Wednesday, 8 September 2021

सापाविषयी जाणून घेवू या.

साप खाल्ला तर माणूस मरतो का ? 

काय घाबरलात ना? पण घाबरू नका! काही वर्षानी का होईना, भारतातही हॉटेलात शिरल्यावर मेनूकार्डात चिकन, मटणाच्या बरोबर सापाचे मांस, कबाब इत्यादी पदार्थ नक्कीच लिहिलेले आढळतील. आजही चिनी उपहारगृहात सापाचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. हळूहळू अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणारच आहे. त्यामुळे मनुष्य साप, उंदीर, बेडूक अशा अनेक प्राण्यांना फस्त करत सुटेल. अर्थात सध्याही जगाच्या काही भागात हे प्राणी खाल्ले जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, साप हा भयंकर विषारी असतो; मग तो खाल्ल्यास मृत्यू येणार नाही का ?
साप खाल्ल्यावर माणूस मरत नाही, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सापाचे विष फक्त त्याच्या दातांजवळील ग्रंथीतच असते. ते सर्व शरीरभर पसरलेले नसते. त्यामुळे साप खाल्ला तरी कोणी मरणार नाही. दुसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सापाचे विष जर खाल्ले तरी काहीही दुष्परिणाम होणार नाही. सापाचे विष म्हणजे एक प्रकारचे प्रथिनच असते. जठरातील आम्ल व इतर विकरांमुळे या प्रथिनांचे पचन होऊन जाईल. कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
साप चावल्यानंतर एकतर हे विष रक्तातून शरीरभर पसरते किंवा स्नायूतून चेतातंतूमध्ये व तेथून मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळे सर्पविषबाधेची लक्षणे ही प्रामुख्याने रक्ताभिसरण संस्था किंवा मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतात. या दोन्ही कारणांमुळे आपल्या लक्षात येईल की, साप खाल्ला तरी माणूस मरत नाही.

Saturday, 4 September 2021

शिक्षक पुरस्कार

" शिक्षकांचा पुरस्कार"
 
     भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बर्‍याच ठिकाणी शिक्षक पुरस्कारांचे वितरण होते .पुरस्कारासाठी काही शिक्षकांची निवड होते तर काहींची होत नाही .ज्यांची निवड होते ते आनंदी होतात आणि ज्यांची निवड होत नाही ते दुःखी होतात. पण मला असे वाटते की त्यांनी दुखी किंवा हिरमुसले होऊन जाण्याचे काही एक कारण नाही कारण पुरस्कार हे अल्पसंख्येत असतात मग ते सगळ्यांनाच कसे काय मिळू शकतील? आणि आपण काम पुरस्कारासाठी करत नाहीत. खरं तर शिक्षकाने  आपल्या विद्यार्थ्यांची यशस्विता व त्यांच्याशी असलेली बांधिलकी हाच सर्वोत्तम पुरस्कार समजावा .पुरस्काराबद्दल  जय कृष्णमूर्ती भारतीय तत्त्वज्ञ यांचे विचार वाचण्यासारखे आहेत ,त्यांच्या मते" पुरस्कार, सन्मान ही बाह्य प्रेरणा आहे ,खरी गरज आहे ती अंत प्रेरणेची "आणि हे अगदी खरे आहे. बाह्य प्रेरणा प्रत्येक वेळेला टिकाऊ असतेच असे नाही .मात्र अंतकरणात असलेली प्रेरणा सतत कार्यमग्न राहण्यास प्रवृत्त करते. सतत प्रज्वलित राहणाऱ्या या प्रेरणेने समाजपयोगी कल्याणकारी काम केले जातात. काही लोक मुळातच self motivated असतात .त्यांना बाह्यप्रेरणेची गरज नसते .तिचा फारसा उपयोग होत नाही. कारण ते स्वयंप्रेरित असतात .अशा स्वयंप्रेरीकतेची आज गरज आहे. ती सर्व शिक्षकांमध्ये निर्माण व्हायला हवी.
      शिक्षकांनी हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती असते ,त्याची विशेष अशी वैशिष्ट्ये असतात ,त्याचे स्वभाव भिन्न असतात ,प्रत्येक मुलाची अध्ययन गती कमी-अधिक असते ,किंबहुना ते आपल्या कलाने व आपल्या स्वतःच्या वेगाने शिकत असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला समजून घेता आले पाहिजे. शाळेच्या वेळेत ते आपल्या समवेत असतात ,आपल्या सोबत असतात .त्या वेळेला केवळ नेमून दिलेला पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रमातील धडे वेळापत्रकानुसार शिकवणे एवढेच आपले काम नाही .कारण त्याच काळात विद्यार्थी भावनिक व मानसिक दृष्ट्या सुद्धा घडत असतात, म्हणून त्या वयात प्रत्येक वेळेला त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या  चांगल्या गोष्टींबद्दल त्याचं कौतुक करायला हवं, शाबासकीची थाप देऊन प्रोत्साहन द्यायला हवं.  त्याला त्याच्या प्रगतीसाठी प्रेरित करायला हवे.त्याची चूक झाल्यास न रागवता ,न चिडता त्याला समजून घेत समजवायला हवं .त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची दखल घेतली गेली पाहिजे . इतकंच नाही तर व्यक्तिगत जीवनात सुद्धा विद्यार्थ्याला आलेल्या समस्यांमध्ये मदत केली पाहिजे . तो मागे पडत असेल तर त्याच्या अध्ययनातील चुका  शोधून त्याच्यासाठी वेगळा वेळ देऊन त्याला इतरांच्या बरोबरीला आणायला हवं , अर्थात हे अनेक शिक्षक करत आहेतच, पण ते अधिक जाणीवपूर्वक घडाव म्हणजेच आणखी प्रगती होईल. शाळेतील ज्ञान व कौशल्य फक्त परीक्षेपुरता किंवा चाचण्या पुरताच नव्हे तर प्रत्यक्ष जीवन व्यवहारात उपयोगी पडावीत,असे वाटत असेल तर त्यामध्ये बदलत्या काळाच्या गरजेनुसार अधिक ज्ञानाची भर घालण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. म्हणजेच शाळेत नुसतं शिकणं पुरेसं नाही तर कोणतीही गोष्ट कशी शिकावी व त्याची आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घेता येईल , याचेही शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
       प्रत्येक शिक्षकाने माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी माझा आणि मी त्यांचा अशी भूमिका ठेवली पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे शिक्षकाचे खरे समाधान दररोज वर्गात प्रवेश करताना आपण हसतमुखाने प्रवेश केला तर वर्गातील सारे चेहरे प्रसन्न रस्त्याने उजळते प्रेमाच्या व्यवहाराचे जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते .विद्यार्थी व शिक्षकांचे नाते घट्ट होत जाते, असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयातील एका कप्प्यात कायम स्मरण स्मरणात राहतात. अभ्यासक्रमातील अध्यापन आपल्या प्रसन्न हास्याने आणि मायेच्या ममतेने जर झाले तर त्याचा वेगळाच अनुभव मिळतो. अंतरीचा दिवा प्रत्येक शिक्षकाने हास्याच्या वातीने आणि प्रेमाच्या ज्योतीने सतत पेटता ठेवला ,तेवत ठेवला तर त्यासारखा दुसरा पुरस्कार शिक्षकासाठी नाही. आपल्या प्रत्येक विद्यार्थी या भारत देशाचा सुजाण नागरिक व्हावा हाच शिक्षकासाठी सर्वोत्तम पुरस्कार आणि तो मिळेलच असा निश्चय शिक्षक दिनी करू या .
         शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट वाचनात आली नेताजी सुभाष चंद्र बोस मॅट्रिकला असताना तोंडी परीक्षेसाठी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला "what is difference between station master and school master"नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी उत्तर दिले, "station master minds trains and schoolmaster trains minds" 
किती कमी शब्दात मोठ्ठे उत्तर नेताजींनी दिलं होतं !शिक्षक खरोखर मन घडवणारा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा मोठा प्रभाव असतो .विद्यार्थ्यांचे मन योग्य पद्धतीने घडवण्यासाठी शिक्षकांनी नेहमी सजग राहायला हवं .मुलांना घडवताना आपणही घडत असतो आणि आपल्या देशाची भावी पिढीही घडत असते. म्हणूनच वर्गात आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चैतन्याच्या झऱ्याला आपल्या मनाच्या आंतरिक जिव्हाळ्याची आणि प्रेमाची गरज आहे ,ते आपल्या अंतरंगात आले की 
        "आनंदाचे डोही, आनंद तरंग"
        श्रीमती मेघा अनिल पाटील.
          उपशिक्षिका
         श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
   मोबाईल नंबर 9665189977

