Saturday, 30 November 2019

जागतिक एड्स जनजागृती दिन

*आता एड्सला इतिहासजमा करायचं...!*


आजच्या जागतिक एड्सदिनाच्या निमित्तानं, बदलत्या परिस्थितीत एड्स निर्मूलनापुढील नव्या आव्हानांचा आढावा घेणारा लेख-

आज जागतिक एड्स दिनी एक वास्तव मान्य करायला हवं. ते म्हणजे आजही एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यापासून पूर्णपणं सुटका होणं शक्य नाही! एचआयव्हीच्या संसर्गाचं आणि नंतर पूर्ण विकसित एड्स होण्याचं केंद्र अमेरिका-युरोपमधून आफ्रिâका-आशिया खंडात स्थिरावलं, ते १९९०च्या दशकामध्ये. त्यावेळी या विषाणूचा संसर्ग होऊ न देणं हाच त्यावर विजय मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं सांगितलं जात होतं. याचं कारण या विषाणूचा संसर्ग झाल्याचं तपासणीत सिद्ध झालं तर त्याचा त्यावेळी सरळ अर्थ असा होत असे की संबंधिताचे दिवस भरत आले आहेत! आज अत्यंत परिणामकारक अशी अँटीरिट्रोव्हायरल (हा विषाणू अँटीरिट्रोव्हायरल गटातला आहे. याच्या केंद्रकामध्ये डीएनएच्या ऐवजी आरएनए असतो. मात्र माणसाच्या शरीरात घुसल्यानंतर हा विषाणू एका रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या आरएनएचं रूपांतर डीएनएमध्ये करतो!) औषधं उपलब्ध आहेतच, पण ती १९९०च्या दशकामध्ये मिळत होती, त्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहेत.

या औषधांमुळं संबंधिताच्या शरीरातील या विषाणूचं प्रमाण इतकं कमी होतं की ही औषधं नियमितपणं घेणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची संभाव्यता खूपच कमी होते! मात्र तरीसुद्धा या विषाणूचा धोका कायम आहे! जोपर्यंत या विषाणूच्या सर्व उपप्रकारांवर परिणामकारक ठरेल अशी लस विकसित होत नाही, तोपर्यंत हा धोका कायम राहणार आहे. एखाद्या कसलेल्या बहुरूप्यालासुद्धा लाजवेल अशा गतीनं स्वतःमध्ये झटपट बदल घडवून आणण्याची विलक्षण क्षमता या विषाणूमध्ये आहे आणि परिणामकारक लस विकसित करण्यामधली तीच एक मोठी धोंड आहे. मात्र आता परिणामकारक अँटीरिट्रोव्हायरल औषंधामुळं हा विषाणू पूर्णपणं नेस्तनाबूत होत नसला, तरी संबंधिताच्या शरीरातील त्याचं प्रमाण (शास्त्रीय परिभाषेत व्हायरल लोड. विषाणूचं ओझं!) लक्षणीय प्रमाणात कमी होतं. आणि ती व्यक्ती प्रदीर्घ काळ या विषाणूसह आपलं सर्वसाधारण आयुष्य जगू शकते.

गेल्या ३० वर्षांत आपण इतकी प्रगती केली आहे आणि आता २०३०पर्यंत एड्सची साथ माणसाच्या जीवनातून हद्दपार करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. त्यादृष्टीनं आजच्या जागतिक एड्स दिनी 'एचआयव्ही/एड्सच्या साथीची समाजगटांच्या मदतीनं अखेर' असं घोषवाक्य ठरविण्यात आलं आहे आणि या दिनी होणाऱ्या आणि वर्षभर राबविण्याच्या कार्यक्रमांसाठी 'समाजगटच बदल घडवून आणतात' ही मध्यवर्ती कल्पना नक्की करण्यात आली आहे. ती प्रदीर्घ अनुभवावर आधारित आहे. सन २००० ते २०१८ या काळात एकंदर जगात या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण ३७ टक्क्यांनी कमी झालंच, पण एचआयव्हीशी संबंधित आजारांमुळं येणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही ४५ टक्क्यांनी घट झाली. औषधांमुळं याच काळात १३ कोटी ६० लाख जीव वाचले. या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि ज्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे अशांना योग्य औषधोपचार घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी समाजगटच प्रभावी काम करू शकतात, याची जाणीव झाली आहे. हे समाजगट कोणते? तर स्वानुभवांच्या आधारे प्रशिक्षण देणारे मित्र, या विषाणूचा संसर्ग झालेल्यांचे गट (उदा. समलिंगी संभोगी, शिरेतून अमली पदार्थ टोचून घेणारे, देहविक्रय करणारे), समुपदेशक, आरोग्यसेवक, दारोदारी जाऊन माहिती देणारे, विविध सामाजिक संघटना आणि तळागाळातले कार्यकर्तें! आज जगात एकंदर तीन कोटी ७९ लाख लोक एचआयव्हीसह नांदत आहेत. सन २०१८मध्ये१७ लाख लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आणि सात लाख ७० हजारजण या विषाणूशी संबंधित आजारांनी मरण पावले. मात्र आज ज्यांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, त्यातील ७९ टक्के लोकांची तपासणी होऊन त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं निश्चित झालं, त्यातील ६२ टक्के लोकांना औषधोपचार सुरू झाले आणि त्यातील ५३ टक्के लोकांच्या शरीरातील या विषाणूचं ओझं कमी झालं! या यशामागं आरोग्यसेवक, या विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांनी केलेली जागृती यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळंच जागतिक आरोग्य संघटनेनं आता या विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी ज्या विविध सूचना केल्या आहेत, त्यामध्ये या विविध समाजगटांना महत्त्वाचं स्थान आहे.



