जागतिक हरित ग्राहक दिन २८ सप्टेंबर
२८ सप्टेंबर हा दिवस 'हरित ग्राहक दिन' म्हणून संबोधला जातो. 'हरित ग्राहक' ही संकल्पना पाश्चिमात्य देशांत रूढ झाली असली तरीही भारतामध्ये ती नवीन आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकवादाची वाढ झपाट्याने झाली आहे. 'गरजेचा विचार न करता केली जाणारी खरेदी' अशी ग्राहकवादाची सोपी व्याख्या करता येईल. 'शॉपिंगला' जाणं हे त्याचं उत्तम उदाहरण! बाजारपठेत येणारी प्रत्येक अद्यावत वस्तू आपल्याकडे असली पाहिजे असा आपला अट्टहास असतो आणि त्या हौसेखातर गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या जातात.
ग्राहकवादाचे परिणाम : वाढत्या ग्राहकवादामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यांचा विचार होणं गरजेचे आहे.
१. वाढता घन कचरा आणि त्यांचे व्यवस्थापन :
‘युज अॅण्ड थ्रो' ही पाश्चात्त्य संस्कृती आपण लगेच आत्मसात केली. पण हेच पाश्चात्त्य लोक टाकून दिलेल्या कचऱ्याचंही किती काटेकोरपणे व्यवस्थापन करतात याचा विचारही आपण करीत नाही.
२. उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे प्रदूषण :
• उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे दूषित पाणी, दूषित वायू यामुळे पर्यावरण प्रदूषित होते. म्हणजेच वाढत्या ग्राहकवादामुळे नैसर्गिक साधनांचा अपव्यय तर होतोच, पण त्याचबरोबर पर्यावरणाची हानीदेखील होते.
३. ऊर्जेचा अति वापर : सोय आणि वेळेची बचत करण्यासाठी अनेक गृहोपयोगी उपकरणांचा आपण वापर करतो. प्रत्येक उपकरणासाठी विजेचा वापर केला जातो. विजेच्या वाढत्या मागणीमुळे अधिकाधिक वीजनिर्मिती करावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खनिज कोळसा जाळावा लागतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण तर येतो, त्याशिवाय या वीजनिर्मितीमुळे होणारे हवेचे प्रदूषण वेगळेच!
हरित ग्राहक ही नवीन संकल्पना असल्याने तिचा प्रसार मर्यादित आहे. सर्वसाधारणपणे जो ग्राहक खरेदी करताना किंवा वस्तूचा उपभोग घेताना त्या वस्तूमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करतो आणि ते परिणाम कमी करण्यसाठी प्रयत्नशील असतो त्याला हरित ग्राहक म्हणता येईल. तुम्हीही हरित ग्राहक होऊ शकता... समाजाची मानसिकता बदलणे अवघड असते. प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली तर अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील.
खरेदी केलेल्या वस्तूवर ‘इको' मार्क पाहायला विसरू नका. • खरेदीला जाताना कापडी पिशवी जरूर न्या. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर टाळा.
• अनावश्यक खरेदी टाळा. पुन्हा वापरणे आणि पुनर्चक्रीकरण त्यावस्तूपासून नवीन वस्तू बनवने या द्विसूत्रीचा अवलंब करा. प्लॅस्टिकपासून प्लॅस्टिक, कागदापासून कागद बनवता येतो. या वस्तू कचरापेटीत न टाकता भंगारवाल्याला किंवा रद्दीवाल्याला द्या.
• Disposable वस्तूंचा वापर टाळा.
फास्टफूडची वेष्टणे, पॅकिंग्ज रस्त्यांवर टाकू नका. चहा, कॉफी काचेच्या किंवा धातूच्या पेल्यात देण्याचा आग्रह धरा.
हँडमेड पेपरचा वापर करा. त्या प्रक्रियेत कोणतीही अपायकारक रसायने वापरली जात नाहीत.
• कागदाचा वापर काळजीपूर्वक करा. कागदाच्या दोन्ही बाजूंवर लिहा.
• शक्य असेल तेव्हा पुस्तक विकत घ्या. छायांकीत प्रती करण्याचं टाळा. त्याने कागदाची बचत होतेच, शिवाय संग्रहामध्ये पुस्तकांची भर पडते.
विजेचा वापर काटकसरीने करा. गरज नसेल तेव्हा ट्यूब, बंद करा. सीएफल, एलईडी याचा वापर करा. पंखे सौरशेगडी, सूर्यचूल यासारखी उपकरणे वापरा.त्यामूळे गॅसचा वापर कमी होतो.
• शक्य असल्यास स्वयंचलित वाहनांचा वापर टाळा. सार्वजनिक वाहनांना प्राधान्य द्या.
• विघटनशील पदार्थापासून (पालापाचोळा, भाजीपाला, सडलेले फळे, अन्नपदार्थ इ.) कंपोस्ट खत बनवा .
No comments:
Post a Comment