Thursday, 26 August 2021

पर्यावरणपुरक सण

      आपण पर्यावरण पूरक सण साजरे करु शकतो का?
          "नेमेचि येतो पावसाळा
         त्यातून निसर्ग सांभाळा"
   असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण  निसर्गाचा सारा आनंद आपणास खऱ्या अर्थाने श्रावणात पहायला भेटतो,अनुभवायला भेटतो.श्वासात भरलेला हा अनामिक सुगंध मनाला उल्हासीत करतो.पावसाची झडी, रिपरिप जाणवते.आषाढातील दमदार व मुसळधार पावसानंतर श्रावणात होणारा ऊन पावसाचा खेळ हे दृश्य नेहमीच विलोभनीय असते. कोमल उन्हात अंगावर होणारा पावसाचा शिडकावा एक वेगळीच अनुभूती देऊन जातो.शुभ्र उन्हात रिमझिमणाऱ्या पावसाचे चमकणारे मोत्यासारखे थेंब पाहणे, तसेच ते हातात पकडण्याचा प्रयत्न करणे हा आनंद श्रावणातच मिळू शकतो.
     जेष्ठ महिन्यात येणारा वटपौर्णिमा हा महिलांचा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडित आहे.वडाचे झाड हे दीर्घकाळ टिकणारे असून त्याचा विपुल पर्णसंभार असतो. त्यामुळे वडाची झाडे हवा प्रदूषण नियंत्रणा बरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तम रीतीने करीत असते. तसेच त्याच्या घनदाट पानांमुळे ही झाडे हवेतील तापमान कमी करून शीतलता प्रदानकरते.वडाच्या झाडापासून 100 मीटरच्या आत प्रदूषणाचे प्रमाण हे अत्यंत अल्प असते किंवा प्रदूषणाचे प्रमाण नसतेच मुळी. तसेच बरेच पक्षी वडाच्या झाडाचा रात्रीच्या निवाऱ्या साठी उपयोग करतात. वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येतात. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळते. आपल्या पूर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखून आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली आहे.वटपौर्णिमा हे व्रत हिंदू संस्कृतीत पती परमेश्वराच्या दीर्घआयुष्यासाठी करण्यात येणारे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे . शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वडाजवळ येऊन बसल्याने फायदा होतो. आरोग्याला पोषक वातावरण लाभते.कारण निसर्गात वड,पिंपळ या वृक्षा मधून सर्वात मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन बाहेर पडतो  म्हणून स्रीया जेंव्हा वडाच्या झाडाखाली बसून पुजा अर्चा करतात ,तेंव्हा त्यांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होतो . ते त्यांच्या आरोग्यास लाभदायक ठरते. महिलांना मुळातच नटून,थटून,सजून बाहेर पडायला आवडते आणि वटपौर्णमेच्या निमित्ताने नवी कोरी करकरीत साडी परिधान करून पुजा करणेआवडते. दागिने घालून पूजेसाठी स्रीया तयार होतात तेंव्हा त्यांच्या शरीरात सकारात्मक हॉर्मोन्स नैसर्गिकपणे तयार होतात . वडाच्या पानांमधून पावसाच्या सुरुवातीला द्रव निघतो त्यामुळें
स्त्रीयांना आजारा पासून संरक्षण मिळते . म्हणून वडाचे झाडाचे पूजन करून त्याची जतन केली पाहिजे कारण ते चोवीस तास
ऑक्सिजन देते. म्हणून निसर्गाची ही देणगी लाभावी यासाठी पूर्वजांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधले आहे.