या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर सबंधिताला अनेक प्रकारची संधिसाधू संक्रमणं (अपॉर्च्युनिस्टिक इन्फेâक्शन्स) होण्याची संभाव्यता मोठी असते. याचं कारण या विषाणूमुळं त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारयंत्रणाच खिळखिळी केलेली असते. उंदीर-घुशींनी घराचा पाया आणि वासे पोखरले तर ते घर जसं सहजपणं पडतं, त्याचप्रमाणं या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला अनेक आजार झटकन होऊ शकतात. क्षय हा त्यातलाच एक रोग. त्यामुळं या विषाणूचा संसर्ग झालेल्यांनी क्षय रोगाची तपासणी करणं आणि त्यावरचे उपचार सुरू करणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी वरील समाजगटांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सामाजिक गटांच्या अशा विविधांगी कार्यातूनच या विषाणूच्या प्रसाराला रोखता येईल आणि ही साथ थांबविता येईल, असा विश्वास आता वाटू लागला आहे. तीन दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सुदैवानं या विषाणूवर परिणमाकारक औषधं निघाली, ती किफायतशीर दरात मिळू लागली. विविध देशांच्या सरकारांनी या विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली आणि आता त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. भविष्यात या विषाणूचं नाव इतिहासाच्या पुस्तकापुरतंच राहावं यादृष्टीनं आता प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीनं आजचा '

जागतिक एड्स दिन' महत्त्वाचा आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थिती काय आहे? सन २००१ सालानंतर आपल्या शेजारी देशांपेक्षा भारतानं एचआयव्हीचा संसर्ग कमी करण्यामध्ये लक्षणीय प्रमाणात यश मिळवले. सन २०१० ते २०१७ या काळात या विषाणूचा संसर्ग कमी होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी घटलं आणि एड्सशी संबंधित आजारांनी मरण पावण्याचं प्रमाण ५६ टक्क्यांनी कमी झालं! मात्र २०१७ सालामध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचं प्रमाण ८० हजारांवरून ८८ हजारांवर गेलं आणि एड्सशी संबंधित आजारांनी मृत्यू येणाऱ्यांची संख्या ६२ हजारांवरून ६९ हजारांवर गेली. आज भारतात २१ लाख लोक एचआयव्हीसह नांदत आहेत. त्यामध्ये अधिक प्रमाण हे स्त्रीवेश्या आणि समलिंगी संभोगी पुरुष यांच्यातच आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये आठ लाख ८८ हजार महिला आहेत. मात्र ज्यांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, त्यापैकी कितीजणांना त्याची जाणीव आहे, याचा तपास २०१७मध्ये केला गेला. तेव्हा असं दिसून आलं की ७९ टक्के लोकांना त्यांची स्पष्ट कल्पना आहे. ज्यांना संसर्ग झालेला आहे, त्यापैकी ५६ टक्के लोक उपचार घेत आहेत. ज्या गर्भार महिलांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, त्यातील ६० टक्के स्त्रिया उपचार घेत आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की या विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे समजल्यानंतर योग्य ते उपचार घेण्यामध्ये महिलाच आघाडीवर (६३ टक्के) आहेत, तर पुरुष (वय वर्षं १५ ते ४९) त्यामानाने मागे (५० टक्के) आहेत.

