Wednesday, 22 April 2020

23 April



*२३ एप्रिल*

*जागतिक पुस्तक दिन (World Book Day)*
               वाचनसंस्कृती

  United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर यांचा आज जन्मदिवस व  इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे
लेखक, कवी , प्रकाशक , मुद्रक आणि वितरक यांचे महत्व अधोरेखित करणे.
लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे. मला इयत्ता पाचवीत निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे  पारितोषिक मिळाले आणि तेंव्हा पासूनच खऱ्या अर्थाने माझे लेखन सुरु झाले. तेंव्हापासून आजपर्यंत गेल्या 40 वर्षांत मी अनेक काव्य, निबंध , ललित लेख लिहिले. त्यातील काही बक्षिसप्राप्त ठरले, काही प्रसिद्ध झालेत , तर काही पुन्हा एकदा लिहावे असे वाटले.
ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे
त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.
वाचन म्हणजे एका व्यक्तीचे विचार, मते व्यक्त केल्यानंतर त्या विचारांचा  प्रवेश आपल्या मनात होत असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं. आपले अनुभव विश्व अधिक समृद्ध होते व आपण मनन,चिंतन, मंथन करून वर्तनात बदल घडवून आणतो.
        वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच. ज्यामुळे वाचकांना एका उच्च प्रतीची तात्विक बैठक लाभते. याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनातच नव्हे तर समाज मनावर परिणाम होतो, यात तिळमात्र शंका नाही. वाचनाचे व्यसन वाढविण्यासाठी आपण  प्रयत्न केले पाहिजेत. उदा. शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे पुस्तकांच्या स्वरूपात देण्यात यावीत, कुणालाही वाढदिवशी पुस्तकेच भेट द्यावीत.
सर्वांना वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  श्रीमती मेघा अनिल पाटील
      उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार
मोबाईल  नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com

जागतिक वसुंधरा दिन

     22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन....
          *वसुंधरा दिन*

    ‘अर्थ डे’ अर्थात ‘वसुंधरा दिवस’.. नावच किती अर्थपूर्ण आहे! सजीव सृष्टी ज्या पृथ्वीवर अवतरली आहे तिचा हा दिवस! तिचे ऋण व्यक्त करण्या साठी चा  दिवस  ! का बरे साजरा करायचा हा दिवस? निसर्ग-पर्यावरण आणि मानव यांच्यातले नाते अधोरेखित करण्यासाठी आपण दोन प्रकारचे उत्सव साजरे करतो. पहिल्या प्रकारात एखाद्या प्राणी, वनस्पती, पक्षी यांचे अस्तित्व अधोरेखित करणारे दिवस; तर दुसऱ्या प्रकारात विशिष्ट पर्यावरणीय समस्येबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता विशद करणारे दिवस. पण ‘वसुंधरा दिन’ हा आगळावेगळा आहे; कारण तो वरील दोन्ही प्रकारांत मोडणारा आहे. पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात १९७० साली अमेरिकेत झाली. वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली .त्यांनी अमेरिकेतील दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना पर्यावरणाच्या समस्येबाबत जागृत केले,प्रदूषण आणि वन्यजीवांचा नाश  या मुद्द्यावर  तेथील सर्वच स्तरावरील लोकांनी आवाज उठवला. पहिला वसुधंरा दिन तिथे तब्बल २० लाख लोकांनी साजरा केला. शहराशहरांत लोकांनी एकत्रितपणे पर्यावरणीय हानीकडे धोरणकर्त्यांचे लक्ष वेधले. या कृतीमुळे तिथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. या रेटय़ामुळे लवकरच अमेरिकेत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काही आवश्यक कायदे करणे सरकारला भाग पडले. पर्यावरणरक्षण यंत्रणासुद्धा स्थापन करण्यात आली. पुढे १९९० च्या दशकापासून जवळपास जगभर हा दिवस दरवर्षी साजरा होत आहे. २०१६ साली जगातील १२० हून अधिक देशांनी एकत्र येत याच दिवशी हवामान बदलविषयक ‘पॅरिस कृती करार’ केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचे संचालन ‘अर्थ डे नेटवर्क’ ही संघटना करते. यंदा या संघटनेने वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी दिलेले संकल्पसूत्र आहे- ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’!
           हवामान बदलाचे परिणाम आपण गेल्या काही वर्षांपासून ठळकपणे पाहत आहोत. त्याची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आता आपल्याला बसू लागली आहे, हेही आपण अनुभवत आहोत. यावर उपाय म्हणजे निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन! आजच्या ५० व्या वसुंधरा दिनानिमित्ताने त्या दृष्टीने आपण काय करू शकतो?
       सध्या करोना संकटातील टाळेबंदीमुळे आजचा वसुंधरा दिन साजरा करताना सामूहिक कृतीला मर्यादा आहेत. पण त्यामुळे मिळालेला मोकळा वेळ म्हणजे वसुंधरेचा, निसर्गाचा विचार करण्याची संधी आहे. या काळात प्रदूषणात झालेली घट आणि त्याचे सुपरिणाम आपण अनुभवत असालच! ते अनुभवताना हवामान बदलाचे परिणामही समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नैसर्गिक संसाधनांचा संयत वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर, वृक्षलागवड अशी काही पावले येत्या काळात उचलता येतील. याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबवणे आणि रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे अशा घातक कृतींना थारा न देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. एकुणात, प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच आहे ही भावना मनात कायम ठेवायला हवी!
 पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.याचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे उद्दिष्ट आहे .
उचलून भार तुमचा, थकली वसुंधरा!
भारे प्रदूषणाचे, आता पुरे करा!!
जल,वायु भ्रष्ट झाले , अतिरेक आवरा!
दिनी आजच्या तरी रे, संकल्प  करा!!
झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा
प्लास्टिकचा वापर कमी करूया,
सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त करुया,
सार्वजनिक वाहनांचा वापर करूया,
वाढते प्रदूषण कमी करूया,
सगळे मिळून शपथ घेऊया,
पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर करूया 
वसुंधरेला वाचवा! जीवन आनंदी बनवा!! 
जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Wednesday, 15 April 2020

