Saturday, 2 January 2021

आपण पाणी किती वापरतो?

 *आपण किती पाणी वापरतो?* 
***********************************

जगात उपलब्ध असलेला पाण्याचा साठा जर आपण जपून आणि उधळमाधळ न करता वापरला तर सगळ्यांना पुरून उरेल एवढा आहे. त्यामुळेच आपण किती पाणी वापरतो, याची मोजदाद करण्याची आवश्यकता भासते. यात अर्थात समानता नाही. काही देश कितीतरी पाणी वापरतात, तर काहींना थेंबार्थेबासाठी झगडावं लागतं. पिण्यासाठी, धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी आपण जे पाणी वापरतो ते सहज मोजता येतं; पण त्याव्यतिरिक्त प्रत्येक देशात उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी पाण्याचा वापर होत असतो. म्हणूनच जागतिक संघटनेनं वाॅटर फूट प्रिन्ट' हे एकक विकसित केलं आहे. त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाण्याचा वापर तसंच आयात केलेल्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी वापरलेलं पाणी आणि निर्यात केलेल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरलेलं पाणी या सर्वांची बेरीज-वजाबाकी करून त्या त्या देशानं वापरलेल्या पाण्याचे मोजमाप केलं जातं.

यानुसार जगाचा सरासरी वॉटर फूट प्रिन्ट दरडोई दर वर्षी १,२४३ घनमीटर असल्याचं दिसून आलं आहे. पण एकट्या अमेरिकेचा वॉटर फूट प्रिन्ट याच्या दुप्पट म्हणजे २,५०० घनमीटर आहे. दोन ऑलिंपिक दर्जाच्या तरणतलावातलं पाणी प्रत्येक अमेरिकन नागरिक दर वर्षी वापरतो. आपल्या ओळखीच्या एककात सांगायचं तर प्रत्येक अमेरिकन दर वर्षी २५ लाख लिटर पाण्याचा बापर करतो. याउलट युगांडा, इथियोपिया यांसारख्या आफ्रिकेतल्या देशांमध्ये हे प्रमाण पंधरा लिटरसुद्धा पडत नाही. भारत, चीन यांसारख्या आशियातील जास्त लोकसंख्या असलेल्या आणि उभरत्या अर्धव्यवस्थेच्या देशांमध्येही हे प्रमाण ७०० ते ९०० घनमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा कमी आहे.

अमेरिकेतील जास्त वापर हा मुख्यत्वे त्यांच्या आहारातील गोमांसाच्या अतिरेकी प्रमाणामुळे आहे. हार्ड नसलेल्या एक किलोग्राम गोमांसाच्या उत्पादनासाठी तब्बल १६००० लिटर पाण्याची गरज असते. म्हणजेच एका हॅम्बर्गरसाठी २४०० लिटर पाणी बापरलं जातं. त्यामुळेच अमेरिकेतल्या दर घरटी दर दिवशी पावणेसहा लिटर पाण्याचा उपसा होतो.

आपल्या देशात हे प्रमाण ९०० घनमीटर इतकं आहे. तरीही आपल्या जवळजवळ संपूर्ण शाकाहारासाठी लागणाऱ्या भाज्या, डाळी व तांदूळ, गहू यांसारख्या पिकांसाठी सिंचनासाठी फार मोठ्या प्रमाणावर जमिनीखालील पाण्याचा उपसा केला जातो. गेली काही वर्ष तर ज्या वेगानं या पाण्याचा साठा जमिनीखाली होत असतो त्याहीपेक्षा जास्त वेगानं उपसा केला जात आहे, त्यामुळे हे साठे आटत चालले आहेत. त्यावर तोडगा म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण करण्याचा, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा. या बाबतीत देशानं परिणामकारक उपाय योजले आहेत, असा निर्वाळा जागतिक संघटनेनं दिला आहे. तरीही हे प्रयत्न अधिक जोमदार होण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...