दुसरं असं की एचआयव्हीचा संसर्ग झालेल्यांना क्षय रोग होण्याची संभाव्यता मोठी असते. सुदैवानं त्यासाठी उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३.४ टक्क्यांवर आली. सन २०१५मध्ये तीच संख्या ३६.३ टक्के होती. याचाच अर्थ असा की या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एआरटी (अँटिरिट्रोव्हायरल थेरपी) आणि क्षयावर औषध घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण वाढणं म्हणजे आवश्यक तो औषधोपचार सहजपणं उपलब्ध होत आहे आणि तो घ्यायलाच हवा, याची जाणीव समाजामध्ये लोकशिक्षणामुळं झाली आहे, याची आश्वासक खूण आहे. आता यापुढंच ध्येय ठरविण्यात आलं आहे. ते असं की सन २०२०मध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांना त्याची स्पष्ट कल्पना असेल, त्यातील ९० टक्के लोक आवश्यक ती औषधं घेत असतील आणि त्यातील ९० टक्के लोकांमध्ये एचआयव्ही या विषाणूचं प्रमाण कमी करण्यात यश आलेलं असेल! ते उद्दिष्ट साध्य झालं तर या विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी ८१ टक्के लोक औषधोपचार घेत आहेत आणि ७३ टक्के लोकांमध्ये या विषाणूचं प्रमाण कमी झालेलं आहे, असं चित्र तयार होईल. या विषाणूच्या संसर्गाला पूर्ण अटकाव करून २०३० सालामध्ये एड्सची साथ एकंदरच माणसाच्या जगातून हद्दपार करण्याचं जे ध्येय निश्चित करण्यात आलं आहे, ते साध्य होऊ शकेल. त्या दिशेनं अन्य देशांबरोबर भारताची पाऊलं पडत आहेत, असं आज उपलब्ध असणारी आकडेवारी आपल्याला सांगत आहे. आपण यशस्वी होवू यात तीळमात्र शंका नाही.

Tuesday, 26 November 2019

DNA n RNA

📙 *मानवी जनुकांचा नकाशा व जैविक रेणू* 📙 
************************************

१९५३ साली डॉक्टर वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची मुलभूत आण्विक रचना जगासमोर मांडली. त्यानंतरची सुमारे ५० वर्षे मानवी जनुकांचा शोध घेण्यात गेली. अत्यंत चिकाटीचे असे हे काम वैज्ञानिकांच्या आवाक्यात आले, आहे असे २६ जून २००० रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जाहीर केले. हा दिवस शास्त्रज्ञांनी *'मानवी उत्क्रांतीचा सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस'* म्हणून साजरा केला. हे सारे काय आहे ?

 माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीत सजीवातल्या 'प्राणांचे' अस्तित्व असते. प्रत्येक पेशी तेच तेच अन्न मिळवते व बिनबोभाट कामही करत राहते. प्रत्येक पेशीचे हे काम शिस्तीत आणि इतरांच्या जोडीने जनुकांच्या इशाऱ्यावर चाललेले असते, ज्या पेशीत विभाजनाची क्षमता असते, त्यांच्यातील केंद्रक हा गोलाकार भाग असतो. सूक्ष्म नळ्या व पापुद्रे यांनी बनवलेली कोशिकांगे पेशीत असतात. यांना 'ऑर्गॅनेल्स' म्हणतात. त्यांपैकीच एक म्हणजे सूत्रकणिका म्हणजे मायटोकॉंड्रिया. केंद्रक व सूत्रकणिकेत आपली जनुके म्हणजेच डीएनएचे (डीऑक्सि रायबोन्यूक्लिक अॅसिड) विशिष्ट तुकडे एका पातळशा पडद्याआड बंदिस्त असतात.

शरीरातल्या सगळ्या पेशींच्या केंद्रांमध्ये डीएनएचा रेणू सारखाच असला, तरी तो ज्या पेशीत असतो, जी पेशी घडवणार असते, त्यानुसार त्याचे गुणधर्म प्रकट होतात. गर्भावस्थेच्या अगदी प्राथमिक स्थितीतच अवयवांचे अस्तित्व जाणवयाच्या आधीच साऱ्या पेशींनी आपापसात कोण बनायचे हे ठरवलेले असते. त्या पेशींची गर्भातली जागा आणि नियंत्रक जनुकांचा प्रभाव यानुसार पेशी ऊती अवयव संस्था शरीर बनते. त्यांमध्ये काही जनुके मुख्य बटणाची भूमिका बजावतात, तर काही विशिष्ट भागाच्या बटणाची. अशा पद्धतीत गर्भावस्थेपासून व त्यानंतरही असंख्य जनुकीय बदल नियंत्रितरित्या होतात व शरीराचे संवर्धन होत राहते. पेशींचे विभाजन होताना त्यांच्यातील डीएनए रेणूसुद्धा आपल्या दोन प्रती बनवतो. त्यातून पहिल्या पेशीचे सारे गुणधर्म दुसऱ्या पेशीकडे पोहोचतात. डीएनएचे घटक शरीररचनेतील अत्यावश्यक प्रतीने बनवतात. डीएनएमधील  (एटीजीसी) अॅडीनाईड, थायमाइन, ग्वानाइन, सायटोसिन या चार रासायनिक घटकांच्या विशिष्ट क्रमवारीत आनुवंशिकतेचा सारा अर्थ सामावलेला असतो. अत्यावश्यक अमिनो अॅसिड अशा प्रथिनांचा विशिष्ट क्रम विशिष्ट प्रथिन बनवतो. हा बदलला वा चुकला, तर त्यातून बनणारे प्रथिन, पेशी, अवयव हे सारे दिसण्यात, वागण्यात बदलू शकते.