कोरोना व्हायरस -- क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

Corona virus and Quarantine  

  क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे

नेमकं काय?

'क्वारंटाईन' होणं म्हणजे काय?

क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.
  क्वारंटाईन का केलं जातं?
कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये .आजारी व्यक्तीच्या संपर्कात सामान्य व्यक्तीने येऊन आजाराची बाधा होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका असतो.     यासंबंधी विषाणू तज्ञांच्या मते , "खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स   सहा ते सात फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा ते सात म्हणूनच  फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. रुग्णाच्या संपर्कात सर्वसामान्य  व्यक्तीने येऊ नये .रुग्णाचा संपर्क टाळला तर संसर्ग टाळू शकतो. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं ."       प्रत्येकाने क्वारंटाईन होणे गरजेचे नाही. पण एखाद्याला त्रास होत
असल्यास तो व्यक्ती घरच्याघरीही काळजी घेवू शकतो. कुटुंबीयांपासून
सहा
अंतर ठेवावं. घरी वावरतानाही तोंडावर रुमाल बांधावा. आपलं 
अंथरूण पांघरून , आपले कपडे ,रुमाल व इतर साहित्य वेगळं ठेवावं.जर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर
सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधा."तुम्हाला जर 'क्वारंटाईन' होण्यास सांगितलं तर ?खालील काळजी घ्या. क्वारंटाईन होण्यासाठी तुम्हाला एका बंद खोलीत रहावं लागेल.
ज्याचा दरवाजा बंद असेल, पण खिडक्या तुम्ही उघड्या ठेवू शकता.खोलीच्या बाहेर शाळा, महाविद्यालय, कार्यालय कुठेही तुम्हाला जाता
येणार नाही.तुम्हाला भेटायला येण्याची परवानगी कुणालाही नसेल.
अगदी तुमच्या कुटुंबालाही नाही.तुम्हाला स्वतंञ शौचालय वापरावं लागेल.
तुम्ही इतर कुणाचाही टॉवेल वापरणार नाही याचीही काळजी घ्या.तुम्ही जर कोरोनाग्रस्त असाल तर तुमचा कचरा दोन पीशव्यांमध्ये
बांधला जाईल याची काळजी घ्या.तुमची मदत करणा-यांना कोणतही पार्सल दरवाजाबाहेर ठेवायला सांगा.क्वारंटाईन व्हायची वेळ आली तर मनाची तयारी कशी कराल?सर्वप्रथम सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा व मनाची तयारी करायची
की कोणत्याही परिस्थितीत मी या आजारातून बरा होणार आहे.
शेवटी आपली प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही आजाराला
व बिकट परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन  आपण सामना करू शकतो.
म्हणून क्वारंटाईन होण्यासाठी सांगितल्यावर सर्वप्रथम मनाची तयारी
असणं महत्वाचं आहे. कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढू नये
म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगितले जात असले, तरी संबंधित व्यक्तीच्या
मनावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. पण अशावेळी आपण
मानसिकरित्या खचून जावू नये.     "क्वारंटाईन म्हणजे आपल्याला काही झालंच आहे असं नाही, हे लक्षात घ्यायला हवं. क्वारंटाईनमुळे तुमच्या मनावर दडपण येवू शकतं त्यासाठी मनोरंजनाची साधनं वापरा. तुमचा विरंगुळा होईल अशा गोष्टी सोबत ठेवा. पुस्तकं वाचा.छंद जोपासा. आपल्या आवडीचे गाणे म्हणा. फिल्म पहा, शिवाय, रुग्णालयातही संबंधिताचे समुदेशन होणं गरजेचं आहे. मनावर सारखं दडपण येत राहीलं की कुणाशी तरी फोनवर संपर्कात रहा . बोलत रहा." आपण हे सर्व आपल्या मोबाईल द्वारे सुद्धा करू शकतो. या काळात मोबाईल आपला जवळचा मित्र होऊ शकतो. वरील सर्व विवेचन आपणास मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. 
 प्रा. मेघा अनिल पाटील 
श्रीमती पी. . सो. सार्वजनिक मराठी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नवापूर 
जिल्हा- नंदुरबार.
क्वारंटाईनबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानेही परिपञक जारी केले
आहे. क्वारंटाईन कसं व्हावं ? त्यासाठीचे मार्गदर्शक पञक सरकारकडून
जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार,1.क्वारंटाईन राहण्यासाठी सांगितल्यावर संबंधित व्यक्तीने हवेशीर बंद
खोलीत रहावं. शक्यतो एकटं रहावं, कुटुंब सदस्य असल्यास त्याने
1 मीटरपर्यंत अंतर ठेवणे गरजेचे आहे. शक्यतो स्वतंत्र शौचालय वापरावं.2.घरात फिरण्यावर बंधनं घाला, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ
नका.3.सर्जिकल मास्क वापरावं, दर 6-8 तासाने सर्जिकल मास्क बदलावे.4.मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (5%) अथवा सोडियम
हयपोक्लोराईट (5%) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावं. नंतर ते
जाळावं अथवा पुरावं, वापरलेलं मास्क हे संक्रमित असू शकतं.5.केवळ डॉक्टरांनी परवानगी दिलेली व्यक्तीच क्वारंटाईन असलेल्या
व्यक्तीशी संपर्क करु शकते.6.क्वारंटाईन व्यक्तीचे कपडे वेगळे ठेवा. त्यांची खोली, शौचालय ब्लीच
सोल्यूशन अथवा फेनॅलीक सोल्यूशनने साफ करा.  क्वारंटाईन होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं. वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं. क्वारंटाईला 'मेडिकल आयसोलेशन' असंही म्हटलं जातं.   

