*लेखक, ब्लॉगर, कवी, स्थंभलेखक, वैचारिक लेखक इ. साठी विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवर आपले साहित्य प्रसिद्ध करण्याची संधी*
खालीलपैकी आपल्या आवडीच्या विषयावर आपले लेख, कथा, कविता, विचार इ. लिहा आणि आम्हाला ईमेलवर पाठवा. सर्व पात्र साहित्य, वि.म. परिषदेच्या ब्लॉगवर आपल्या नाव, ईमेल आणि संपर्क क्रमांकासहित प्रसिद्ध केले जाईल. त्याचबरोबर परिषदेच्या सोशल मिडियावर शेअर केले जाईल.
*📌खालील नियम व सूचना वाचा आणि आपले साहित्य पाठवा*
१) या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
२) आपले साहित्य पुढील ब्लॉगवर प्रसिद्ध होणार आहे. – https://www.vishwamarathiparishad.org/blog
३) कथा / लेख इ. किमान ५०० आणि कमाल २००० शब्दांचे असावेत.
४) कविता लेखन - किमान १२ ते कमाल ३० ओळी
५) *आपले साहित्य फक्त* vmparishad@gmail.com *या ईमेलवरच पाठवायचे आहे.*
६) खाली दिलेल्या विषयांव्यतिरिक्त इतर लिखाण पाठवू नये.
७) साहित्य *युनिकोड* मध्ये टाईप करुन इमेलवर पाठवा. PDF/Image पाठवू नये.
८) इमेलमध्ये आपले नाव, मोबाइल/व्हॉट्सअप क्रमांक, स्त्री/पुरुष, शहर ही *माहिती* पाठवावी. साहित्य आणि माहिती एकाच इमेलमध्ये पाठवावी. खालीलपैकी कोणत्या विषयावर लेखन केले आहे तो विषय नमूद करावा.
९) लेखन व्यवस्थित टाईप करावे. सुटसुटित मांडणी, योग्य ठिकाणी परिच्छेद, व्याकरण इ. काळजी घ्यावी. शक्य असल्यास लेखासंबधित संलग्न चित्र / कव्हर फोटो पाठवावा.
१०) एक व्यक्ती एकच लेख/कथा/कविता पाठवू शकते. परिषदेचे आजीव सभासद असाल तर सर्व विषय मिळून एकूण १० लेख/कथा/कविता पाठवू शकता.
११) इमेल पाठवताना ईमेलचा विषय – *“वि.म.प ब्लॉगसाठी - <* आपल्या लेख/कवितेचे नाव *>”*.
१२) या उपक्रमाला मुदत नाही. प्रथम प्रवेश, प्रथम प्राधान्य असेल. दररोज सुमारे ३ ते ५ पोस्ट प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
१३) आपल्या लिखाणामध्ये सकारात्मकता असावी. भारतीय संस्कृती, देश, परंपरा इ. विषयी आदर असावा. समाजात तेढ वाढविणारे नसावे.
१४) साहित्य स्वीकारण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय विश्व मराठी परिषदेच्या संपादकीय मंडळाचा असेल. त्याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.
१५) न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण
*विषय:*
▪️साहित्य, संस्कृती आणि ग्रामिण संस्कृती/परंपरा
▪️लोकसाहित्य
▪️सामाजिक ज्वलंत विषय
▪️करिअर आणि कौशल्ये
▪️शैक्षणिक उपक्रम
▪️युवकांची स्वप्ने आणि समस्या
▪️उद्योजकता
▪️सामाजिक विषमता
▪️उत्सवांचे बदलते स्वरुप
▪️आरोग्य
▪️नागरिकांचे कर्तव्य व अधिकार
▪️कायदे साक्षरता
▪️सामाजिक साक्षरता
▪️पौराणिक इतिहास
▪️आध्यात्म व धार्मिक विषय
▪️पर्यावरण
▪️जीवनशैली आणि व्यवस्थापन
▪️सांस्कृतिक इतिहास
▪️सांस्कृतिक पर्यटन / प्रवास वर्णन
▪️अध्यात्म व धार्मिक विषय
▪️विविध भारतीय कला
▪️लोकनाट्य, नृत्य
▪️मानसशास्त्र
▪️विनोदी ललित साहित्य
▪️कुटुंब शिक्षण / कल्याण
▪️आयुष्यातील प्रेरणादायी घटना
▪️मला आवडलेले पुस्तक
_सहभागी व्हा तसेच वाचक म्हणून सुद्धा ब्लॉग वाचा, प्रतिक्रिया द्या, आवडले तर शेअर करा._
*विश्र्व मराठी परिषद*
व्हॉट्सअॅप: 7066251262
संकेतस्थळ: www.vishwamarathiparishad.org
हे आवाहन आपल्या अधिकाधिक साहित्यिक मित्रांना शेअर करा.
No comments:
Post a Comment