 डीएनएचा रेणू इतर काही घटकांबरोबर लांबलचक दोऱ्याच्या गुंडाळीसारखा मुडपून, दुमडून वेढे घेत रंगसूत्रांच्या (क्रोमोझोम) स्वरूपात केंद्रात आढळतो. माणसाच्या पेशीत प्रत्येकी ४६ रंगसूत्रे असतात. त्यातील २३ आईकडून तर २३ वडिलांकडून घेतल्यावर दोघांचीही जनुके मुलांच्या व मुलीच्या पेशीत येतात. अशाप्रकारे प्रत्येक पेशीतील ४६ रंगसूत्रे व त्यावरची २५ ते २७ हजार जनुके या साऱ्याला 'जीनोम' असे म्हटले जाते.

समजा पुस्तकातील अक्षरांची उपमा द्यायची ठरवली तर हे २५ हजार अक्षरांचे पुस्तकच बनते. अक्षरांचा क्रम बदलला, तर अर्थ बदलतो, अर्थ बदलला तर अनर्थ होतो. म्हणजेच पेशीपासून बनलेले अवयव कमी प्रतीचे, चुकीचे काम करू लागतात. या बदलाला 'म्युटेशन' असे म्हणतात. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये म्हणजेच जनुकांच्या नकाशामध्ये या प्रत्येक अक्षराची जागा त्याचे काम व त्याचे निरोगी अवस्थेतील सर्वसाधारण क्रम नोंदवला गेला आहे. यात बदल आढळला, तर तो डीएनएच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेत शोधता येतो. त्यातून आजाराचे, दोषांचे स्वरूप कळते. डीएनए चाचणी केल्यास अनुवंशिकतेच्या म्हणजेच जनुकांच्या वरून मुलाचे वडील व आई यांची निश्चिती करणे आता शक्य झाले आहे. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत ही सोय झाली आहे. जनुकांचा नकाशा म्हणजे त्या त्या जिवांसंबंधातील एकत्रित संकलित संपूर्ण माहिती. कुठेही जपून ठेवता येण्याजोगी.

 जैविक रेणूंची बनलेली डीएनए व आरएनए म्हणजेच डीऑक्सीरायबो न्यूक्लिक अॅसिड व रायबोन्यूक्लिक अॅसिड हे प्रथिनांच्या साखळीने बनलेली असतात. जीवनाला आवश्यक अशी वीस अमायनो प्रथिने आहेत. याआधी पाहिलेल्या चारांचा (एटीजीसी) यात समावेश होतो. चयापचयाशी संबंधित प्राथमिक गोष्टींवर नियंत्रण व सहभाग हे त्यांचे सततचे काम. अन्नघटकातून आपण रोज त्यांची कमतरता भरून काढत असतो. या विसांपैकी कोणतेही एक कमी पडले, तर विशिष्ट लक्षणे सुरू होतात व आजाराला निमंत्रण मिळते. आरएनएचे काम पेशीतील प्रथिनांचा संचय राखणे हे असते. 

प्रत्येक जैविक रेणूमध्ये अमायनो घटक (-NH2) समूह व कार्बोक्झिल समूह (-COOH) असे असतात. अमायनो अॅसिडच्या रेणूंच्या साखळीने प्रीथिने बनतात. या साखळीतील छोटेमोठे असंख्य असे हजारांहून जास्त घटक असू शकतात. जी प्रथिने निव्वळ अमायनो अॅसिड बनतात त्यांना साधी सिंपल प्रथिने म्हणतात, तर अन्य बहुतेक कर्बोदके, फाॅस्फेट्स यांच्या बरोबरची संयुगे असतात.

Wednesday, 13 November 2019

मधुमेह

*१४ नोव्हेंबर*

*जागतिक मधुमेह दिन*

प्रत्येक सहा व्यक्तींमागे एकाला मधुमेह, ६६ टक्के मुलांच्या रक्तात अतिरिक्त साखर, प्रत्येक तीन मधुमेहींमध्ये एक निराशाग्रस्त.. जागतिक मधुमेह दिनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या नावाखाली गेल्या काही दिवसांत असे अनेक पाहणी अहवाल प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र ही जागृती सरकार किंवा सामाजिक संस्था वा सरकारी रुग्णालयांकडून नव्हे तर आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या, देशभरात जाळे असलेल्या प्रयोगशाळा तसेच प्रसिद्धीशरण काही डॉक्टरांकडून सुरू आहे. भारतीयांना मधुमेहाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आसुसलेल्या या संस्थांकडून या अहवालाच्या आडून स्वार्थच साधण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मधुमेहाचे देशातील वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे. शहरी भागांतील श्रीमंत व्यक्तींचा मानला जाणारा हा आजार ग्रामीण भागांतही पोहोचत आहे व त्यासाठी जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत. मधुमेहाबाबत आजही अज्ञान असल्याने जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपायांची जागृती होणे गरजेचे आहे. मात्र या दिनाचा आधार घेत स्वतची तुंबडी भरण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्या, औषध कंपन्या, प्रयोगशाळा सरसावल्या आहेत आणि जनसंपर्क कंपन्यांना हाताशी धरत प्रसिद्धी माध्यमांकरवी विविध भयचकित करणाऱ्या पाहण्यांचे निष्कर्ष गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