Sunday, 12 April 2020

skeleton and movements: Disorders

 Skeleton and Movements

   Disorders related to muscles

1) Muscular dystrophy :
*It is a gradual wasting disease affecting various groups of muscles.
* It is genetically inherited problem running in families.
* usually voluntary skeletal muscles are weak and where as internal muscles search as diaphragm are      not affected .
*Duchenne type usually occurs in boys due to it's  inheritance affecting lower limb.
*limb girdle muscular dystrophy affects the muscles of shoulders for hips. This is usually among adults of 20 to 35 years.
*No treatment appears to cure the disease.
 2) Myasthenia gravis:
* It is a weakness of skeletal muscles.
*It is caused by an abnormality at the neuromuscular junction that partially blocks contraction.
*It is an autoimmune disorder caused by an excess of certain antibodies in the blood stream.
*That antibodies bind to acctylecholine  receptors of neuromuscular  junction .
*Thus transmission of nerve impulses to the muscle fibres is blocked.
*This causes progressive and extensive muscle weakness.
* It may affect the eye and eyelid movements , facial expressions and solving the degree of muscles weakness vary from local to general.
*Symptoms:
  *Ptosis also known as diplopia double vision.
*Difficulty in swallowing ,chewing and speech.

Disorders related to bones:

   1) Arthritis:

An inflammation of joints

*Painful disorder of bones, ligaments, tendons etc .

* Joints become swollen ,stiff cand painful.

*Leads to disability.

*Three types of arthritis, as below:

(a) Osteoarthritis:
*Joint cartilage is degenerated due to various factors such as aging, obesity,muscle weakness. etc.
*Most common type of arthritis affecting hands, knees and spine.
(b) Gouty arthritis (Gout):
*Joint pain  due to deposition of uric acid in joints.
*Excess production of uric acid or it's accumulation without excretion
causes painful  joints.
*Uric acid is stored as sodium urate
which degenerates cartilage, causing Inflammation and pain .
*Joints of feet are affected .
(c) Rheumatoid arthritis:
*It is autoimmune disorder where body 's immune system attacks it's own  tissues.
*Synovial membrane swells up and secrets extra synovial fluid.
*Excess fluid exerts pressure on joint making it painful.
*Abnormal granulation tissue called pannus  may develop.
* Pannus erodes cartilage.
*Fibrous tissue may be ossified leading to stiffness in joints.

