शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.
अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.
या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.
  थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ?
उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.
मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.
स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.
लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.
वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

Wednesday, 9 October 2019

Some common MCQ on Human body.

1) Red color of carrot and tomato is due to:
      ✍ anthocyanin
2) P.H of human blood is
      ✍ 7.0
3) Largest organ inside human body is:
      ✍ Liver
4) Largest organ of human body is:
      ✍ skin
5) What is celluloses:
      ✍ Carbohydrates
6) The smallest of all human cells are:
      ✍ RBCs
7) No of bones in human body is:
      ✍ 206
8) Smallest unit of life is:
      ✍ Cell
9) Red blood cells have no:
      ✍ Nucleus
10) White blood cells are also known as:
       ✍ Leucocytes
11) Red blood cells are also known as:
       ✍ Erythrocytes
12) Life appeared on earth about:
       ✍ 3 billion years ago
13) When earth was formed its atomsphere were composed of:
       ✍ Water vapour, ammonia and Methane
14) Biochemical organ of life is discovered by:
       ✍ Oparin
15) Group of cells are termed as:
       ✍ Tissue
16) Kingdom fungi are known as:
       ✍ Decomposer
17) Which cell organelles not participate in cell division:
       ✍ Ribosomes
18) Longest bone in human body is:
       ✍ Femur
19) Shortest bone in human body is:
       ✍ Stapes
20) Most important food is derived from:
       ✍ Fruits
21) After human most intelligent mammal is:
       ✍ Dolphins
22) Prokaryot  doesn't possess:
       ✍ Nucleus
23) Eukaryot has a:
       ✍ Nucleus
24) In bacterial cell..............is not found:
       ✍ Golgi apparatus
25) ................Is found in plant cell while in animal cell it is absent.
       ✍ Cell wall
26) Jelly like structure found inside the cell are reffered as.
       ✍ Cytoplasm
27) Which part of cell makes proteins:
       ✍ Ribosomes
28) Most important stimulant in tea leaves:
       ✍ Caffeine
29) First cloned sheep was discovered by:
       ✍ Dolly
30) Which part of cells process packages and export proteins.
       ✍ Golgi apparatus
31) Colored part of eye is called
      ✍ Iris
32) Tubes that carry away blood from heart is called:
      ✍ Arteries
33) Tiny bumps on tongue is called is:
       ✍  Taste buds
34) Black part of eye is termed as:
       ✍ Pupil
35) .............Tubes carry blood towards heart
       ✍ Veins
36)  Chromosomes consists of:
      ✍ DNA and Proteins
37) Poison of honey bee is:
      ✍ Acidic
38) Apple is rich in:
      ✍ Iron
39) Longest nerve is
      ✍ Sciatic
40) Evaporation of sweat is:
      ✍ Endothermic reaction
41) Palak leaves are rich in:
       ✍ Iron
42) Loss of memory is caused by destruction of:
       ✍ Cerebrum
43) Average pulse rate is:
       ✍ 72-80
44) Milk sugar is:
       ✍ Lactose
45) No of cells in human body is:
       ✍ 75 trillion
46) Plants roots absorb water through hair roots by process of:
       ✍ Osmosis
47) Wisdom teeth normally grow between age of:
       ✍ 17-26 years
48) Saliva helps in digestion of:
       ✍ Starch
49) Average weight of female brains are:
        ✍ 310 grams
50) Function of homoglobin is to transport:
        ✍ Oxygen

Thursday, 3 October 2019

मेंडेल

💐 मेंडेलची आनुवंशिकता*
ग्रेगॉर मेंडेल
आजच्या आनुवंशिकतेवरील संशोधनाचा पाया ऑस्ट्रियाच्या ग्रेगॉर मेंडेल याने १८६० च्या दशकात घातला. आनुवंशिक गुण हे मातापित्यांच्या गुणांचे मिश्रण असल्याचा पूर्वी समज होता. परंतु मेंडेलने संततीतील गुण हे मिश्रण नसून, एखादा गुण पुढील पिढय़ांत स्वतंत्रपणे वाहून नेला जातो हे सिद्ध केले. मेंडेलचा सिद्धांत त्याने केलेल्या वाटाण्याच्या रोपांवरील अभ्यासावर आधारला आहे. मेंडेलने वाटाण्याच्या रोपांचे परागीभवन घडवून आणून मूळ रोपांचे गुण पुढील पिढय़ांत कसे उतरतात, याचे निरीक्षण केले. या प्रयोगांसाठी मेंडलने बियांचे रंग (हिरवा-पिवळा), त्यांच्या फुलांचे रंग (पांढरा-जांभळा), खोडांची उंची (उंच-खुजे) अशा वेगवेगळ्या गुणधर्मावर आधारलेल्या वाटाण्याच्या जोडय़ा वापरल्या.

मेंडेलने आपल्या एका प्रयोगात शुद्ध स्वरूपातील हिरव्या व पिवळ्या वाटाण्यांच्या बिया घेतल्या. त्यांच्यात त्याने स्वयं-परागीभवन केले असता, या बियांची रोपे ही सतत एकाच विशिष्ट रंगाचे वाटाणे निर्माण करत होती. म्हणजे यात जातीचा अस्सलपणा टिकवून ठेवण्याचा गुणधर्म होता. दुसऱ्या प्रयोगात, या दोन प्रकारच्या बियांतून निर्माण झालेल्या रोपांवरील फुलांचे त्याने एकमेकांत पर-परागीभवन घडवून आणले. यातून निर्माण झालेले वाटाणे हे सर्व पिवळ्या रंगाचे होते. त्यानंतर या पिढीतील वाटाण्यांच्या स्वयं-परागीभवनातून निर्माण झालेल्या पुढच्या पिढीत मात्र दोन्ही प्रकारच्या वाटाण्यांची रोपे निर्माण झाली होती. यांतील पिवळ्या रंगाच्या वाटाण्यांची रोपे आणि हिरव्या रंगाच्या वाटाण्यांची रोपे, यांचे गुणोत्तर तिनास एक असे होते. या रोपांवरील वाटाण्यांपासून निर्माण झालेल्या पुढील पिढय़ांतही पिवळ्या व हिरव्या वाटाण्यांच्या रोपांचे प्रमाण तिनास एक असेच राखले गेले होते. परंतु कोठेही दोन्ही रंगांचे मिश्रण मात्र झाले नाही.