जनजागृती न करता भीती निर्माण करून त्यातून नफा कमावण्याचा हा उद्योग आहे. मधुमेहाला कारणीभूत ठरणारे आहार, व्यायाम, जीवनशैली याबाबत जागृती न करता साखरेशी नाते जोडून त्यातून औषधे तसेच उत्पादने खपवण्यासाठी या पाहण्यांचे घोडे दामटले जाते. मुळात या पाहण्यांना शास्त्रीय निकष नसतो. तुम्ही वर्षभरात कधी निराश झाला होता का, अशा प्रकारची प्रश्नावली वापरून निराशाग्रस्त माणसांची पाहणी केली तर आपण सर्वच निराशाग्रस्त ठरतो. त्यामुळे मधुमेहाबाबत जागृती व भीती यातील फरक समजून घेतला पाहिजे, असे वर्धा येथील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. पी. कलंत्री यांनी सांगितले.

मधुमेहच नाही तर अनेक आजारांचा बाऊ करत ग्राहकांना भीती घातली जाते. वर्षांला तब्बल ऐंशी पाहण्यांचे पॅकेज देणाऱ्या प्रयोगशाळाही आहेत. मुळात यापैकी ८० टक्के पाहण्यांची रुग्णाला गरजच नसते. दहामध्ये एखाद्या पाहणीतील निष्कर्ष थोडे पुढे- मागे होऊ शकतात. मात्र त्याचा बाऊ करत रुग्णाला अधिकाधिक पाहण्या व त्यानंतर उपचारांसाठी तयार केले जाते.

हृदयरुग्णांवरील पन्नास टक्के अ‍ॅन्जिओप्लास्टी निर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन या काही लाखांच्या शस्त्रक्रिया होतात, असेही ते म्हणाले.

अहवालांचा फुगा आणि वास्तव

’ पाहणी – १५ वर्षांपर्यंतच्या ६६ टक्के मुलांच्या रक्तत अतिरिक्त साखर.

’ वास्तव – भारतात लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ०.५ टक्क्यांहून कमी आहे. ज्या प्रयोगशाळेने ही पाहणी प्रसिद्ध केली तिथे २०१२ ते २०१४ या वर्षांमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले. त्यातही या तीन वर्षांत एकाच मुलाचे किती वेळा नमुने तपासणीसाठी आले याचा कोणताही उल्लेख पाहणीत नाही. त्यामुळे आजारी मुलांच्या पाहणीतून निष्कर्ष काढून तो सरसकट सर्व मुलांना लावला गेला आहे.

सहा भारतीयांमागे एक मधुमेही

चाळीशी पार केलेल्या शहरी भागांतील व्यक्तींसाठी ही पाहणी साधारणपणे लागू होते. मात्र त्याचा कोणताही उल्लेख केला जात नाही. चाळीस वर्षे पूर्ण केलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरी भागात साधारणत १२ ते १५ टक्के तर ग्रामीण भागात ७ ते १० टक्के लोकांना मधुमेह असण्याची शक्यता आहे.

****

तीन मधुमेहींमागे एक निराशाग्रस्त

दर तीन मधुमेहींमागे एक निराशाग्रस्त असल्याचा निष्कर्ष कोणत्याही पाहणीअंती निघालेला नाही. विविध पाहण्यांचा एकत्रित अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढण्याची पद्धत वापरून ही माहिती देण्यात आली आहे. निराशा हा आजार शोधण्याची पद्धतीही काही वेळा अशास्त्रीय असू शकते.

अनेक पाहण्या या विशिष्ट गटाशी संबंधित असतात. त्यांना प्रातिनिधिक किंवा शास्त्रीय म्हणता येणार नाही. आहार, विहार यासोबत योग्य औषधांमुळे मधुमेह काबूत ठेवता येतो.