        श्रावण व भाद्रपदात भरपूर पवित्र दिवस येतात .या दिवसांना बेल ,तुळस, दुर्वा इ.पत्री देवास वाहिली जाते. यानिमित्ताने लोकांनी निसर्गाशी जवळीक साधावी हाच यामागे प्रमुख उद्देश आहे .पत्री मध्ये आघाडा ,जास्वंद , शमी, कन्हेर, मोगरा ,जाई-जुई ,बेल ,तुळस यासारख्या बऱ्याच वनस्पतींची पाने गोळा केली जातात. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने विविध प्रकारच्या वनस्पतींची ओळख होत असते. या प्रत्येक वनस्पतीत काही ना काही औषधी गुणधर्म आहेत त्यांची माहिती लोकांना ज्ञात होते .तसेच  या पत्री जास्तीत जास्त लोकांना ऊपलब्ध होतील याचीही काळजी घेतली जावू शकते .या वनस्पतींना पत्री म्हणतात असेही काहींना माहिती नाही.आता पत्री गोळा करणे हा प्रकार नामशेष होत चालला आहे. फार फार तर बाजारातून दूर्वा बेल व पत्री चा पुडा विकत आणून पूजाअर्चा पार पाडली जाते .तेव्हा ही जुनी परंपरा लहान प्रमाणात पुनर्जीवित करू शकतात . घराजवळ किंवा शाळेतील मोकळ्या जागी परस बागेत किंवा गच्चीवर या औषधी वनस्पतींची पत्री वाटिका तयार करता येईल. आपले पूर्वज फार हुशार होते. निसर्गातील या विविध पानांची ओळख आपल्याला व्हावी, यासाठी वेगवेगळ्या  व्रतवैकल्य , सण, उत्सव यांच्याशी झाडे व पाने, फुले , फळे यांची सांगड घातली गेली आहे .हरतालिकेच्या वेळी वाहण्यात येणारी पत्री ही सुद्धा झाडावरून तोडली जाणे, म्हणजेच त्या झाडांमधील वाढीस कारणीभूत ठरणारी हार्मोन्स ची पातळी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. यासाठी काही झाडांवरील पाने तोडली गेली तर झाडाच्या उंचीत व पानांच्या संख्येत निश्चितच वाढ  होते, हे वनस्पतिशास्त्र सांगते. म्हणून आपण सहज म्हणू शकतो की हरितालिका व्रत सुद्धा  निसर्गाचे रक्षणच करते.
   आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा गणेश उत्सव हा उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी भल्या मोठ्या मूर्ती स्थापन करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागलेली असते. यात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मूर्ती  किंवा पेपर कागदाचा लगदा पासुन लहान गणपती तयार करू शकतो. तसेच मूर्तीसाठी रासायनिक रंग ऐवजी नैसर्गिक रंग वापरू शकतो आणि मूर्तीचे विसर्जन घरीच  हौदातील पाण्यात किंवा टाक्यांमध्ये घरगुती स्वरूपात विसर्जन करु शकतो. यातून आपण मोठ्या प्रमाणावर प्रदूषणास आळा घालू शकतो व निसर्ग संवर्धन करून जनजागृती  करू शकतो. गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा वाहिली जाते तसेच जास्वंदाचे फुल म्हणजेच गणेश फूल वाहिले जाते .दुर्वा व जास्वंदाच्या फुला शिवाय गणपतीची पूजा-अर्चा होऊ शकत नाही ,अशी भावना आहे.याद्वारे जास्वंदीच्या झाडांची लागवड करणे ,संगोपन करणे व संवर्धन करणे म्हणजेच निसर्गाचे रक्षण करणे . तसेच पावसाळ्यात दुर्वा म्हणजेच भूमिगत खोड असून  पावसाळ्यात दुर्वांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. गणपती बाप्पाचे पुजन करण्याच्या निमित्ताने दुर्वांची जुडी तयार करण्यात येते. म्हणून मोठ्या संख्येने दुर्वा तोडून घेतल्यात तर पुन्हा नव्याने वाढ होते म्हणजेच निसर्गाचे संवर्धन करणे यातून अधोरेखित होते.
      आपल्या भारतीय संस्कृती सण आणि उत्सवांची नुसती लयलूट आहे मानव प्राणी हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची सांगड धर्माशी व संस्कृतीशी घातली आहे व परराष्ट्र सणात कुठल्या ना कुठल्या वृक्षाचे महात्म्य साधले आहे यानिमित्ताने त्या वृक्षाचे औषधी गुणधर्म आपण लक्षात घ्यावे तसेच धर्माचे पालन करता करता आपल्या आरोग्यास हितकारक सवयीही अंगीकारला जाव्यात .हाच यामागील उद्देश असावा. पण आज काल या सणांच्या मूळ उद्देशांकडे दुर्लक्ष होऊन अनिष्ट गोष्टींना प्रोत्साहन दिलं जात आहे .त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या प्रदूषणात भर घालत आहोत. म्हणून सर्व सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करता येऊ शकतात का? याचा विचार आपण केला पाहिजे व त्या दृष्टीने आपली कृती असणे आवश्यक आहे.

