Monday, 13 July 2020

Appendix-Symptoms n surgery

 *अपेंडीक्स म्हणजे काय?*
*ते काढण्याचे कारण काय?*
*******************************

अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिलप्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.

अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटीसारखा वा करंगळीप्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच!

काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशींसारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.

अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपेंडीसायटीस असे म्हणतात. यात पोटात बेंबीखालील उजव्या भागात दुखते. ही वेदना तीव्र असते. सामान्यपणे उलटीसुद्धा होऊ शकते. पोटाचा तो भाग ताठर व दुखरा होतो. त्या व्यक्तीस बराच तापही असतो. त्यामुळे या व्याधीचे निदान झाल्यावर ते काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. कारण असा त्रास रुग्णास वारंवार होऊ शकतो व त्याचा परिणाम म्हणून गंभीर गुंतागुंती होऊ शकतात.

परंतु पोट दुखत असल्यास अपेंडीसायटीस असेल, असा गैरसमज करून घेणे योग्य नाही. पोटात दुखण्याची बरीच कारणे आहेत. पोटातील जंत, आमांश अशी कारणे आपल्याकडे बहुतांशी आढळतात.

आजकाल अपेंडिक्स काढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. विनोदाने अपेंडिक्स शल्यचिकित्सक यांची रोजीरोटी म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातही धंदेवाईकपणा वाढत चालल्याने रुग्णाने असे ऑपरेशन करून घेण्यापूर्वी २-३ तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनावश्यक शस्त्रक्रिया टळू शकतो.

Friday, 3 July 2020

लेख

*लेखक, ब्लॉगर, कवी, स्थंभलेखक, वैचारिक लेखक इ. साठी विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवर आपले साहित्य प्रसिद्ध करण्याची संधी*

खालीलपैकी आपल्या आवडीच्या विषयावर आपले लेख, कथा, कविता, विचार इ. लिहा आणि आम्हाला ईमेलवर पाठवा. सर्व पात्र साहित्य, वि.म. परिषदेच्या ब्लॉगवर आपल्या नाव, ईमेल आणि संपर्क क्रमांकासहित प्रसिद्ध केले जाईल. त्याचबरोबर परिषदेच्या सोशल मिडियावर शेअर केले जाईल. 

*📌खालील नियम व सूचना वाचा आणि आपले साहित्य पाठवा*
१) या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

२) आपले साहित्य पुढील ब्लॉगवर प्रसिद्ध होणार आहे. – https://www.vishwamarathiparishad.org/blog

३) कथा / लेख इ. किमान ५०० आणि कमाल २००० शब्दांचे असावेत.

४) कविता लेखन - किमान १२ ते कमाल ३० ओळी

५) *आपले साहित्य फक्त* vmparishad@gmail.com *या ईमेलवरच पाठवायचे आहे.*

६)  खाली दिलेल्या विषयांव्यतिरिक्त इतर लिखाण पाठवू नये.

७) साहित्य *युनिकोड* मध्ये टाईप करुन इमेलवर पाठवा. PDF/Image पाठवू नये.

८) इमेलमध्ये आपले नाव, मोबाइल/व्हॉट्सअप क्रमांक, स्त्री/पुरुष, शहर ही *माहिती* पाठवावी. साहित्य आणि माहिती एकाच इमेलमध्ये पाठवावी. खालीलपैकी कोणत्या विषयावर लेखन केले आहे तो विषय नमूद करावा.

९) लेखन व्यवस्थित टाईप करावे. सुटसुटित मांडणी, योग्य ठिकाणी परिच्छेद, व्याकरण इ. काळजी घ्यावी. शक्य असल्यास लेखासंबधित संलग्न चित्र / कव्हर फोटो पाठवावा.

१०)  एक व्यक्ती एकच लेख/कथा/कविता पाठवू शकते. परिषदेचे आजीव सभासद असाल तर सर्व विषय मिळून एकूण १० लेख/कथा/कविता पाठवू शकता. 

११)  इमेल पाठवताना ईमेलचा विषय – *“वि.म.प ब्लॉगसाठी - <* आपल्या लेख/कवितेचे नाव *>”*. 

१२)  या उपक्रमाला मुदत नाही. प्रथम प्रवेश, प्रथम प्राधान्य असेल. दररोज सुमारे ३ ते ५ पोस्ट प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

१३) आपल्या लिखाणामध्ये सकारात्मकता असावी. भारतीय संस्कृती, देश, परंपरा इ. विषयी आदर असावा. समाजात तेढ वाढविणारे नसावे.

