Saturday, 6 June 2020

पर्यावरण दिनानिमित्त

।श्रीराम।



वटपौर्णिमा 

*वटपौर्णिमा  व  'जागतिक पर्यावरण दिन'*

              आपण हिंदू लोकं उत्सवप्रिय आहोत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण विज्ञानाधिष्ठीत आहेत. सर्व सण कौटुंबिक वातावरण उबदार करणारे आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. हिंदूंचा कोणताही सण घेतला तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक आशयच प्रगट होत असतो हे  आपल्या लगेच लक्षात येईल. मग ती दिवाळी असो शिमगा, मकरसंक्रांत असो की रक्षाबंधन, गणपती असो की गोपाळकाला!! आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव शिकवतात. *'ज्याला कृष्णाचा 'काला' समजला त्याला वेगळी 'राष्ट्रीय एकात्मता' शिकविण्याची बिलकुल गरज नाही'* असे एक वचन प्रसिद्ध आहे.
         *कुणाला चुकून जरी पाय लागला तर नुसते 'क्षमस्व' किंवा आजच्या नवीन पिढीच्या आंग्लमिश्रित भाषेत तोंडदेखलं 'सॉरी' म्हणणारी आपली संस्कृती नाही तर अतीव नम्रतेने 'नमस्कार' करणारी आपली संस्कृती आहे*. अशा प्रकारचा व्यवहार अथवा परंपरा आपल्याला इतरत धर्मात अथवा उपासना पद्धतीत बघायला मिळत नाही. इतक्या सूक्ष्म स्तरावर समोरील मनुष्याच्या भावभावनांचा विचार करणारी दुसरी संस्कृती ह्या भूतलावर नक्कीच नसेल. असे असूनही परकियांपेक्षा आपले लोकच आपल्या धर्मावर जास्त टीका करतात, याचे नवल वाटते. टीका करणे आपण एक वेळ समजू शकतो, पण आज  कोणताही हिंदू सण आला की त्याला विरोध करणारे एकवटतात आणि हिंदू धर्म कसा विज्ञानविरोधी आहे, अंधश्रद्धाळू आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे असे सांगण्याची तथाकथित बुद्धिजीवी लोकांची अहमहिका सुरु होते. आजची प्रसारमाध्यमे तर हिंदूधर्माला नावे ठेवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे असे समजून ह्यावर निरर्थक चर्चा झोडतात. जेष्ठ पौर्णिमेला जिवंत वडाची पूजा करणे ही अंधश्रद्धा मानणारी तथाकथित पुढारलेली ( 'अतिप्रागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी' ) मंडळी २५ डिसेंबरला मात्र कृत्रिम 'ख्रिसमस ट्री' बनविताना आणि आकाशातून 'सांताक्लाज' नावाचा कोणी  'देवदूत' येईल या आशेने त्याच्या येण्याची वाट पाहतांना मात्र आपल्या दृष्टीस पडतात. अशा वेळी त्यांच्या (अ)वैज्ञानिक दृष्टिकोनाची कीव येते. 
                ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. ह्या वटपौर्णिमा असेही म्हणतात. सुवासिनींनी वडाची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा आणि एकूणच त्या दिवशी 'व्रत' धरावे अशी अपेक्षा असते. चातुर्मासाच्या पुस्तकात सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील आहे. कहाणीत सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू होतो. सावित्रीला हे समजल्यावर ती यमाकडे जाते आणि आपल्या पतीला जीवनदान मिळवून परत स्वगृही घेऊन येते अशा अर्थाची ही कथा आहे. ज्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो ते झाड वडाचे होते, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. भाविकांनी ती कहाणी अवश्य वाचावी.
*"सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|*
*तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|*
*अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |*
*अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||"*
वरील प्रार्थना वटपोर्णिमे संदर्भात आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया  *`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे'*, अशी प्रार्थना करतात.
                आजच्या काळात आपल्याला या व्रताचा आणि त्या कहाणीचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. त्याआधी वड या झाडाचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत. वडाचे बीज अतिसूक्ष्म असते, पण त्यातून निर्माण होणारा वृक्ष हा अतिविशाल असतो. वड ही अधिकाधिक प्राणवायु देणारी वनस्पति आहे, त्याचे आयुष्य साधारणपणे हजार ते अकराशे वर्ष असते. वैशाख वणव्यातून बाहेर पडून धरती पावसासाठी आसुसलेली असते. *दोन ऋतूंमधील संधिकाल असल्यामुळे  वातावरण प्रकृतिला त्रासदायक असते. काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस सुद्धा झालेला असतो. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मनुष्याला अधिक प्राणवायुची (शुद्ध वातावरणाची) गरज असते आणि ती पुरवण्याची क्षमता फक्त वडात आहे. मनुष्याने या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात जावे, प्राणवायू अव्याहतपणे पुरविणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात यावे हा ह्या व्रताचा मूळ उद्देश!*. वडाला पारंब्या असतात त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड होतो. विस्तार जरी प्रचंड झाला तरी तो कधी पडत नाही कारण तो वृक्ष आपल्या पारंब्यांच्या आधारावर जमिनीवर दिमाखात उभा राहतो. वड, पिंपळ या सारख्या मोठ्या वृक्षांची लागवड मुद्दाम गावाबाहेर केली जाते. वडाच्या मुळाबाजूच्या मातीत देखील प्राणवायू आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते हे आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. नायट्रोजनयुक्त माती खत म्हणून उपयुक्त असते. वडाच्या प्रारंब्यांपासून बनविलेले तेल केसांसाठी उपयुक्त आहे. 