श्रीमती मेघा अनिल पाटील
             उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com

Tuesday, 24 August 2021

एड्स जनजागृती

    *एड्स म्हणजे काय ?* 

एड्स हा शब्द गेल्या काही वर्षांत वारंवार कानावर पडू लागलेला आहे. हा शब्द उच्चारताच एक भयंकर आजार, ज्याचा अंत केवळ मरणात आहे, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एड्स हा एक रोग आहे, हे तर आपल्यापैकी बऱ्याचजणांना एव्हाना माहीत झाले असेल. एड्सबद्दल आपण जास्त माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आज नाही तरी अजून ५-१० वर्षांत आपल्या देशात भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांमध्ये एड्सचा समावेश नक्कीच झालेला असेल.

एड्स म्हणजे (AIDS) अॅक्वायर्ड अम्यूनो डेफिशियन्सी सिन्ड्रोम सर्वप्रथम १९८१ मध्ये अमेरिकेत ह्या रोगाचे निदान झाले. भारतात हा रोग १९८६ मध्ये आढळून आला. २००० पर्यंत भारतात एड्सचे काही हजार रुग्ण आहेत. एड्स हा विषाणूंमुळे होणार आजार आहे. या विषाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक बुरशी संवर्गातील परजीवी जंतू, काही विषाणू व काही सामान्यतः मनुष्याला रोग न करणारे जिवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात व रोग होतात. या रोगांना संधीसाधू सांसर्गिक रोग असे म्हणतात.

एड्सचे विषाणू शरीरात शिरल्यापासून एड्स होईपर्यंत अनेक वर्षे लोटतात. एड्सचे निदान करणाऱ्या एलाइझासारख्या तपासण्या एड्स विषाणूच्या शरीरात प्रवेशानंतर शरीराने दिलेल्या अँटीबॉडीजरूपी प्रतिसादावर अवलंबून असतात. त्यामुळे एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह (शरीरात एड्सचे जंतू असलेली) व्यक्ती एड्सचा रुग्ण होईल वा नाही, वा केव्हा होईल, हे नक्की सांगता येत नाही. एड्सच्या लक्षणांत महिन्याभराहून जास्त काळ खोकला, शरीरभर लिंफ ग्रंथीची वाढ, त्वचेचे दाह, महिन्याभराहून जास्त काळ ताप, जुलाब, तसेच वजनात दहा टक्क्यांहून जास्त घट इत्यादींचा समावेश होतो.


Wednesday, 23 June 2021

21जून

*२१ जून*

*वर्षातील सर्वात मोठा दिवस*

आज २१ जून ! वर्षातील सर्वात मोठा दिवस !

२१ जून हा २०२१ या वर्षातला सर्वात मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिश मध्ये समर सॉलस्टाईस (Summer Solstice) म्हटलं जातं. पण हे नेमकं का घडतं? समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्या समोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो.

२१ जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्या समोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस १२ तासांपेक्षाही मोठा असतो.

यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणजे वर्षाच्या या पुढच्या काळामध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो.

साधारण २० जून ते २२ जून दरम्यानच्या एका दिवशी दरवर्षी समर सॉलस्टाईस घडतं. म्हणजे २०, २१ वा २२ पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो.

यावर्षी २१ जून हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असेल. भारतात २१ जून २०२१ ला दिवस १३ तास १२ मिनिटांचा असेल. उत्तर गोलार्धातल्या प्रत्येक देशासाठी हा कालावधी वेगवेगळा असेल. तर दक्षिण गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र असेल.

पृथ्वीचा उत्तर धृव हा २१ जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात (Tropic of Cancer) थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो.

*२१ जूनचं महत्त्वं* :

अनेक देशांमध्ये २१ जूनचा दिवस हा ऋतुबदलाचा दिवस मानला जातो. मराठी पंचांगा मध्येही २१ जूनची नोंद 'वर्षा ऋतू प्रारंभ' अशी केलेली असते.

पश्चिमेतल्या देशांमध्ये २१ जूनच्या दिवशी 'Spring' म्हणजे वसंत ऋतू संपून 'Summer' म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. हा उन्हाळा २१ वा २२ सप्टेंबरला Autumn Equinox ने संपतो. या दिवशी दिवस आणि रात्र समान तासांचे असतात. यानंतर पश्चिमेकडच्या देशांमध्ये Autumn म्हणजे पानगळीचा मोसम सुरू होतो.

Thursday, 20 May 2021

अँजिओप्लास्टी म्हणजे काय ?

        अँजिओप्लास्टी म्हणजे काय ?