१४) साहित्य स्वीकारण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय विश्व मराठी परिषदेच्या संपादकीय मंडळाचा असेल. त्याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.

१५) न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण

*विषय:* 
▪️साहित्य, संस्कृती आणि ग्रामिण संस्कृती/परंपरा
▪️लोकसाहित्य
▪️सामाजिक ज्वलंत विषय
▪️करिअर आणि कौशल्ये
▪️शैक्षणिक उपक्रम
▪️युवकांची स्वप्ने आणि समस्या
▪️उद्योजकता
▪️सामाजिक विषमता
▪️उत्सवांचे बदलते स्वरुप
▪️आरोग्य
▪️नागरिकांचे कर्तव्य व अधिकार
▪️कायदे साक्षरता
▪️सामाजिक साक्षरता
▪️पौराणिक इतिहास
▪️आध्यात्म व धार्मिक विषय
▪️पर्यावरण
▪️जीवनशैली आणि व्यवस्थापन
▪️सांस्कृतिक इतिहास
▪️सांस्कृतिक पर्यटन / प्रवास वर्णन
▪️अध्यात्म व धार्मिक विषय
▪️विविध भारतीय कला
▪️लोकनाट्य, नृत्य
▪️मानसशास्त्र
▪️विनोदी ललित साहित्य
▪️कुटुंब शिक्षण / कल्याण 
▪️आयुष्यातील प्रेरणादायी घटना
▪️मला आवडलेले पुस्तक

_सहभागी व्हा तसेच वाचक म्हणून सुद्धा ब्लॉग वाचा, प्रतिक्रिया द्या, आवडले तर शेअर करा._

*विश्र्व मराठी परिषद*
व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262
संकेतस्थळ: www.vishwamarathiparishad.org

हे आवाहन आपल्या अधिकाधिक साहित्यिक मित्रांना शेअर करा.

Sunday, 14 June 2020

पर्यावरण शिक्षण

*पर्यावरण शिक्षणाचा निर्णय*

मानव आणि निसर्ग व पर्यावरण यांच्यातील दुरावलेल्या नातेसंबंधांचा नव्याने मागोवा घेण्यासाठी आणि या नातेसंबंधांतील निसटलेले दुवे शोधून ते पुन्हा जोडता येतील का याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा १९७२ साली जून महिन्यात स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जागतिक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत ११२ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. या परिषदेचे सकारात्मक परिणाम लवकरच दृश्य स्वरूपात जाणवू लागले. या ऐतिहासिक परिषदेनंतर जागतिक पातळीवर निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धन करण्याच्या हेतूने भारतासारख्या राष्ट्रांनी अनेक महत्त्वाचे कायदे केले. भारतीय संविधानात १९७६ साली या अनुषंगाने ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या ‘मूलभूत कर्तव्यां’त अनुच्छेद ५१ अ(ग) जोडण्यात आले. यानुसार ‘वने, सरोवरे, नद्या आणि वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे’ हे नागरिकांचे कर्तव्य ठरते. परंतु नागरिकांना या तरतुदींची जाणीव करून देऊन त्यांच्यात निसर्गारक्षणाप्रति संवेदनशीलता जागरूक करण्यासाठी आणि त्यांना ‘पर्यावरण साक्षर’ बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण, अभ्यासक्रम गरजेचा होता. याच दरम्यान पर्यावरण हा स्वतंत्रपणे शिकवण्याचा विषय होणे आवश्यक आहे आणि हा विषय औपचारिक अथवा अनौपचारिकरीत्या अगदी लहान, संस्कारक्षम वयोगटातील मुला-मुलींपासून ते तरुण त्याचप्रमाणे वयस्कर व्यक्तींपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे याची जाणीव जागतिक पातळीवर वाढीस लागली.

युनेस्कोच्या आधिपत्याखाली १९७५ साली त्या काळातील युगोस्लाविया देशातील बेलग्रेड या शहरात पर्यावरण शिक्षणाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. नंतर दोनच वर्षांनी (१९७७) पुन्हा युनेस्को आणि यांच्या वतीने तत्कालीन सोविएत रशियातील जॉर्जिया प्रांतात असलेल्या तिबिलीसी या शहरात केवळ पर्यावरण शिक्षणावर साधकबाधक चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत आधुनिक काळातील पर्यावरण शिक्षणाचा पाया रचला गेला आणि पर्यावरणाचे ‘विज्ञान’ किंवा ‘शास्त्र’ म्हणून विचार आणि अभ्यास सुरू झाला.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...