2) Osteoporosis:    
  *Bones become porous and brittle.
  *Primary age-related ,more common  in  women  than men.
  * With advancing age , bone resorption is faster than the bone formation.
*Bones does loose mass and become brittle.
*Calcium is lost in urine,sweat to the greater extent as compare to that which is gained through diet.
*Consuming adequate amount of calcium and exercise at young age does becomes preventive measure to osteoporosis.
*Decreasing estrogen secretion after menopause is also a cause of osteoporosis in middle aged women.
*Deficiency of vitamin D ,low calcium diet ,decrease secretion of sex hormones and thyrocalcitonin are some of the causative factors of osteoporosis.
*Osteoporosis cause  fractures  lead to shrinkage of vertebrae, height loss ,hunched back and bone pain .



Saturday, 11 April 2020

मज्जापेशी

 *शरीरातील रासायनिक प्रक्षेपकांचा शोध असा लागला!* 
************************************

मज्जापेशी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. त्याचा मुख्य भाग हा बराच मोठा असून एका बाजूला मोठा तंतू असतो. त्याला अॅक्झॉन म्हणतात तर दुसऱ्या बाजूला बारीक मुळे फुटलेली असतात त्याला डेट्रॉइट असे म्हणतात. अनेक वर्षांपासून शरीरशास्त्रज्ञ मज्जातंतुंतुन संदेश स्नायू किंवा ग्रंथीपर्यंत कसा पोहोचतो हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करीत होते. मज्जातंतूंचा शेवट होतो त्या भागाचे शक्तिशाली सूक्ष्मदर्शकातुन निरीक्षण करण्यात आले तेव्हा मज्जातंतूचा शेवटचा भाग आणि ग्रहण करणाऱ्या इंद्रियाची पेशी यामध्ये छोटेखानी फट असल्याचे त्यांना आढळून आले होते. या छोट्या फटीतून मज्जासंदेश पसार कसा होतो हा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. विद्युतधारेप्रमाणे उडी घेऊन ती फट तो ओलांडतो की मज्जासंदेश मज्जातंतुच्या टोकाशी एखादे रसायन निर्माण करून त्याच्यामार्फत ग्राहक इंद्रियाच्या पेशीकडे आपला संदेश पाठवतो ?

 शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी डॉक्टर क्लॉड बर्नार्ड यांनी फ्रान्समध्ये जो प्रयोग केला त्यावरून असे दिसून आले की मज्जातंतूंच्या टोकाशी एखादा रासायनिक पदार्थ निर्माण होत असावा, ही कल्पनाच बरोबर ठरण्याची शक्यता आहे. बेडकांच्या पाठीच्या मागच्या बाजूला त्याने एक द्रवरूप विषाचे इंजेक्शन दिले. हे विष शरीरात गेले की तात्काळ शरीराची हालचाल बंद पडून प्राणी मृत्यूमुखी पडतो. रक्तातून वीज शरीरभर पांगले आणि त्याने स्नायूंची हालचाल थांबविली असता जुजबी निष्कर्ष काढूनच त्याला समाधान मानावे लागले असते ; परंतु शास्त्रज्ञाला उतावीळ असून चालत नाही. त्याने धीरगंभीर वृत्तीने मार्ग आक्रमायचा असतो. डॉक्टर बर्नार्डने आपले काम पुढे चालू ठेवले. त्याने विषबाधा झालेल्या बेडकाच्या मुख्य स्नायूला विजेचा झटका दिला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. विषबाधा झालेला पाय वेगवान हालचाल करू लागला होता. याचा अर्थ स्पष्ट होतो की विषाचा स्नायूवर परिणाम झाला नव्हता, तर मज्जासंदेश स्नायुला पुरविणारा मार्गच विषमुळे अवरूद्ध झाला होता. संदेश मज्जातंतूतून तर जात होता; पण मज्जातंतूचे टोक आणि स्नायू यांमधील फट पार करणे मात्र त्याला शक्य होत नव्हते.

 मज्जातंतूच्या टोकाशी विशेष रसायन असते हे गृहीत धरून स्नायूतील पेशींचा पृष्ठभाग आणि मज्जातंतूचे टोक यांच्यामधील त्या प्रक्षेपक पदार्थाचा शोध सुरू झाला. इ.स. १९०३ ते १९२० अशी १७ वर्षे ही कल्पना लाोएवी उराशी बाळगून होता.