दिवसेंदिवस हृदयरोगांचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपान, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, आहारात चरबी युक्त पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन अशा अनेक कारणांमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होऊन श्रमानंतर छातीत दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. उपचार न घेतल्यास पुढे हार्ट अॅटॅकही येऊ शकतो.

कोरोनरी रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी व तेथील रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अँजिओप्लास्टी या तंत्राचा वापर केला जातो. यात मांडीतील वा हातातील रोहिणीतून हृदयरोगतज्ज्ञ कॅथेटर आत टाकतात. या कॅथेटर मधून पाठवण्यात आलेल्या बलूनच्या साहाय्याने रक्तवाहिनीतील अडथळा दूर केला जातो. काही वेळा रक्तवाहिनीची पोकळी तशीच राहावी म्हणून आधार वा स्टेंटही बसवला जातो. याठिकाणी रक्त साकळण्याची क्रिया होऊ नये यासाठी विशिष्ट औषधी द्रव्य सोडणारे स्टेंटही आता उपलब्ध आहेत. आजकाल औषधीयुक्त स्टेटचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसतो.

अँजिओप्लास्टी ही तशी सोपी उपचार पद्धती आहे. १ ते २ तासात प्रोसिजर पूर्ण होते. रूग्ण या दरम्यान पूर्णत: शुद्धीवर असतो. १ ते २ दिवसात तो घरी जाऊ शकतो. सध्या या उपचाराला १ ते २ लाख रुपये खर्च येत असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अँजिओप्लास्टीनंतर पहिल्या सहा महिन्यात सुमारे ३०% व्यक्तींमध्ये पुन्हा अडवळे निर्माण होऊ शकतात. म्हणून या काळात जास्त काळजी घ्यायला हवी. मुख्य म्हणजे अँजिओप्लास्टीसाठी रुग्णाची निवड अचूकपणे करायला हवी. वैद्यक व्यवसायाचे झालेले बाजारीकरण लक्षात घेता रुग्णांनी असा खर्चिक उपचार घेण्यापूर्वी दोन डॉक्टरांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरेल


Wednesday, 21 April 2021

Human Eye

Human Eye structure and function
                     Human eye  
               Anatomical structure 
       
     The human eye is the organ of sight which is located in deep depression of skull called as orbits. It is attached to the orbit by 6 muscles that allow eyeball to move. Eyeball is spherical and has three layers. The first two 2 layer are mesodermal and the third ectodermal in origin.
1)  Superior rectus muscles  or fibrous tunic/The sclera __ this is the outermost, thick and tough, non vascular covering around the eyeball. Over the projecting parts of eyeball, it is transparent, forming the cornea. It lacks blood vessels but it is composed of special type of connective tissue. It is covered externally by a thin transparent membrane called conjuctiva.
2) lnferior rectus muscle__ distracted muscle fibres are  inserted into sclera for eyeball movements. The 3rd,4th & 6th cranial nerves control the eyeball movements to observe in different directions. Light passes and refracted through  cornea and rays begin to converge.
3) Vitreous gel body __ space between cornea and lens is called aqueous chamber . It is filled with clear watery fluid called aqueous  humour , which is a tissue fluid containing glucose, amino acids, respiratory gases, metabolic wastes and ascorbic acid.
     This vitreous chamber is filled with viscous, jelly like humour containing 99% water, salt, a a little quantity of mucoproteins and hyaluronic acid.lt is the part between lens and retina. 
4)Ciliary body and muscles__  lt is located just behind the junction between the main part if sclera and cornea.lt contains a network of blood vessels supplying food and oxygen to eye. It is deeply pigment and is connected  to a thick structure which have blood vessels and muscle fibres that run in circular direction. Contraction and expansion of ciliary muscles bring about increase and decrease in the size of lens 
5) Iris__lt is called diaphragm of eye because it regulates the size of pupil .lt is thin circular structure made up of connective tissues and muscles that surrounds the pupil. Iris is the forward segment of ciliary body which is pigmented  and opaque.The colour of our eyes is determined by the amount of pigment in the Iris. This part is the visible coloured portion of the eye. Iris are heavily pigmented in people with Brown or black eyes but less pigmented in people with blue eyes.
6) Lens__it is a transparent crystalline structure. It is present anteriorly inside the Iris and is held in position by ligaments of ciliary body.
7) Pupile__the aperture surrounded by the Iris in front of lens is called pupil. The large central aperture of iris is called pupil.The movement of pupil is regulated by muscle fibres of iris..
8) Anterior chamber__ lt is filled with clear watery fluid called aqueous humor .The lacrimal gland is situated in the orbit which   secrets  water ,salt  and bactericidal protein called  lysozyme. The function of tears is to bath the front of eye, washing away in a dust, grit and microorganisms.
9)Cornea__lt is transparent anterior circular  portion present in front of the sclera . Sclera is the outer layer of dense connective tissue.
10)Retina__ It is innermost layer of eye.It is very delicate layer which is sensitive to light. It receives  image. bears light sensitive. lt bears light sensitive photoreceptor cells- rods and cones.
(a)Rods: contain purple coloured photosensitive pigments Rhodopsin which are more responsive to dim light i.e  scotopic vision.
(b)Cones:contain violet coloured photosensitive pigments  which function in bright light i. e. photopic vision.
Cones are of 3 differnt types.
(i) short wavelength: sensitive blue cons.
(ii) medium wavelength: sensitive green cones.
(iii) long wavelength: sensitive red cones.
They are called at photopigments.
11)Fovea__lt is  central pit portion of the retina. It contents only cones but no rods and gives the distinct interpretation of an image.Therefore have greatest visual activity. i.e. resolution . Outside the fovea, processing of visual information can occur within the retina.lateral to fovea ,there is a blind spot which does not contain light sensitive cells.
12)Macula__It is yellowish pigment spot is present lateral to the blind spot.
13)Choroid__it is the middle layer present inside the sclera. which is blue in colour contains network of  blood vessels supplying food and oxygen to eye.
Optic nerve __it is sensory in nature and originate from retina of eye and distribution in optic lobes of brain and function is to give  vision. 
   * Common eye defects*
 
