Thursday, 20 February 2020

DNA

*२१ फेब्रुवारी १९५३*

*फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.*
डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल (इंग्लिश: Deoxyribonucleic acid, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड ;) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदू मध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्‍लिइक[मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या म्हणजेच डीएनए होय. डीएनए मध्ये जीवा बद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचने मध्ये स्वरूप ठरव्यात हे महत्त्वाचे घटक असतात. जसे की मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्ती ओळख करता येते करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेंसिक) याचा उपयोग होतो.प्रत्येक व्यक्तिच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए आढळते. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रीच माईसचर याने एका वापरलेल्या सर्जिकल बँडेजमधील पू व रक्त यामधून एक सुक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्त्व असल्याने त्याला 'न्युक्लिईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लिईन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले. डीएनए मध्ये कोडींग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्यक्तिंचा वेगळा असतो. व्यक्तिचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तिची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात. डीएनए टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य, इत्यादि नमुन्यातून डीएनए वेगळे केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनच्या सहाय्याने घेतलेल्या डीएनए नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते. व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसीनने हे तुकडे वेगळे करून त्यांचे सदर्न ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेंब्रेनवर स्थलांतरण करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओअ‍ॅक्टिव्ह रसायनाने लेबलिंग करण्यात येते. मेंब्रेनवर एक्स रे फिल्म ठेवण्यात येते. आणि मग रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रुपात दिसू लागतात. अशा प्रकारे डीएनए ठसे मिळवले जातात.आणि मग ते ठसे इतर ठशांबरोबर जुळतात की नाही ते पाहिले जाते व निष्कर्ष काढले जातात. एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत. सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते.उदाहरणार्थ -- १) अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात. २) डीएनए चाचणीचा वापर करून बीबियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मश्रुमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो. ३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तिचे, प्राण्याचे, वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते. ४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व पितृत्त्व सिद्ध करता येते.


Algae /शैवाल

📙 *शैवाल/शेवाळ (अल्गी)* 📙 
******************************

सर्वात साधा वनस्पतीचा प्रकार म्हणजे शैवाल. मुख्यत: अपुष्प व बीजहीन या प्रकारात ही वनस्पती मोडते. गोड्या वा खाऱ्या पाण्यात वाढणारी ही वनस्पती आहे. जेथे मुबलक पाणी आहे, तेथे शैवाल असणारच. एखादा खडबडीत आधार शोधून या वनस्पतीची वाढ सुरू होते. गोड्या पाण्यातील शैवालाचा रंग हिरवा असतो, तर समुद्र शेवाल लालसर तपकिरी रंगावर असते.

 हरितद्रव्याचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ही वनस्पती स्वतःचे अन्न बनवते. त्यावरच तिची वाढ व पोषण अवलंबून असल्याने पाण्यात जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथेवरच शेवाळाची वाढ झालेली दिसून येते. अतिसूक्ष्म सागरी शेवाळाच्या खाद्यावर छोटे मासे वाढतात. प्लांक्टन वनस्पती या नावाने ती ओळखली जाते.

 साचलेल्या गोड्या पाण्यावर अनेकदा या वनस्पतीचा थर साचलेला आढळून येतो. एकात एक धागे व तंतू गुंतत जाऊन हा सलग थर एखादा गालीचा पसरावा, तसा पसरलेला असतो. विविध तापमानाच्या पाण्यात तगून राहणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येईल. जवळपास शून्याची रेंगाळणारे बर्फाळ पाणी असो किंवा एखाद्या उष्ण झर्‍यामुळे गरम झालेले पाणी असो, दोन्हींमध्ये शैवाल असणारच. एवढेच काय, पण एखादा डोंगरकड्यावरून वाहणारा प्रवाह असेल, तर त्याच्या संपूर्ण उतारावरही ही वनस्पती आढळते.