१९२० साली एका मध्यरात्री लोएवी एकाएकी अंथरुणावरून उठून बसले आणि कागदाच्या कपड्यावर काही तरी खरडुन पुन्हा झोपी गेला. सकाळी तीन वाजता उठल्यानंतर लोएवीच्या मनात पहिला विचार आपल्या रात्रीच्या कृतीचा आला. झोपेमध्ये आपल्याला काहीतरी महत्त्वाचे सुचले होते म्हणून त्याने कागद उघडून वाचायचा प्रयत्न केला; परंतु घाईघाईत आपण काय लिहिले हे त्याला वाचता येईना. विचार करून करून डोके शिणले; पण हाती काही लागले नाही.

 दुसऱ्या दिवशी रात्रीही तो चमत्कार घडला. मध्यरात्री तीन वाजता त्या विचाराने त्याला पुन्हा जागे केले. आता मात्र खाडकन डोळे उघडून ते लिहायला बसले आणि कागदावर उतरलेला मजकूर म्हणजे रासायनिक प्रक्षेपकाचा पडताळा पाहण्याच्या प्रयोगाचा बिनचूक आराखडा होता. उठून बसलेले लोएवी पुन्हा झोपी गेलेच नाहीत, तर त्यांनी तडक प्रयोगशाळेचा रस्ता धरला. प्रयोगशाळेत जाऊन त्यांनी सरळ प्रयोगाला सुरुवात केली. १७ वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार होत होते. प्रक्षेपकाची कल्पना वास्तवात उतरत होती. त्याने केलेला प्रयोग असा -

 डॉक्टर लोएवीने दोन बेडकांच्या शरीरातील हृदय काळजीपूर्वक बाहेर काढली. त्यापैकी एका हृदयाचे मज्जातंतू त्याने तसेच राहू दिले होते. त्या उलट दुसऱ्या हृदयातील सगळे मज्जातंतू त्याने काढून टाकले होते. त्यानंतर ही दोन्ही हृदय त्यांनी एका काचेच्या अरुंद डब्याला जोडून टाकली. त्यामुळे शरीरात असणाऱ्या द्रवाने या हृदयांना अंघोळ घालणे शक्य होणार होते. हृदयाच्या ठोक्यांचा वेग नोंदवला जात होता. त्यानंतर मज्जातंतू असलेल्या हृदयाला त्याने एक विजेचा सौम्य धक्का दिला. त्यामुळे त्या हृदयाचे ठोके पडणे बंद झाले. विजेचे सौम्य झटके देणे त्याने काही वेळ चालूच ठेवले. नंतर ते हृदय ज्या द्रवात बुडवले होते तो द्रव दुसरे हृदय असलेल्या भांड्यात ओतला. या हृदयाचे सगळे मज्जातंतु काढलेले होते तरी आधीचा विद्युतभारीत हृदयालगतचा द्रव त्याच्या द्रवात मिळाल्याबरोबर त्याचे ठोके मंद होऊ लागले. डॉक्टर लोएवी आश्चर्यचकीत झाले. मज्जातंतूला विजेचा झटका दिला असता जशी क्रिया होईल तशीच ही क्रिया होती; पण दुसऱ्या हृदयाचा तर मज्जातंतूशी संबंध नव्हता. मग हे झाले कसे ? द्रवात तयार झालेल्या कोणत्या तरी अज्ञात पदार्थाने ही किमया घडवली होती. पहिल्या हृदयातील मज्जातंतूना विजेचा झटका दिला तेव्हा मज्जातंतूंच्या टोकाशी तो पदार्थ तयार झालेला असला पाहिजे. 

या प्रयोगातून दुसरी गोष्ट स्पष्ट होत होती ती म्हणजे एकापेक्षा अधिक पदार्थ या प्रक्रियेत निर्माण होत होते. कारण लोएवीच्या प्रयोगातील हृदयाच्या मज्जातंतूच्या एका गटाला विजेचा झटका दिला की हृदयाचे स्पंदन वाढत होते आणि दुसऱ्या गटाला झटका दिला की हृदयाचे स्पंदन मंद मंद होत होते.

 हेन्री डेल हे महान शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर लोएवीचे जीवलग मित्र होते. त्यांनी लोएविंनी शोधलेल्या पदार्थाचे रासायनिक नाव 'अॅसिटीलकोलीन' आहे हे सिद्ध करून दाखविले. या सर्व संशोधनाचे फलित म्हणजे १९३६ सालचे शरीरशास्त्र व औषधी विज्ञानाचे नोबेल पारितोषिक लोएवी आणि डेल यांना संयुक्तपणे देण्यात आले.