'पुसंवन' विधीमध्ये देखील वडाच्या कोवळ्या अंकुराचा उपयोग केला जातो. वडाच्या पारंब्यांचा कितीही विस्तार झाला तरी मूळ खोड कायम सतेज आणि मुख्य आधारस्तंभाच्या स्वरुपात तसेच राहते. वडाची मूळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कायम राखली जाते. वडाचे आणिक बरेच उपयुक्त गुणधर्म आहेत जे खास स्त्रियांसाठी गुणकारक आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते अभ्यासू मंडळींकडून जाणून घ्यावेत. सध्याच्या काळात सिमेंटच्या जंगलामध्ये राहणाऱ्या आणि मातीशी नाळ तुटलेल्या आजच्या आधुनिक पिढीला झाडाझुडांची ओळख तरी कशी होणार ? आणि झाडांची ओळखच नसेल तर त्याचा खरा उपयोग कोणाला कळणार? 
               श्री गोंदवलेकर महाराजांचे एक वचन आहे. *'आजपर्यंत हिंदू धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच'*. पण आज मात्र हिंदूधर्माच्या सण आणि परंपरांवर घाला घातला जात आहे आणि आपल्या सुशिक्षित माता भगिनी त्यास बळी पडत आहेत. आपल्याला पुन्हा सनातन वैदिक हिंदू धर्माला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आपल्या सर्व सणांचा आजच्या काळानुरूप अर्थ लावावा लागेल आणि  त्याचा प्रचार आणि प्रसार करुन येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत ते योग्य मार्गाने पोहचवावे लागेल. नवीन पिढी कुशाग्र आहे त्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांची सयुक्तिक उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत अन्यथा येणारी पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.
                  खरंतर *'वटपौर्णिमा' हाच वैश्विक पर्यावरण दिन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.* सध्या आपण ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. *वटपूजनाचा मूळ उद्देश हा आहे की सर्वांना वृक्षांचे महत्व कळावे, वन (वृक्ष) साक्षरता वाढावी. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची काळजी आपण ज्या आत्मीयतेने काळजी घेतो तितक्याच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने आपण वृक्षांचे, वनांचे, वन्यजीवांचे पर्यायाने एकूणच वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असे हा सण आपल्याला सांगतो. आजची एकूणच पर्यावरणाची स्थिती बघितली, तर वृक्षसंवर्धन अमूल्य आहे याची आपणा सर्वांना निश्चितच जाणीव आहे. ही जाणीव मात्र आपल्याला जागतिक तापमान वाढायला लागल्यानंतर झालेली आहे. हे सर्व 'तहान लागल्यावर विहिरी खणण्यासारखे'* आपण करीत आहोत. आपल्या पूर्वसूरींना मात्र खूप आधीपासून याची जाणीव होती. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही ही 'जाणीव' त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली आणि श्रद्धेने तिचे पालन केले जाईल असे बघितले, नव्हे ती जाणीव समाजमनात रुजवली. आज एखादी नवीन प्रणाली आत्मसात करुन ती आपल्या घरात रुजविणे किती जिकरीचे आहे, याची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे दर १५ किमी. वर बोली भाषा बदलते, अशा ठिकाणी वृक्षसंवर्धन करण्यासाठी एखाद्या 'कहाणी'चा पूर्वसूरींनी आधार घेतला असेल तर ते सयुक्तिकच मानले पाहिजे. त्यांनी ही संकल्पना तत्कालीन समाजात रुजवली, संवर्धित  केली आणि आज सुद्धा हे व्रत केले जात आहे याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी असले पाहिजे. 
                ज्याप्रमाणे घरातील जेष्ठांना सर्वात आधी नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे जंगलातील जेष्ठ अशा वडाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणे अपेक्षितच आहे. *म्हणून 'वडाचेच पूजन का?' हा प्रश्नच गैर आहे असे वाटते*. पूर्वी व्रतवैकल्ये प्रामुख्याने महिला करीत असत त्यामुळे हे व्रत महिलांकडे आले असावे. उपवास हा यातील गौण मुद्दा आहे. स्त्रीला धरित्रीची उपमा दिली जाते. स्त्री हीच जन्मदात्री आहे. *निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे मातृत्व अर्थात नवनिर्मिती करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता!!!*
            स्त्री नैसर्गिक गुणानेच सहनशील आणि संयमित आहे. आपल्याकडे कोणतेही देवकार्य, देव पुजन स्त्रीला सोबत घेतल्याशिवाय केले जात नाही. दुर्दैवाने पत्नी हयात नसेल तर सुपारी सोबत घेऊन विधी केले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत 'स्त्री'ला लक्ष्मी मानली जाते. स्त्री जशी 'कोमल' ह्रदयी आहे तशी ती वेळप्रसंगी 'दुर्गा'ही होऊ शकते. जन्म देणे आणि संगोपन करणे ही कला स्त्रीला (मादी) निसर्गानेच बहाल केली आहे. *चार मुलं एकत्र येऊन आईला सांभाळू शकत नाहीत पण एक आई मात्र चार मुलांना आज सुद्धा सांभाळते.*  स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केले तर सर्व कुटुंब ते सहज स्वीकारेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन होईल असाही सुप्त उद्देश त्यामागे असावा असे वाटते. *कोणत्याही गोष्टीचे 'मर्म' न घेता नुसतेच कर्म केले गेले तर योग्य तो लाभ होऊ शकत नाही.*