 साऱ्या जगातील विविध समुद्रांतील समुद्रशैवालाचे ७००० विविध प्रकार आजवर सापडले आहेत. पाण्याचे व शैवालाचे अतूट नाते आहे, असे समजावयास हरकत नाही.

 निळे व हरित शैवाल पृथ्वीतलावरील अगदी पुरातन स्वरूपाचे सजीव अवशेष मानले जातात. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सापडलेल्या अश्मीभूत अवशेषात शैवाल सापडले असून त्याआधीचे सजीव आज तरी ज्ञात नाहीत.

पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळाकडे वळले तर पाण्यात सजीवांची सुरुवात झाली. त्यांतील पाण्याबाहेर पडलेली पहिली वनस्पती म्हणजे शेवाळे. पाण्यातील शेवाळाची एक जात म्हणजे प्लांक्टन. जमिनीवर आली की तिला शेवाळे वा माॅस म्हणतात. अशी ही अगदी पुरातन पण प्राथमिक स्वरूपाची वनस्पती बुरशीपेक्षा वेगळी असते. सहसा शेवाळाचे एकच रोप सापडणार नाही; कारण एकाच वेळी हवेतून, पाण्यातून, वाऱ्याद्वारे पसरलेल्या असंख्य स्पोअर्सद्वारे ही वनस्पती अन्य ठिकाणी पसरते व रुजते. त्यामुळे एका जागी पडलेली डझनावारी स्पोअर्स पडून तशीच ओलाव्याची वाट पाहत राहतात. जेव्हा पाऊस, ओल, पाण्याचा पुरेसा पुरवठा मिळेल, तेव्हा ती लगेच रुजतात. त्यांची मुळे थोडय़ाशाही खडबडीत भागात झटकन पकड घेतात. खरे म्हणजे मुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या केसाइतक्या बारीक केशवाहिन्या खडबडीत भागाच्या अगदी छोटय़ाशा भोकातही पकड मिळवतात.

 शेवाळाची वाढ फार झपाट्याने होते. आठवड्याभरापूर्वी स्वच्छ दिसणारा एखादा खडक पावसाळय़ात बघताबघता हिरवट दिसू लागतो. महिन्याभराने त्याच्यावरचा बोटभर जाडीचा हिरवागार गालीचा मन मोहून टाकतो. पावसाळा संपता संपता त्यालाच छोटे छोटे दांडे येऊन त्याच्या टोकाला असलेल्या पिशवीतून पुन्हा स्पोअर्स बाहेर पडतात. काही वेळा पावसाचे थेंब या पिशव्या उघडण्याचे काम करतात. आता मूळ वनस्पती वाळून गेली व ती वाळल्यामुळे करड्या रंगाचे तुकडे पडले, तरी पुढच्या पुनरुत्पादनाची सोय झालेली असते.

पर्जन्यवनांमध्ये शेवाळे सर्वत्र आढळते. दाटच्या दाट थर असलेले शेवाळे हे झाडांवरही खूप उंचापर्यंत पसरलेले असते. वाळलेले ओंडके तर शेवाळलेलेच असतात. शेवाळ्यावरून पाय घसरून आपटी खाल्ल्याची आठवण नसलेले मूल क्वचितच आढळते, नाहीत का ?

Thursday, 6 February 2020

व्यसन

📙 *व्यसनाधीनता* 📙
**********************

 व्यसन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटणे. व्यवहारात व्यसन हा शब्द एखाद्या वाईट सवयीबद्दल, तिच्या आहारी जाण्याबद्दल वापरला जातो. तंबाखू खाणे, सिगारेट वा विडी ओढणे, तपकीर ओढणे, दारू पिणे, सुपारी खाणे, अफू, हेरॉईन, गांजा यांचे सेवन करणे - या बाबतीत जेव्हा स्वतःच्या इच्छेनुसार एखादा माणूस ही गोष्ट थांबवू शकत नाही, तेव्हा तो या बाबतीत व्यसनाधीन झाला आहे, असे समजतात. सवय व व्यसन या बाबतीतील सीमारेषा फारच अस्पष्ट आहे, हेही तितकेच खरे.