 *डॉक्टर आर सी जोशी, डॉक्टर रंजन गर्गे यांच्या 'विज्ञानातील अनपेक्षित शोध' या पुस्तकातून साभार

Tuesday, 7 April 2020

जलसंधारण

💐जलसंधारण 💐
पाऊस हा सर्वात शुद्ध नैसर्गिक जलस्रोत आहे. परंतु पावसाचे पाणी ढगांतून जमिनीकडे प्रवास करताना त्याचे सूक्ष्म जलबिंदू भोवतालच्या हवेच्या संपर्कात येतात. या हवेत असलेले आणि पाण्यात सहजपणे विरघळणारे विविध प्रकारचे प्रदूषक वायू, धूलिकण या पावसाच्या पाण्यात मिसळतात. अंतिमत: हे पावसाचे पाणी घराच्या छपरावर किंवा गच्चीवर पडते तेव्हा त्यामध्ये पक्ष्यांची विष्ठा, धूळ  आणि इतर कचरा मिसळतो. यामुळे  हे पाणी अशुद्ध होते. हे पाहता, पावसाचे पाणी जलसंधारणाद्वारे वापरात आणण्यापूर्वी गाळणे आणि शुद्ध करणे आवश्यक असते.

ते करण्यासाठी विविध पर्याय आहेत. हे पाणी कशासाठी वापरले जाणार आहे, त्यावर उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय वापरावा हे ठरवता येते. जर पावसाचे पाणी शौचालयाच्या फ्लश टँक्ससाठी, वाहने धुण्यासाठी, बागेतील झाडांना घालण्यासाठी, अग्निशमन यंत्रणेसाठी आणि तत्सम दुय्यम गोष्टींसाठी वापरायचे असेल, तर साध्या वाळूच्या गाळण पद्धतीचा वापर करता येईल. परंतु हे पावसाचे पाणी आंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी आणि अगदी पिण्यासाठीही वापरायचे असेल, तर हे पाणी वाळूच्या गाळणीतून प्रवाहित झाल्यानंतर ते कार्बन पावडर (अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल) अथवा जेलच्या गाळण यंत्रातून प्रवाहित करून पुढे अतिनील किरण (अल्ट्राव्हॉयोलेट रेज्) तसेच ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशुद्ध करण्यात येते. अशा प्रकारची गाळण यंत्रणा गच्चीवरील पाणी खाली वाहून नेणाऱ्या नळांमध्ये बसवता येते. याचा एक फायदा असा की, गच्चीवरून खाली वाहणाऱ्या पाण्याच्या स्तंभाच्या दबावामुळे गाळण प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अनेकदा हे पाणी परत उलटे फिरवून गाळण माध्यमातून प्रवाहित केले जाते. यामुळे त्या गाळणीची भोके खुली राहतात.

शोष खड्डय़ांमध्ये मात्र एवढी प्रगत गाळण यंत्रणा वापरण्याऐवजी विविध आकारांच्या दगड-गोटय़ांचे थर तयार करून त्यावर बारीक वाळूचा थर पसरविण्यात येतो. या शोष खड्डय़ाला जोडलेल्या नळाच्या टोकाला जाळी असतेच. या नळाद्वारे गुरुत्वाकर्षणाच्या उच्च दाबाखाली वाहून शोष खड्डय़ात आलेले पाणी या नैसर्गिक गाळण्यातून प्रवाहित होऊन जमिनीत मुरते आणि जमिनीच्या पाणीसाठय़ात भर घालते. परंतु जमिनीत मुरणारे हे पाणी सर्व प्रकारच्या प्रदूषकांपासून मुक्त असायला हवे. अन्यथा अशी प्रदूषके जमिनीखालील भूजलात मिसळून जातील आणि हे भूजल प्रदूषित होऊन निरुपयोगी ठरेल.