         हिंदुधर्म पुनर्जन्म मानणारा आहे. *वडाची वाढणारी प्रत्येक पारंबी ही मनुष्याचा नवीन जन्म सूचित करणारी आहे असे मानले तर सात जन्माचे रहस्य आणि वटपूजा आणिक स्पष्ट होईल*. गीतेत भगवंतांनी सांगितले आहे की आत्मा मरत नाही तर तो वस्त्र बदलावे, त्याप्रमाणे फक्त शरीर (योनी) बदलत असतो. नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. पारंब्या कितीही वाढल्या तरी वड आपले मूळ खोड विसरत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही वेळा जन्म घेतला आणि तरीही तो आपल्या मूळ स्वरूप असलेल्या 'आत्मारामा'स विसरला नाही तर त्याला 'स्व'रूपाची नक्कीच ओळख होईल. *आत्मारामाची ओळख करून घेण्यातच  मानवी जीवनाचे सार्थक आहे. मनुष्य योनीत जन्मास येऊनच रामाने देवत्व प्राप्त केले. त्यामुळे आजच्या शुभदिनी प्रत्येक जोडप्याने असा दृढनिश्चय करावा की आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आमचे ध्येय एकच असेल ते म्हणजे 'आत्मारामाची भेट' !!!*
          *ज्या काळातील ही कथा आहे. त्या काळातील  मनुष्याचे आयुर्मान विचारात घेतले तर ते सरासरी १४० वर्षाचे होईल आणि वडाच्या झाडाचे एकूण आयुर्मान आपण १००० वर्षे पकडले तर  सात जन्म पुरेल इतके होईल. वटवृक्षाप्रमाणे आपला वंश किमान सात जन्म अर्थात हजार वर्षे  तरी टिकावा किंवा त्याचा वडाच्या पारंब्यांप्रमाणे वंशविस्तार व्हावा म्हणून हे व्रत !! कोणत्याही सजीवास आपला वंश वाढावा असे वाटणे नैसर्गिकच आहे, नाही का ?* 
     पूर्वी लग्न ही 'संस्कार' म्हणून केली जात असतं. वंशविस्तार आणि समाजधारणा हा लग्नसंस्काराचा प्रधान हेतू होता. तसेच तत्कालीन व्यवस्थेत मुलीला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या काळी पतीलाच देव अथवा गुरू मानले जाई. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मूलभूत अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील होता. पतिसेवा हाच स्त्रियांचा धर्म मानला जाई. भगवान दत्तात्रेयांच्या आईची अर्थात माता अनुसयेची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहे. देवत्व प्राप्त करणे हे गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून असा गुरू (आवडीचा पती) मला पुढील सात जन्म तरी मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असणे गैरलागू कसे होऊ शकते? आपण कोठे प्रवासास निघालो तर सोबतीला आपण आपल्या विश्वासाचा मनुष्य बरोबर घेतो. कारण आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी आपली त्यामागील भावना असते. इथे आपल्याला 'मनुष्यत्व ते देवत्व' असा प्रवास करायचा आहे अर्थात 'आनंताचा' प्रवास करायचा असेल तर आपण निवडलेला आपल्या आवडीचा सोबती प्रवास संपेपर्यंत अर्थात जिवाशिवाचे मिलन होईपर्यंत सोबत रहावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वडाभोवती सूत गुंडाळण्यामागे पुर्वजांची संकल्पना अशी होती की वटवृक्षाला शिवाचे प्रतिक मानले जाते, वडाचे खोड सछिद्र असते त्यामुळे त्यास सूताने गुंडाळत फेरी मारणे हे जिवाशिवाचे मिलन झाल्याचे प्रतीक मानले जाई. भगवान शंकराचे मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक क्षमता आपणांस प्राप्त व्हाव्यात ही भावना सुद्धा त्यामागे आहे. म्हणूनच पुर्वी पतीपत्नी दोघेही वडाला सूत गुंडाळत आणि प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणे हे मोटर फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या वडाची सर्व ऊर्जा प्रदक्षिणा घालणाऱ्यास अनायासे मिळत असते.
            आज विवाहामागील  'संस्कार' लुप्त होत चालला असून ती आज एक प्रकारची व्यवस्था किंवा सर्वमान्य तडजोड ठरते आहे की काय याची भीती वाटू लागली आहे.* सध्याचे कुटुंबातील वातावरण, एकूण सहजीवन आणि वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण बघितले तर ही भीती खरी आहे असे वाटू लागते. आज विभक्त कुटुंब पद्धती रुजू पहात आहे. बदलत्या काळानुसार काही प्रमाणात ते अपरिहार्यही झाले आहे. म्हणून आज 'वटपौर्णिमा' साजरी करीत असताना फक्त महिलांनीच याचा विचार न करता संपूर्ण कुटुंबानी आणि एकूण समाजाने याचा विचार करावा असे वाटते. व्यावहारिक अडचण असल्यामुळे दूर गेलेली कुटुंब या निमित्ताने एकत्र यावीत आणि वडाच्या पारंब्याप्रमाणे एकमेकांना आधार देत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करून आपले कुटुंब भक्कम आणि उबदार करण्याचा प्रयत्न केला जावा असे या सुचवावेसे वाटते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने विश्वमान्य असलेली आपली 'कुटुंब व्यवस्था' अधिक सक्षम आणि सुसंस्कारित करण्याचा संकल्प आजच्या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा अशी मनीषा व्यक्त करतो.
आपल्या 'कुटुंबरुपी' वडाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आपल्या कुटुंबाचा समाजातील प्रत्येक घटकाला आधार वाटावा असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, यातूनच वटवृक्ष बहरेल यात तीळमात्र शंका नाही.