Thursday, 7 November 2019

Human heart

     मानवी हृदय

*आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.*

*आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.*

*न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?*

*हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACTION होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.* 

*जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.*

*जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी  धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.*

*या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULATE चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULATE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.*

*त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.*

*या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध  MEDICATION उपलब्ध नाही. त्यापासुन सुरक्षित रहाण्यासाठी ध्यानधारणा MEDITATION हाच एकमेव  उपाय आहे.*

Request - Please Read above message which is scientifically True & share to maximum*Why Meditation Necessary?*

*आपल्या जन्माच्या आधीपासुन मरे पर्यंत आपलं हृदय सतत कार्यरत असतं. हृदय दररोज़ ७००० लीटर रक्त पंप करते (यापैकी ७०% रक्त मेंदुला लागते आणि बाकी शरीराला ३०% रक्त मिळते) आणि ७०,००० किमी पेक्षाही लांब रक्तवाहीन्यांमधे प्रवाहीत करते. १ टन वजन ४२ फूट ऊंची पर्यंत उचलण्यासाठी जितकी शक्ति आवश्यक असते तितकी शक्ति हृदय त्याच्या कार्यातुन दररोज निर्माण करते.*

*आपण थकल्यावर आराम करतो पण हृदयाने जर ४ - ५ मिनीटं आराम केला तर आपला कायमचा आराम होऊन जाईल.*

*न थकता हृदय कसे काय बरे कार्य करत असेल?*

*हृदय सतत कार्य करू शकते कारण ते अनुशासनाच्या, DISCIPLINE च्या आधारावर कार्य करते. सामान्य NORMAL परिस्थितीमधे हृदय ०.३ सेकंद आकुंचन CONTRACTION होते म्हणजे PUMP करते आणि ०.५ सेकंद प्रसरण पावते किंवा आराम करते RELAX होते. या हिशोबाने ०.३ + ०.५ = ०.८ सेकंदात हृदयाचा एक ठोका BEAT पूर्ण होतो म्हणजे एका मिनीटात ७२ ठोके होतात जे सामान्य NORMAL असतात. आरामाच्या ०.५ सेकंदात अशुध्द रक्त फुफ्फुसात जाऊन १००% शुद्ध होऊन येते.* 

*जर काही कारणाने शरीराला कमी वेळात जास्त रक्तपुरवठ्याची गरज DEMAND असेल तर हृदय जास्त रक्त PUMP करण्यासाठी आरामाची वेळ कमी करतं. अश्या परिस्थितीत आराम ०.४ सेकंद झाला तर हृदयाचा एक ठोका ०.७ सेकंदा त पूर्ण होऊन दर मिनीटाला ही संख्या ८२ च्या वर जाते आणि केवळ ८०%च रक्त शुध्द होतं.*

*जर आरामाची वेळ ०.३ सेकंद झाली तर ६०% च रक्त शुद्ध होते. म्हणजे अश्या घाईगर्दीच्या असामान्य स्थितीत,२०% किंवा ४०% अशुद्ध रक्त रक्तवाहीन्यांमधे PUMP केलं जातं आणि ती अशुद्धि रक्तवाहीन्यांमधे चिकटुन सामान्यपणे लवचिक ELASTIC स्वरूपाच्या असलेल्या रक्त वाहीन्या कठीण PLASTIC स्वरूपाच्या बनत जातात. कालांतराने रक्तवाहीन्या इतक्या कठीण बनतात कि रक्तात एखादी गाठ वाहत आली (कि पूर्वी  धमनीच्या लवचिक स्वभावामुळे सहज निघुन जात असे) कि अडकुन रक्ताचा प्रवाह रोखते किंवा BLOCK करते - या स्थितिला हृदय विकाराचा झटका HEART ATTACK म्हणतात.*

*या हिशोबाने विचार केला तर लक्षात येईल कि हृदय विकाराचे मूळ कारण शरीराकडून किंवा मेंदुकडुन होणारी सामान्यपेक्षा वाढीव रक्ताची मागणी DEMAND हेच आहे. जेव्हा मेंदुची हालचाल ACTIVITY STIMULATE चलायमान होते तेव्हा त्याची रक्तपुरवठयाची मागणी सामान्यपेक्षा खूप वाढते. BRAIN ACTIVITY STIMULATE होण्यासाठी आपला आहार DIET केवळ २५% ते ३०%च जबाबदार आहे आणि ७०% ते ७५% आपले विचार, भावना, दृष्टिकोण, स्मृति जबाबदार आहेत.*

*त्यामुळे ज्यांना आपले हृदय दीर्घकाळ स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यांनी चिंता, क्रोध, उदासी, घाईगर्दी (जल्दबाजी) आणि भावनात्मकदृष्टया संवेदनशिल SENSITIVE स्वभाव यांच्यापासुन स्वतःला सुरक्षित ठेवावे.*

*या पाच गोष्टींपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही औषध   उपलब्ध नाही. 

