Thursday, 17 December 2020

"कोविड मुळे जगातील काही बदल "

    "कोविड मुळे जगातील काही बदल "

      Covid-19 नंतर जगात अनेक बदल होणार आहे हे निश्चितच. या बदलात 'वर्क फ्रॉम होम' चा समावेश आहे. हा नवीन ट्रेंड असून त्याचे परिणाम दीर्घकाळ दिसून येतील. जगात काम करण्याच्या पद्धती नेहमीसाठी बदलून जातील.
     आयुष्य प्रथम आणि काम नंतर हा विचार सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीच्या मनात आला. आपले प्राधान्य बदललेले आहे ,म्हणून कामाला आपल्या आयुष्याच्या अवतीभोवती ठेवणं हाच पहिला मोठा बदल आहे. आपले जीवन हीच प्रथम प्रायॉरिटी आहे, हे  गांभीर्याने सर्व लोकांनी प्रथमच घेतलं.
          विविध मोठ्या कंपन्यातील लोकांना त्यांचे काम जगातील काही भागात नेण्यासाठी बराच कालावधी लागत होता. त्यासाठी रेल्वे, बस ,विमानसेवा अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीत लागत होता. अशा लोकांना वर्क फ्रॉम होम साठी वर्षातील अनेक अतिरिक्त दिवस मिळतील. तसेच विविध प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाच्या तासांची गणती न करता कामाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतील .म्हणजेच तुम्ही किती तास काम केले?  यामुळे आता फरक पडणार नाही, तर तुम्ही केलेल्या कामातून काय मिळवले ?त्याचा काय परिणाम झाला? यावर लक्ष केंद्रित करून त्याचा मोबदला म्हणजेच पगार दिला जाईल. म्हणजेच आता कामाचे आठ तास किंवा शिफ्ट या गोष्टी कालबाह्य ठरतील. तुमच्या कामाच्या परिणामा वरून तुमचे मूल्यमापन केले जाईल व त्यातून तुम्हाला योग्य ती अर्थप्राप्ती होईल.
           सर्व लहान_लहान गावात देखील चांगली प्रगती साधता येईल .कारण उत्तम शाळा व वेगवान इंटरनेट यासाठीच फक्त गुंतवणूक करावी लागेल. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील सर्वोत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन केव्हाही उपलब्ध होऊ शकेल. त्याचा फायदा लहान गावातील लहान शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला ही घेता येईल. त्यासाठी केवळ चांगल्या कॉलिटीच्या इंटरनेट सुविधा असणे गरजेचे राहील.
         जगात बहुतांश लोक आता मास्कचा वापर करत आहेत. आपला कोविड पासून बचाव करण्यासाठी असो किंवा शासनाच्या दंडाच्या भीतीने असो परंतु सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मास्कची सक्ती झाल्यानंतर थोडाफार विरोध झाला पण तो होऊ नये .कोविडच्या प्रकोपामुळे 2020 वर्ष संपताना मास्क वापरण्याची सवय जडल्याने संपूर्ण जगात सर्व लोकांच्या वागण्यात एक अपेक्षित व योग्य बदल घडून आला आहे. आज जरी विविध देशातील संशोधनाने वेगवेगळ्या लसींचा शोध लागला आहे. त्यात यश आल्यानंतर काय बदल घडेल हे आज कोणालाही सांगता येणार नाही.परंतु अजून तरी काही काळ मास्क सर्वांना घालावाच लागेल यात तिळमात्र शंका नाही. तसेच लस उपलब्ध झाल्यावर देखील आपल्या भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचणे हे लस शोधण्यात इतकेच किंवा  त्याहूनही अवघड काम आहे . म्हणून मास्क शिवाय पर्याय नाही. कोविड जागतिक महामारी ने मास्क ला या पृथ्वीतलावरील प्रत्येक देशातील प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनवून टाकले आहे. जसजसा मास्कचा वापर वेगाने वाढतो आहे त्यापेक्षाही त्याची जगभरातील बाजारपेठ देखील  वाढेलच निर्विवाद आहे.
             आज सर्वत्र विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. अनेक पर्याय गरजेनुसार वापरले जात आहे. त्यात प्रामुख्याने डिस्पोजेबल ,विविध स्तर असलेले, हवा फिल्टर करणारे मास्क, सुंदर डिझाईनचे कापडी धुतले जाणारे मास्क इ.विकत घेऊ शकतात. डिस्पोजेबल मास्टर घेतले तर एक मुख्य समस्या निर्माण होते ती म्हणजे वापर केल्यानंतर विल्हेवाट लावणे.जय योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली नाही तर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी वापरलेल्या मास्क मुळेच कोविंडचा प्रसार होऊ शकतो. म्हणून डिस्पोजेबल मास्क एकदाच वापरून योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावणे, तो नष्ट करणे गरजेचे आहे.सर्वसामान्यांसाठी सर्वात चांगला पर्याय धुतले जाणारे दुहेरी अस्तर असलेले कापडी मास्क हाच आहे. एकदा वापरल्यानंतर सर्फच्या पाण्यात धुवून , सुकवून , इस्त्री करून पुन्हा वापरावा. आपणा स्वतःला आणि दुसऱ्यांनाही वाचवण्यासाठी मास्क वापरला पाहिजे आणि कोविंडचा संसर्ग रोखण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. आज मास्क  घालण्यात स्वतःच्या हिता बरोबरच आपण सामजिक दृष्ट्या जबाबदार आहोत . केवळ मास्क वापरणे सक्तीचे आहे किंवा दंड टाळण्यासाठी तो वापरत आहोत असे न करता स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मास्क  वापरावा.

श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदुरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email  patilmeghaa@gmail.com
                

No comments:

Post a Comment

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...