Friday, 5 June 2020

पर्यावरण दिनानिमित्त

मराठी विज्ञान परिषद
      पर्यावरणीय माहिती प्रणाली*

पर्यावरणाचा सातत्याने होत असलेला ऱ्हास आणि मानवी आरोग्यावर तसेच इतर जैविक संसाधनांवर याचे होत असलेले गंभीर दुष्परिणाम हा गेल्या काही दशकांपासून चिंतेचा विषय झाला आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनातील धोरणकर्ते, राज्यकर्ते तसेच पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक-विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक या सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय राखणे गरजेचे आहे. या साऱ्यांना पर्यावरणविषयक शास्त्रीयदृष्टय़ा अचूक आणि परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दिल्यास त्यांना विविध समस्यांची व्याप्ती कळेल आणि त्या अनुषंगाने पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेता येईल.

हेच उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने १९८२ च्या डिसेंबरमध्ये ‘पर्यावरणीय माहिती प्रणाली’ (एन्व्हॉयर्न्मेंटल इन्फॉर्मेशन सिस्टीम- एन्व्हिस) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत पर्यावरणविषयक माहिती शासकीय संकेतस्थळांवर संकलित करून अद्ययावत केली जाते. पर्यावरणाशी संबंधित विविध क्षेत्रांतील शास्त्रीय माहिती विविध मार्गानी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. ही संकलित माहिती धोरणात्मक निर्णय घेणारे अभियंते आणि शास्त्रज्ञांनाही उपयुक्त ठरते. यासाठी विविध पर्यावरणविषयक मुद्दय़ांवरील माहितीचा संग्रह, त्यांची संगतवार मांडणी आणि विविध पर्यावरणीय विषयांचा प्रसार यासाठी एक परिपूर्ण कार्यजाळे (नेटवर्क) तयार करण्याची योजना या उपक्रमात आखण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध संकेतस्थळे आणि ऑनलाइन डेटाबेस यांचाही समावेश यात करण्यात आला आहे.