Sunday, 29 March 2020

करोना व्हायरस बद्दल सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती

       *करोना व्हायरस बद्दल सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती*                                                    

 *व्हायरस किंवा कोणताही व्हायरस कशानेही मरू शकत नाही. *कारण व्हायरस हा सजीव नसतोच. व्हायरस  एक बायो पार्टीकल म्हणजे जैविक कण आहे.
*व्हायरस  सजीव आणि निर्जीव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण तो दोघांचीही  लक्षणे दर्शवितो आणि म्हणूनच त्याला" biological puzzle" म्हणजेच "जैविक कोडे "असेही म्हटले जाते.
*कोणत्याही पेशीत हा व्हायरस नावाचा कण गेला की त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. 
* व्हायरस  स्वतः प्रजनन करत नाही तर ज्या पेशीत तो गेला आहे ती पेशीच त्याच्या खूप साऱ्या कॉपी तयार करतो.
 *व्हायरस हा एक छोटासा डीएनए किंवा आरएनए केंद्रक आम्ल  असलेला एक कण असतो, जास्ती करून    आर एन ए /RNAआणि त्यावर एक प्रोटीनचे संरक्षक आवरण cover असते. जे आपल्या श्वेतपेशींवर म्हणजेच  WBC  वर असते. ते प्रोटीनचे आवरण किती मजबूत आहे किंवा व्हायरस ज्या पेशीत जाणार आहे त्या पेशीशी ते किती सारखे आहे  किंवा मिळतेजुळते आहे त्यावरून तो व्हायरस त्या पेशीत संक्रमित होणार की नाही ते ठरते.                                      
*आपल्या पेशी नेहमी आपल्या डीएनएच्या कॉपी बनवत असतात. तेच मेकॅनिजम वापरून पेशीत गेल्यावर
 व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए पेशीतील मटेरियल वापरून स्वतःच्या खूप खूप कॉपी बनवतो.
 *ही प्रत्येक कॉपी हा एक नवा व्हायरस च असतो.आणि मग पेशीतील मटेरियल संपले की पेशींची वॉल फोडून हे सर्व व्हायरस कण बाहेर येतात आणि शरीरातील इतर पेशींत घुसून त्यांनाही मारतात.
*अशा प्रकारे मग अनेक पेशी बाधित झाल्या की मग होस्ट म्हणजे ज्याच्या शरीराच्या पेशींत व्हायरस संक्रमित झाला आहे तो प्राणी मग आजारी होतो. काही व्हायरसचा डीएनए हा होस्टच्या डीएनए सिक्वेन्स मध्ये घुसून त्या प्राण्यातच जेनेटिक चेंज आणू शकतो.
 *हा जेनेटिक चेंज पुढच्या कित्येक पिढ्यांत ट्रान्स्फर होतो. किंबहुना एखादा व्हायरस नेमका कधी अस्तित्वात ला हे प्राण्यांच्या डीएनएतील या बदलावरूनच कळते.
*व्हायरस हा सजीवच नसल्याने मग त्याला कोणत्याही औषधाने वा गोमूत्र वा कापूर वा धुराने किंवा पेस्टीसाईडने मारता येऊ शकत नाही.
 *मात्र कशानेही त्याचे बाह्य प्रोटीन आवरण नष्ट झाले की व्हायरसही नष्ट होतो. हे हवेमुळे, पाण्यामुळे,
साबणामुळे, तापमानामुळे, उन्हामुळे असे कशामुळेही होऊ शकते. 
*होस्टच मिळाला नाही की एखादा व्हायरस जगातूनच नष्ट होऊ शकतो. व्हायरस सजीव नसल्याने तो मरूच शकत नाही. जर व्हायरस मरुच शकत नाही तर मग डॉक्टर लोक जी औषधे देतात, करोनाची लस शोधण्यासाठी जी पराकाष्ठा चालू आहे ती कशाला? असा प्रश्न पडतो .
*व्हायरस वर जी लस असते ती कशी काम करते त्या आधी व्हायरस कसा काम करतो ते पाहू. व्हायरस आधी शरीराच्या पेशींच्या वॉल वर रिसेप्टर्स असतात तिथे बॉण्ड बनवतो आणि तिथे चिकटून राहतो. त्या रिसेप्टर्स मधून मग तो हळूच पेशींच्या आत जातो. आत तो आपल्या डीएनएच्या स्ट्रेण्डचा प्रति किंवा आरएनए स्ट्रेण्ड (पट्टी) बनवतो. हे स्ट्रेण्ड मग सेपरेट होऊन अजून स्ट्रेण्ड बनवतात.
* हा प्रत्येक स्ट्रेण्ड मग एक नवा व्हायरस बनतो. मग या नव्या बनलेल्या व्हायरस कणांची भरपूर संख्या झाली की हे व्हायरस त्या पेशींची वॉल तोडून बाहेर येतात आणि बाजूच्या पेशींच्या रिसेप्टर्स वर जाऊन चिकटतात व त्यांना संक्रमित करतात. लस या सगळ्या स्टेप्स पैकी कोणत्याही एका स्टेपवर व्हायरसला ब्लॉक करते. हे ब्लॉकिंग रिसेप्टर्स वर असू शकते, ज्या लसीत असे केमिकल्स असतात जे व्हायरसचे रिसेप्टर्सशी बॉंडींग होऊ देत नाहीत, किंवा काही लसी व्हायरसच्या डीएनएला केमिकल्सनी रोखून प्रति डीएनए स्ट्रेण्ड बनवू देत नाहीत.