या निष्कर्षांवरून मेंडेलने मांडलेल्या सिद्धांतानुसार, प्रत्येक सजीवाची आनुवंशिकता स्वतंत्रपणे काम करते. प्रत्येक सजीवाकडे त्याच्या गुणानुरूप घटकांची जोडी असते. या घटकांपैकी जो घटक प्रभावी असेल त्या घटकाचे पुढील पिढय़ांत प्राबल्य राहते. या प्रयोगातील रोपांत पिवळ्या रंगाचा घटक हा प्रभावी होता. म्हणून नंतरच्या पिढय़ांत पिवळ्या रंगाचे प्राबल्य कायम राहिले. जनुकाची संकल्पना जन्माला येण्याअगोदरच केलेल्या या संशोधनात मेंडेलने आनुवंशिकतेचे महत्त्व ओळखले होते. मात्र मेंडेलच्या या पायाभूत संशोधनाला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या मृत्यूनंतर सोळा वर्षांनी – १९०० साली!

Tuesday, 3 September 2019

मानवी रोग

📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 📙
*****************************
कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते.
अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे  शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते.
शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो.
मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात. हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी.

हृदयविकार


  *💥हृदयविकाराचे मर्म💥*

                  रक्तदाबाशी घनिष्ठ संबंध असणारे कोलेस्टेरॉल हे जैवरसायन म्हणजे पेशीपटलाचा एक आवश्यक घटक आहे. कोलेस्टेरॉलची उत्पत्ती यकृतात होते. मात्र शरीराला आवश्यक असणारे हे संप्रेरक शरीरात अनेक ठिकाणी अनावश्यक प्रमाणात गोळा होऊन व्याधींना कारणीभूतही ठरते. १७५८ साली फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ फ्रँकाय पुलेटिए याने पित्ताशयातील विकारांवर संशोधन करताना पित्ताशयातील काही अज्ञात स्वरूपाचे खडे वेगळे केले. यानंतर १८१५ साली मायकेल-युजिन शेव्हरूल या फ्रेंच वैद्यकतज्ज्ञाने पित्ताशयातील या खडय़ांपासून स्फटिकरूपातील, कालांतराने ‘कोलेस्टेरॉल’ या नावे ओळखला गेलेला पदार्थ वेगळा केला. परंतु या कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी असलेला संबंध स्पष्ट होण्यास आणखी एक शतक जावे लागले.मानवी शरीरातील रोहिण्यांत जाडसर पदार्थ जमा होत असल्याचे जर्मन वैद्यकतज्ज्ञांना एकोणिसाव्या शतकातच लक्षात आले होते. १९१० साली जर्मन रसायनतज्ज्ञ अ‍ॅडॉल्फ विंडॉस याने रक्तदाबाची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या रोहिणीच्या आत जमा झालेल्या जाडसर थराचे पृथ:करण केले. त्या थरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे सर्वसाधारण रोहिण्यांतील थरात असणाऱ्या कोलेस्टेरॉलपेक्षा २५ पट अधिक असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर १९१३ साली निकोलाय अनित्शोकॉव या रशियन वैद्यकतज्ज्ञाने सशावर केलेल्या प्रयोगात, सशाला आहारातून शुद्ध कोलेस्टेरॉल दिले. यामुळे सशात रक्तदाबाची लक्षणे निर्माण झाली. यावरून आहारातून येणारे कोलेस्टेरॉल हे, हा थर जमा होण्यामागचे कारण असल्याची शक्यता दिसून आली. सन १९५० मध्ये जर्मनीच्या कोनराड ब्लॉख याने अ‍ॅसिटेटपासून होणाऱ्या कोलेस्टेरॉलच्या रेणूंच्या निर्मितीमागील गुंतागुंतीची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेत अवघे दोन कार्बनचे अणू असणाऱ्या अ‍ॅसिटेटचे बहुवारिकीकरण (पॉलिमरायझेशन) होऊन त्यापासून कार्बनचे २७ अणू असणाऱ्या कोलेस्टेरॉलचे रेणू कसे तयार होतात, हे समजू शकले. यानंतर १९५५ सालच्या आपल्या संशोधनात, अमेरिकेच्या जॉन गॉफमॅन याने, त्या वेळी नुकत्याच उपलब्ध झालेल्या, अतिशय उच्च वेगाने स्वत:भोवती फिरणाऱ्या अपकेंद्री (सेंट्रिफ्यूज) यंत्राचा वापर केला. या यंत्राद्वारे त्याने कोलेस्टेरॉलमधील वेगवेगळी घनता असलेले दोन घटक शोधून काढले. गॉफमॅनच्या संशोधनात, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णांतील रक्तात कमी घनता असलेल्या कोलेस्टेरॉलसंलग्न मेदप्रथिनांचे प्रमाण वाढले असल्याचे व अधिक घनता असलेल्या कोलेस्टेरॉलसंलग्न मेदप्रथिनांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. गॉफमॅनच्या या संशोधनाने कोलेस्टेरॉलवरील प्रगत संशोधनाला मोठी गती मिळाली.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...