 सुपारीच घ्या ना. जेवणानंतर सुपारी खावीशी वाटते, हा सवयीचा भाग. पण सुपारी मिळाली नाही तर अस्वस्थपणा येणे, चैन न पडणे, व्यवहार न सुचणे हा व्यसनाचा भाग. काही पदार्थांच्या बाबतीत ही फक्त सवय असते. ती निग्रहाने सुटणे शक्यही होते. पण बर्‍याच बाबतीत व्यसनाधीनता म्हणजे त्या माणसाच्या शरीरातील, रक्तातील विशिष्ट द्रव्याचे प्रमाण कमी झाले म्हणून शरीर आतून मागणी करू लागते. म्हणजे सिगारेट ओढणारा व तंबाखू खाणारा यांच्या बाबतीत रक्तातील निकोटीनचे प्रमाण कमी होऊ लागले की, तलफ येऊ लागते. ते प्रमाण योग्य पातळीवर पोहोचले की समाधान होते. या बाबतीत दारू वा अल्कोहोलची तीच गोष्ट आहे. रक्तातील ठराविक प्रमाण जसे कमी होईल, तशी मेंदूकडे संवेदना पाठवली जाऊन व्यसनी माणूस पुन्हा दारूची मागणी करू लागतो. नाही मिळाली, तर प्रथम अस्वस्थ होतो. नंतर चिडचिडा बनतो, नंतर रागावतो, घामाने डबडबू लागतो, थरकाप होऊ लागतो. ही सगळी व्यसनाधिनतेचीच लक्षणे आहेत.

 पण सिगारेट, दारू, तंबाखू, तपकीर यांचे 'व्यसन' लागायला अनेक दिवस त्यांचे सेवन करणे जरुरीचे असते. एखाद्या आठवड्याभरात या गोष्टींची सवय लागली व व्यसन जडले, असे सहसा घडत नाही, याउलट गांजा, हेरॉईन, अफू, कोकेन इत्यादी मादक पदार्थांबाबतीत मात्र जेमतेम पाच ते सहा वेळा या द्रव्यांच्या संपर्कात आल्यानंतर लगेच माणूस या द्रव्यांच्या आहारी जातो. या अमली पदार्थांना हातही न लावणे याचं कारणाकरता अत्यंत आवश्यक असते. 'एकदाच चरस वा गांजाची चिलीम ओढून बघू, मला व्यसन लागणे शक्यच नाही' असा प्रकार सहसा घडत नाही. पहिल्या चिलमीचा हा परिणाम संपतानाच शरीर दुसर्याची मागणी करू लागते. ही मागणी धुडकावणे जवळपास शक्य होत नाही. काय चालले आहे, ते कळायच्या आत माणूस त्या व्यसनाचा कच्छपी लागलेला असतो.

 नदीच्या शांत पात्रात एखादा भोवरा असतो. पोहणारा त्या भोवर्‍याकडे कुतूहलाने बघता बघता आत ओढला जातो. गरागरा फिरताना पाण्याच्या तळाशी कधी गिळला जातो, ते कोणालाच कळत नाही. ज्यांना अलीकडे 'ड्रग्ज' किंवा अंमली पदार्थ म्हणतात, त्यांच्या सेवनानंतर अशीच स्थिती होते.

 यावर उपाय आहेत. ते म्हणजे दोनच. अंमली पदार्थांना अजिबात हात न लावणे, दूर राहणे हा पहिला. दुसरा म्हणजे चुकून व्यसनाधीन झाल्यास तज्ज्ञ उपचारांकरवी त्यातून मुक्तता मिळविण्याचा. पहिला उपाय शंभर टक्के यशस्वी, तर दुसऱ्यामध्ये जेमतेम पन्नास टक्केच यश मिळते.

 कोणता मार्ग चांगला, ते तुम्हीच सांगा ना ! 

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...