 *काही लसी व्हायरसला वॉल तोडून बाहेर येऊ देत नाहीत. काही लसी व्हायरसचा डीएनएच डॅमेज करून टाकतात आणि मग तो कॉपी होत नाही .
*आताचा करोना कोविड-19 हा नवा व्हायरस आहे, त्याचे नेमके प्रोटीन्स आणि रिसेप्टर्सचे बॉण्ड कसे असतात, तो नेमका कोणकोणत्या मेकॅनीजमने शरीरात जातो, किंवा नेमका तो कोणत्या केमिकल्सनी डीएनए रेप्लिकेट बनवतोय तेच अजून कळत नाहीय.
 *ते कळल्यावर मग कोणते केमिकल्स त्याच्या कोणत्या स्टेपला रोखू शकतील हे शोधायलाही वेळ लागेल. म्हणून त्याची लस लवकर बनत नाहीय.
*व्हायरस हे सहसा प्राण्यांतून माणसांत येतात.
*व्हायरस हे मुख्यत्वे होस्ट स्पेसिफिक असतात. त्यामुळे एका प्रजातीच्या प्राण्याला लागण झालेल्या व्हायरसची दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याला किंवा माणसाला लागण होईलच असे नाही. मात्र एका प्रजातीत असताना व्हायरसच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आणि हा बदल एखाद्या दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरीराशी संलग्न होण्यास योग्य असेल तर मात्र हा व्हायरस दुसऱ्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतो.
* कोविड-19 चे साधर्म्य वटवाघळे आणि खवल्या मांजरात असणाऱ्या करोना व्हायरसशी आढळले आहे. व्हायरस तयार करण्याइतकी टेक्नॉलॉजी अद्याप विकसित झालेली नाही , त्यामुळे तो कोणत्या एखाद्या देशाने तयार करून सोडला आहे असे शक्य नसून तो recombination   mechanism असू शकतो ,परंतु तीही शक्यता कमी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा व्हायरस जेनेटिक बदल होऊन वटवाघूळांतून खवल्या मांजरांत गेला आणि खवल्या मांजरांतील व्हायरसमध्ये जेनेटिक बदल होऊन तो माणसांत आला अशी जास्त शक्यता आहे.     *. संक्रमित पृष्ठभागास स्पर्श केल्याने काही व्हायरसची लागण होऊ शकते. मात्र नव्या करोनाचे संक्रमण अशा प्रकारे होते का हे अद्याप आपल्याला नेमके माहीत नाही. उन्हाळ्यातील तापमानाने व्हायरसचे प्रोटीन नष्ट होऊन व्हायरस नष्ट होऊ शकतो.
 * कोविड-19 करोना हा आताच आला असल्याने उन्हाळ्यात तो वाढतो की नष्ट होतो हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही.हात चांगल्या सॅनिटायजरने धुतल्याने व्हायरसचे प्रोटीन कवच नष्ट होऊन तो नष्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठेही अनावश्यक स्पर्श न करणे, जो कुणी शिंकत वा खोकत असेल त्याच्यापासून 3 फुट दुर राहणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
 *करोना हवेतून पसरत नाही, शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून पसरतो म्हणून 3 फूट दूर राहीले पाहीजे. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो.
* आपण स्वतः आजारी असू किंवा आजारी माणसाची सेवा करत असू, वा आजारी माणसाजवळ जात असू तरच मास्क वापरावा असे WHO ने सांगितले आहे. अन्यथा उगीच मास्क वापरू नये. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो.
*करोनाचा mortality रेट हा 3.4% आहे. म्हणजे हा आजार 1000 माणसांना झाला तर त्यातील 34 माणसांचा मृत्यू होऊ शकतो. यातही म्हाताऱ्या माणसांना जास्त रिस्क आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारांत हा रेट 15% आहे. मात्र हा दर अजून कमी होईल असे WHO म्हणते.
*SARS या आजाराचा मृत्युदर हा 10% तर MERS चा 34% इतका म्हणजे करोनाच्या दहापट जास्त होता. व्हायरसने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे की जो आजार जास्त पसरतो त्याचा मृत्युदर कमी असतो, आणि जो कमी पसरतो त्याचा मृत्युदर जास्त असतो.स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो.
 ***विद्यार्थी मित्रांनो आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. घाबरून जाण्यासारखे काही नाही.  

**आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. गर्दीत जावू नये व  कुटुंबीयांनाही जावू देवू नये.          

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...