1)Myopia / Near sightedness
      Person has difficulty in seeing distant objects clearly.the person can see near objects clearly. Hence it is also called short sight.Engineer site I the eyeball is too long and the retina is too far  from the lens. The light rays converge at a a. In front of the retina resulting in a  blurred image. Concave lens corrects this condition by bringing the light rays to a focus at a point further back.
2) Hypermetropia/farsightedness
 The person has difficulty in seeing near objects. Hypermetropia is just the opposite of myopia. The eyeball is too short and the retina too cloes to the lens. Light rays strike the retina before they have converged again resulting in a blurred image.
convex lenses saraiki far sighted condition by causing the light rays to converge further forward.
3) Astigmatism
     It is due to irregular cornea or lens.lt causing the image to be out of focus, producing  faulty vision. It is corrected by cylindrical lens. It can be diagnosis by retinoscopy. It is commonly occur in in kids between 5 to 17  years old girls and boys.
4) Presbyopia/Old sight
     It is a defect in accommodation occurring in advancing age. Lens becomes elastic and is not able to focus the image of near object while the distant vision is not impaired. It is also called old age long sightedness. This defect is corrected by using convex lens.
5) Strabismus
   It is commonly known as Squint.the eyeball is somewhat bent on onto a side in its orbit so that the optic axis cannot be directed to the same object. Some extra ocular muscle becomes longer or shorter than the normal. It can be cure by small surgery.
6) Cataract / Safaid Motia 
  The lengths loses its transparency and becomes opaque to light and hence vision is impaired.It is corrected by surgical removal of the opaque lens and using biconvex glasses. Intraocular lens implantation is also done. It is commonly occur in old people  &  known as Motibindu.
7)Glaucoma/Kala Motia
  It is also more common in older people. If untreated it leads to blindness. The pressure in the anterior cavity of the earth increases to an abnormal level.lt  exerts pressure on the posterior cavity and greatly reduces the blood supply to the retina. Lack of nutrients ultimately damages the Nerve cells of the retina.ek the pressure is due to blockage of the canal of schlemm a new canal can be created surgically.
 ** common eye defects such as
Myopia / Near sightedness ,Hypermetropia/farsightedness,Astigmatism,Presbyopia/Old sight,Strabismus,Cataract / Safaid Motia,Glaucoma/Kala Motia, Conjuctiva, Nightblindness,Colour blindness. दृष्टीदोष_निकटदृष्टिता , दूरदृष्टी ता, विषमदृष्टी, दृष्टीमांद्य , तिरळेपणा, मोतीबिंदू, काच बिंदू, डोळे येणे, रातांधळेपणा, रंगआंधळेपणा.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...