हे काम विकेंद्रित स्वरूपात चालते. मंत्रालय स्तरावर नियंत्रण करणारे मुख्य केंद्र आणि देशाच्या विविध भागांत विषयानुरूप उभारण्यात आलेली केंद्रे अशी या उपक्रमाची रचना आहे. प्रदूषण, घातक रसायने यांमुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय समस्या असोत की पर्यावरण संवर्धनासाठी केले जाणारे कल्पक प्रयत्न किंवा पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाचा वापर असो; त्यांसंदर्भातील माहितीचे संकलन करणे, त्या त्या पर्यावरणीय विषयातील पुस्तके, अहवाल, लेख आदी संदर्भसाहित्याचा संग्रह करणे, आवश्यक असेल तेव्हा ही किंवा अन्य माहिती केंद्रीय स्तरावर उपलब्ध करून देणे ही देशभर विखुरलेल्या ‘एन्व्हिस’ केंद्रांची जबाबदारी असते. तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून पर्यावरणीय माहितीचा समृद्ध स्रोत निर्माण करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.

महाराष्ट्रात अशा प्रकारचे ‘एन्व्हिस’ केंद्र २००३ पासून कार्यरत झाले. या केंद्राद्वारे http:// www.mahenvis.nic.in/ या संकेतस्थळावर पर्यावरणविषयक अहवाल, मूलभूत माहिती, कायदे, योजना, बातम्या, छायाचित्रे, विविध संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २०१० पासून या केंद्रामार्फत पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निबंध, लेख, घोषवाक्य तसेच छायाचित्र स्पर्धाचे आयोजन केले जाते.

Tuesday, 26 May 2020

Biodiversity

       जैवविविधता.. निसर्गाची सहकारी बँक!*
आपल्या भोवतालच्या सुंदर निसर्गाचा ‘बँकिंग’ किंवा ‘अर्थशास्त्र’ यांसारख्या तुलनेने रुक्ष वाटणाऱ्या विषयांशी ‘अर्था’अर्थी काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भारतात अतिशय विपुल प्रमाणात जैविक संसाधने आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात आपण त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापर करत असतो. अर्थव्यवस्था व जैवविविधता यांचा घनिष्ठ संबंध आहे. परंतु या जैविक संसाधनांना मानवाने आतापर्यंत  कधी ‘किंमत पट्टी’ (प्राइज टॅग) लावलेली नाही; त्यामुळे त्यांची किंमत कळालेली नाही!

वास्तविक जगात महाजैवविविधता असलेल्या १७ देशांमध्ये भारताचा समावेश असून आतापर्यंत वनस्पतींच्या ४५ हजार, तर प्राण्यांच्या ९१ हजार प्रजातींची अधिकृतरीत्या नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जगातील जैवविविधतेच्या एकूण ३६ हॉटस्पॉट्सपैकी चार हॉटस्पॉट्स भारतात आहेत.

परंतु गेल्या काही दशकांमध्ये जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यांसारख्या नैसर्गिक घडामोडींमुळे आणि प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेच्या सातत्याने होत असलेल्या ऱ्हासाचे देशाच्या अर्थकारणावर होणारे दुष्परिणाम लक्षात येत गेले आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याची निकड जाणवू लागली. राज्यकर्त्यांना आणि धोरणकर्त्यांना हे गणित समजावून सांगण्यासाठी जैवविविधतेचे रीतसर मूल्यमापन आणि जागतिक बाजारपेठेत त्याची ‘किंमत’ ठरवण्यासाठी आता देश-विदेशातील अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. यामध्ये नुकतेच ‘टायलर’ पुरस्काराने सन्मानित झालेले आणि जागतिक ख्यातीचे ‘हरित अर्थतज्ज्ञ’ म्हणून ओळखले जाणारे पवन सुखदेव आघाडीवर आहेत. जैवविविधतेचे मूल्य मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांनाही त्याचे महत्त्व कळावे यासाठी त्यांनी २००८ साली संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाच्या पुढाकाराने एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाने ‘पर्यावरणाचे अर्थशास्त्र’ या विद्याशाखेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत जैवविविधतेचे जतन करण्याचे महत्त्व पटू लागले. आजघडीला भारतात आणि इतर देशांमध्येदेखील आशिया डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक या व इतर अनेक संस्थांमध्ये पर्यावरणाच्या अर्थतज्ज्ञांना मोठी मागणी आहे. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖

Wednesday, 22 April 2020

23 April



*२३ एप्रिल*

*जागतिक पुस्तक दिन (World Book Day)*
               वाचनसंस्कृती

  United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर यांचा आज जन्मदिवस व  इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे
लेखक, कवी , प्रकाशक , मुद्रक आणि वितरक यांचे महत्व अधोरेखित करणे.
लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे. मला इयत्ता पाचवीत निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे  पारितोषिक मिळाले आणि तेंव्हा पासूनच खऱ्या अर्थाने माझे लेखन सुरु झाले. तेंव्हापासून आजपर्यंत गेल्या 40 वर्षांत मी अनेक काव्य, निबंध , ललित लेख लिहिले. त्यातील काही बक्षिसप्राप्त ठरले, काही प्रसिद्ध झालेत , तर काही पुन्हा एकदा लिहावे असे वाटले.
ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे
त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.
वाचन म्हणजे एका व्यक्तीचे विचार, मते व्यक्त केल्यानंतर त्या विचारांचा  प्रवेश आपल्या मनात होत असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं. आपले अनुभव विश्व अधिक समृद्ध होते व आपण मनन,चिंतन, मंथन करून वर्तनात बदल घडवून आणतो.
        वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच. ज्यामुळे वाचकांना एका उच्च प्रतीची तात्विक बैठक लाभते. याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनातच नव्हे तर समाज मनावर परिणाम होतो, यात तिळमात्र शंका नाही. वाचनाचे व्यसन वाढविण्यासाठी आपण  प्रयत्न केले पाहिजेत. उदा. शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे पुस्तकांच्या स्वरूपात देण्यात यावीत, कुणालाही वाढदिवशी पुस्तकेच भेट द्यावीत.
सर्वांना वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  श्रीमती मेघा अनिल पाटील
      उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार
मोबाईल  नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com

जागतिक वसुंधरा दिन

     22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन....
          *वसुंधरा दिन*

    ‘अर्थ डे’ अर्थात ‘वसुंधरा दिवस’.. नावच किती अर्थपूर्ण आहे! सजीव सृष्टी ज्या पृथ्वीवर अवतरली आहे तिचा हा दिवस! तिचे ऋण व्यक्त करण्या साठी चा  दिवस  ! का बरे साजरा करायचा हा दिवस? निसर्ग-पर्यावरण आणि मानव यांच्यातले नाते अधोरेखित करण्यासाठी आपण दोन प्रकारचे उत्सव साजरे करतो. पहिल्या प्रकारात एखाद्या प्राणी, वनस्पती, पक्षी यांचे अस्तित्व अधोरेखित करणारे दिवस; तर दुसऱ्या प्रकारात विशिष्ट पर्यावरणीय समस्येबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता विशद करणारे दिवस. पण ‘वसुंधरा दिन’ हा आगळावेगळा आहे; कारण तो वरील दोन्ही प्रकारांत मोडणारा आहे. पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात १९७० साली अमेरिकेत झाली. वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली .त्यांनी अमेरिकेतील दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना पर्यावरणाच्या समस्येबाबत जागृत केले,प्रदूषण आणि वन्यजीवांचा नाश  या मुद्द्यावर  तेथील सर्वच स्तरावरील लोकांनी आवाज उठवला. पहिला वसुधंरा दिन तिथे तब्बल २० लाख लोकांनी साजरा केला. शहराशहरांत लोकांनी एकत्रितपणे पर्यावरणीय हानीकडे धोरणकर्त्यांचे लक्ष वेधले. या कृतीमुळे तिथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. या रेटय़ामुळे लवकरच अमेरिकेत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काही आवश्यक कायदे करणे सरकारला भाग पडले. पर्यावरणरक्षण यंत्रणासुद्धा स्थापन करण्यात आली. पुढे १९९० च्या दशकापासून जवळपास जगभर हा दिवस दरवर्षी साजरा होत आहे. २०१६ साली जगातील १२० हून अधिक देशांनी एकत्र येत याच दिवशी हवामान बदलविषयक ‘पॅरिस कृती करार’ केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचे संचालन ‘अर्थ डे नेटवर्क’ ही संघटना करते. यंदा या संघटनेने वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी दिलेले संकल्पसूत्र आहे- ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’!
           हवामान बदलाचे परिणाम आपण गेल्या काही वर्षांपासून ठळकपणे पाहत आहोत. त्याची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आता आपल्याला बसू लागली आहे, हेही आपण अनुभवत आहोत. यावर उपाय म्हणजे निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन! आजच्या ५० व्या वसुंधरा दिनानिमित्ताने त्या दृष्टीने आपण काय करू शकतो?
       सध्या करोना संकटातील टाळेबंदीमुळे आजचा वसुंधरा दिन साजरा करताना सामूहिक कृतीला मर्यादा आहेत. पण त्यामुळे मिळालेला मोकळा वेळ म्हणजे वसुंधरेचा, निसर्गाचा विचार करण्याची संधी आहे. या काळात प्रदूषणात झालेली घट आणि त्याचे सुपरिणाम आपण अनुभवत असालच! ते अनुभवताना हवामान बदलाचे परिणामही समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नैसर्गिक संसाधनांचा संयत वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर, वृक्षलागवड अशी काही पावले येत्या काळात उचलता येतील. याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबवणे आणि रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे अशा घातक कृतींना थारा न देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. एकुणात, प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच आहे ही भावना मनात कायम ठेवायला हवी!
 पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.याचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे उद्दिष्ट आहे .
उचलून भार तुमचा, थकली वसुंधरा!
भारे प्रदूषणाचे, आता पुरे करा!!
जल,वायु भ्रष्ट झाले , अतिरेक आवरा!
दिनी आजच्या तरी रे, संकल्प  करा!!
झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा
प्लास्टिकचा वापर कमी करूया,
सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त करुया,
सार्वजनिक वाहनांचा वापर करूया,
वाढते प्रदूषण कमी करूया,
सगळे मिळून शपथ घेऊया,
पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर करूया 
वसुंधरेला वाचवा! जीवन आनंदी बनवा!! 
जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Wednesday, 15 April 2020