Friday, 1 November 2019

notes links

BIOLOGY Chapter wise notes 

✓Plant morphology
https://drive.google.com/open?id=1WVJVR5caSoXp_1UwJyO6EqVMx5cQ_upt
✓Plant anatomy
https://drive.google.com/open?id=1mZV-xt5kvYI6dFCQDUlGFqL-0YrqVywi
✓Animal diversity
https://drive.google.com/open?id=1kUU_VJkRCcs713BOmx5dq3ZZyyxazswH
✓Animal tissue
https://drive.google.com/open?id=1b9-P6pNW75TaySLTlPqdLxPsEeT84pa1
✓Digestive system
https://drive.google.com/open?id=1hr8ldXVn7_jK5fCa36z_XGpKVhT75B0X
✓Embryology
https://drive.google.com/open?id=1pdqpiP84twmb5DudcN6eSEl7CuRV0cMv
✓Endocrine system
https://drive.google.com/open?id=1OO1g24x-8OoqId-q04rUR_fVVR-R1pJb
✓Nervous system
https://drive.google.com/open?id=1OlRP9PGLtzuzEplrkqbT5EWOwh1eWzjl
✓Evolution and mutation
https://drive.google.com/open?id=1XR-37x4Op8tw5oHHwrw2HMOTiNvtciOo
✓Reproductive system
https://drive.google.com/open?id=1susqpRJZ7nnc_NjsUSXhgcc7Y4_pdE5f
✓Circulatory system
https://drive.google.com/open?id=1JK1zriM47uENrejCoAFCTWhr099eqE82
✓Genetics
https://drive.google.com/open?id=1pnCjxTb0rhkekFVtCqaLGaXDu5f-w04W

Wednesday, 16 October 2019

Paralysis

*पक्षाघात (पॅरालिसिस) हा आजार कसा होतो ?*
***********************************

'अंगावरून वारे गेले आहे,' असा शब्दप्रयोग तुम्ही अनेकदा ऐकलेला असेल. या प्रकारचा आजार म्हणजेच पक्षाघात होय. शरीराचा काही भाग अचानक लुळा पडणे, काम करेनासा होणे, त्याची ताकद जाणे अशी लक्षणे या आजारात दिसून येतात. त्याची कारणे लुळ्या पडलेल्या भागात नसून थेट मेंदूशी संबंधित आहेत.

मेंदूमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये दोन प्रकारचे बिघाड संभवतात. एक म्हणजे रक्तदाब वाढला किंवा रक्तवाहिनीचे आवरण पातळ झाले व वयोमानामुळे झीज झाली, तर अशी वाहिनी फुटून रक्तस्राव सुरू होतो. मेंदू कवटीमध्ये बंद अवस्थेत असल्याने अशा रक्तस्रावामुळे आतील दाब वाढू लागतो. ज्या वाहिनीतून रक्तपुरवठा केला जात असतो, तोही बंद होतो. या साऱ्याचा एकत्रित परिणाम मेंदूच्या कार्यावर होऊ लागतो. कवटीच्या आतील दाब प्रमाणाबाहेर वाढला, तर शरीरातील महत्त्वाची कार्ये म्हणजेच श्वसन, हृदयक्रिया यांवर परिणाम होऊ शकतो. त्याचा शेवट मृत्यूत होतो. पण दाब वाढणे व रक्तस्राव थांबणे या दोन्ही गोष्टी एकमेकींवरच अवलंबून असल्याने अनेकदा रक्तस्राव थांबतो पण त्या भागातील मेंदूच्या पेशी मृत पावतात.

दुसऱ्या प्रकारात एखादी रक्तातील छोटी गुठळी अतिशय महत्त्वाच्या अशा रक्तवाहिनीत अडकून रक्तपुरवठा बंद होतो. काही वेळा कोलेस्ट्रोलसारख्या पदार्थाचे आवरण साचून मानेतील कॅरॉटीड रक्तवाहिन्या आकाराने लहान होत जातात. या आवरणाचे सुटलेले छोटे तुकडेही एखाद्या रक्त वाहिनीत अडथळा निर्माण करू शकतात. असे झाल्यास तेवढ्याच भागाचा रक्तपुरवठा बंद होऊन तेथील मज्जापेशी मृत पावतात.

मेंदूतील रक्तस्राव झालेल्या रुग्णास वाचवणे कठीण असते, पण गुठळी होऊन झालेल्या पक्षाघातात योग्य व तातडीच्या उपचारांचा फायदा होऊ शकतो. मेंदूचा उजव्या भागात इजा झाली, तर डावा भाग लुळा पडतो वा त्याच्या उलट होते. काही वेळा पक्षाघात अगदी सौम्य असेल, तर हाताचा काही भाग, बोटे यांतीलच शक्ती जाते. पक्षाघाताची तात्कालिक जाणीव करून देणारी गंभीर लक्षणे काही रुग्णांत दिसतात. ट्रान्झियंट इस्केमिक अॅटॅक किंवा काही क्षण मेंदूच्या रक्तपुरवठ्यात तात्पुरता अडथळा असे स्वरूप असल्याने त्या काही सेकंदांपुरता रुग्ण बेशुद्ध होणे, ताकद जाणे, तोल जाणे असे परिणाम होतात. सिटी स्कॅन, एमआरआय, सेरेब्रल एन्जिओग्राफी, क्ष-किरण तपासणी यातून व मानेच्या रक्तवाहिन्या कलर डाॅपलर पद्धतीत तपासून पक्षाघाताचे निदान व पूर्वतपासणी करून प्रतिबंध शक्य असतो. मधुमेह, रक्तदाब, भावना यांवर नियंत्रण ठेवणे या तीन गोष्टी पक्षाघात टाळण्यासाठी अत्यावश्यक ठरतात.

पक्षघाताचा रुग्ण पूर्ववत काम करायला लागणे या दिशेने उपचारांचे स्वरूप असते. मात्र रुग्ण कधीच पूर्णतः पूर्ववत होऊ शकत नाही. फिजिओथेरपीचे व्यायाम, स्नायू आखडू न देणे, यासाठी मसाज, रुग्णाचे मनोबल वाढवणे यांवर भर द्यावा लागतो. काही रुग्णांचे मलमूत्रविसर्जन व बोलणे या दोन्हीवरचे नियंत्रण गेलेले असते. अशांची रुग्णसेवा अत्यंत कठीण भाग असतो.

कंबरेखाली दोन्ही पायांतील ताकद जेव्हा एकाच वेळी जाते, तेव्हा सहसा मज्जारज्जूचा आजार व त्याला इजा वा बिघाड झालेला असतो. या प्रकारात मेंदूचा संबंध येत नाही. पाठीच्या मणक्यांना झालेली दुखापत त्याला कारणीभूत असते.

Thursday, 10 October 2019

Cloning .......Dolly sheep 🐑

*** डॉलीची गोष्ट*

‘क्लोनिंग’ म्हणजे सजीवांच्या हुबेहूब प्रती तयार करण्याचे तंत्र. १९९७ साली स्कॉटलंडमधील रोझलीन इन्स्टिटय़ूटच्या इयान विल्मुट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या क्लोनिंगच्या यशस्वी प्रयोगावरील शोधनिबंध ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्याअगोदर दहा वर्षे या संशोधकांचे क्लोनिंगद्वारे मेंढीच्या निर्मितीचे प्रयत्न चालू होते. या काळात या संशोधकांनी मेंढीची प्रत तयार करण्याचे सुमारे पावणे तीनशे प्रयत्न केले.

या प्रयोगासाठी ‘फिनिश डॉर्सेट’ या जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीचा वापर केला गेला. प्रथम त्यांनी या मेंढीच्या आचळातील पेशी काढून घेतल्या. त्यानंतर ‘स्कॉटिश ब्लॅकफेस’ या काळे तोंड असणाऱ्या जातीच्या मेंढीचे फलन न झालेले बीजांड घेतले. या बीजांडाचे केंद्रक काढून टाकण्यात आले. या दोहोंचे फलन घडवून आणण्यासाठी पेशी आणि बीजांड एकमेकांच्या जवळ आणण्यात आले. विद्युत स्पंदाद्वारे हे बीजांड पेशीच्या पटलातून आत ढकलण्यात आले. यामुळे पेशी आणि बीजांड एकत्र येऊन त्यांचे फलन घडून आले. बीजांड आणि पेशीच्या फलनातून तयार झालेल्या पेशीची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही, याचे सहा-सात दिवस प्रयोगशाळेतच निरीक्षण केले गेले. त्यानंतर ही फलित पेशी दुसऱ्या एका स्कॉटिश ब्लॅकफेस जातीच्या पाहुण्या मेंढीच्या गर्भाशयात प्रस्थापित केली गेली. गर्भारपणाचा सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यावर या ब्लॅकफेस मेंढीने, जिच्या आचळाच्या पेशी वापरल्या होत्या त्या फिनिश डॉर्सेट जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीला जन्म दिला. तिचेच नाव ‘डॉली’! डॉली ही मूळ फिनिश डॉर्सेट मेंढीची हुबेहूब प्रत होती. ही डॉली एकूण पावणेसात वर्षे जगली. फुप्फुसाचा विकार व तीव्र संधिवात जडल्यामुळे डॉलीला मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्लोनिंगमध्ये अपत्याच्या पालकाच्या केंद्रकातील डीएनएचा क्रम राखला जात असल्याने, जन्माला येणाऱ्या अपत्यात आणि त्याच्या पालकात अतिशय साम्य असते. डॉलीच्या क्लोनिंगच्या अगोदर, दोन्ही पेशी भ्रूणस्थितीतील घेऊन त्यांचे क्लोनिंग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात केंद्रक काढून टाकलेल्या बीजांडाशी एखाद्या भ्रूणाच्या केंद्रकसहित पेशीचा किंवा फक्त त्यातील केंद्रकाचा संयोग घडवून आणला जातो. अशी उदाहरणे १९५०-६० च्या दशकांपासून आढळतात. परंतु क्लोनिंगच्या तंत्रात स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या मीलनातून गर्भधारणा केली जात नाही. क्लोनिंगच्या तंत्राचे वेगळेपण हेच आहे!

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...