कोरोना व्हायरस -- क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

Corona virus and Quarantine  

  क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे

नेमकं काय?

'क्वारंटाईन' होणं म्हणजे काय?

क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.
  क्वारंटाईन का केलं जातं?
कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये .आजारी व्यक्तीच्या संपर्कात सामान्य व्यक्तीने येऊन आजाराची बाधा होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका असतो.     यासंबंधी विषाणू तज्ञांच्या मते , "खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स   सहा ते सात फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा ते सात म्हणूनच  फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. रुग्णाच्या संपर्कात सर्वसामान्य  व्यक्तीने येऊ नये .रुग्णाचा संपर्क टाळला तर संसर्ग टाळू शकतो. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं ."       प्रत्येकाने क्वारंटाईन होणे गरजेचे नाही. पण एखाद्याला त्रास होत
असल्यास तो व्यक्ती घरच्याघरीही काळजी घेवू शकतो. कुटुंबीयांपासून
सहा
अंतर ठेवावं. घरी वावरतानाही तोंडावर रुमाल बांधावा. आपलं 
अंथरूण पांघरून , आपले कपडे ,रुमाल व इतर साहित्य वेगळं ठेवावं.जर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर
सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधा."तुम्हाला जर 'क्वारंटाईन' होण्यास सांगितलं तर ?खालील काळजी घ्या. क्वारंटाईन होण्यासाठी तुम्हाला एका बंद खोलीत रहावं लागेल.
ज्याचा दरवाजा बंद असेल, पण खिडक्या तुम्ही उघड्या ठेवू शकता.खोलीच्या बाहेर शाळा, महाविद्यालय, कार्यालय कुठेही तुम्हाला जाता
येणार नाही.तुम्हाला भेटायला येण्याची परवानगी कुणालाही नसेल.
अगदी तुमच्या कुटुंबालाही नाही.तुम्हाला स्वतंञ शौचालय वापरावं लागेल.
तुम्ही इतर कुणाचाही टॉवेल वापरणार नाही याचीही काळजी घ्या.तुम्ही जर कोरोनाग्रस्त असाल तर तुमचा कचरा दोन पीशव्यांमध्ये
बांधला जाईल याची काळजी घ्या.तुमची मदत करणा-यांना कोणतही पार्सल दरवाजाबाहेर ठेवायला सांगा.क्वारंटाईन व्हायची वेळ आली तर मनाची तयारी कशी कराल?सर्वप्रथम सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा व मनाची तयारी करायची
की कोणत्याही परिस्थितीत मी या आजारातून बरा होणार आहे.
शेवटी आपली प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही आजाराला
व बिकट परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन  आपण सामना करू शकतो.
म्हणून क्वारंटाईन होण्यासाठी सांगितल्यावर सर्वप्रथम मनाची तयारी
असणं महत्वाचं आहे. कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढू नये
म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगितले जात असले, तरी संबंधित व्यक्तीच्या
मनावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. पण अशावेळी आपण
मानसिकरित्या खचून जावू नये.     "क्वारंटाईन म्हणजे आपल्याला काही झालंच आहे असं नाही, हे लक्षात घ्यायला हवं. क्वारंटाईनमुळे तुमच्या मनावर दडपण येवू शकतं त्यासाठी मनोरंजनाची साधनं वापरा. तुमचा विरंगुळा होईल अशा गोष्टी सोबत ठेवा. पुस्तकं वाचा.छंद जोपासा. आपल्या आवडीचे गाणे म्हणा. फिल्म पहा, शिवाय, रुग्णालयातही संबंधिताचे समुदेशन होणं गरजेचं आहे. मनावर सारखं दडपण येत राहीलं की कुणाशी तरी फोनवर संपर्कात रहा . बोलत रहा." आपण हे सर्व आपल्या मोबाईल द्वारे सुद्धा करू शकतो. या काळात मोबाईल आपला जवळचा मित्र होऊ शकतो. वरील सर्व विवेचन आपणास मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. 
 प्रा. मेघा अनिल पाटील 
श्रीमती पी. . सो. सार्वजनिक मराठी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नवापूर 
जिल्हा- नंदुरबार.
क्वारंटाईनबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही परिपञक जारी केले
आहे. क्वारंटाईन कसं व्हावं ? त्यासाठीचे मार्गदर्शक पञक सरकारकडून
जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार,1.क्वारंटाईन राहण्यासाठी सांगितल्यावर संबंधित व्यक्तीने हवेशीर बंद
खोलीत रहावं. शक्यतो एकटं रहावं, कुटुंब सदस्य असल्यास त्याने
1 मीटरपर्यंत अंतर ठेवणे गरजेचे आहे. शक्यतो स्वतंत्र शौचालय वापरावं.2.घरात फिरण्यावर बंधनं घाला, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ
नका.3.सर्जिकल मास्क वापरावं, दर 6-8 तासाने सर्जिकल मास्क बदलावे.4.मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (5%) अथवा सोडियम
हयपोक्लोराईट (5%) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावं. नंतर ते
जाळावं अथवा पुरावं, वापरलेलं मास्क हे संक्रमित असू शकतं.5.केवळ डॉक्टरांनी परवानगी दिलेली व्यक्तीच क्वारंटाईन असलेल्या
व्यक्तीशी संपर्क करु शकते.6.क्वारंटाईन व्यक्तीचे कपडे वेगळे ठेवा. त्यांची खोली, शौचालय ब्लीच
सोल्यूशन अथवा फेनॅलीक सोल्यूशनने साफ करा.  क्वारंटाईन होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं. वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं. क्वारंटाईला 'मेडिकल आयसोलेशन' असंही म्हटलं जातं.   

Sunday, 12 April 2020

skeleton and movements: Disorders

 Skeleton and Movements

   Disorders related to muscles

1) Muscular dystrophy :
*It is a gradual wasting disease affecting various groups of muscles.
* It is genetically inherited problem running in families.
* usually voluntary skeletal muscles are weak and where as internal muscles search as diaphragm are      not affected .
*Duchenne type usually occurs in boys due to it's  inheritance affecting lower limb.
*limb girdle muscular dystrophy affects the muscles of shoulders for hips. This is usually among adults of 20 to 35 years.
*No treatment appears to cure the disease.
 2) Myasthenia gravis:
* It is a weakness of skeletal muscles.
*It is caused by an abnormality at the neuromuscular junction that partially blocks contraction.
*It is an autoimmune disorder caused by an excess of certain antibodies in the blood stream.
*That antibodies bind to acctylecholine  receptors of neuromuscular  junction .
*Thus transmission of nerve impulses to the muscle fibres is blocked.
*This causes progressive and extensive muscle weakness.
* It may affect the eye and eyelid movements , facial expressions and solving the degree of muscles weakness vary from local to general.
*Symptoms:
  *Ptosis also known as diplopia double vision.
*Difficulty in swallowing ,chewing and speech.

Disorders related to bones:

   1) Arthritis:

An inflammation of joints

*Painful disorder of bones, ligaments, tendons etc .

* Joints become swollen ,stiff cand painful.

*Leads to disability.

*Three types of arthritis, as below:

(a) Osteoarthritis:
*Joint cartilage is degenerated due to various factors such as aging, obesity,muscle weakness. etc.
*Most common type of arthritis affecting hands, knees and spine.
(b) Gouty arthritis (Gout):
*Joint pain  due to deposition of uric acid in joints.
*Excess production of uric acid or it's accumulation without excretion
causes painful  joints.
*Uric acid is stored as sodium urate
which degenerates cartilage, causing Inflammation and pain .
*Joints of feet are affected .
(c) Rheumatoid arthritis:
*It is autoimmune disorder where body 's immune system attacks it's own  tissues.
*Synovial membrane swells up and secrets extra synovial fluid.
*Excess fluid exerts pressure on joint making it painful.
*Abnormal granulation tissue called pannus  may develop.
* Pannus erodes cartilage.
*Fibrous tissue may be ossified leading to stiffness in joints.

2) Osteoporosis:    
  *Bones become porous and brittle.
  *Primary age-related ,more common  in  women  than men.
  * With advancing age , bone resorption is faster than the bone formation.
*Bones does loose mass and become brittle.
*Calcium is lost in urine,sweat to the greater extent as compare to that which is gained through diet.
*Consuming adequate amount of calcium and exercise at young age does becomes preventive measure to osteoporosis.
*Decreasing estrogen secretion after menopause is also a cause of osteoporosis in middle aged women.
*Deficiency of vitamin D ,low calcium diet ,decrease secretion of sex hormones and thyrocalcitonin are some of the causative factors of osteoporosis.
*Osteoporosis cause  fractures  lead to shrinkage of vertebrae, height loss ,hunched back and bone pain .



Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...