Friday, 8 January 2021
Wednesday, 6 January 2021
Biology branches
*Basic life science branches*
Biology – study of living organisms with respect to their morphologic and anatomic traits as well as behavior and development
Anatomy – study of form and function, in plants, animals, and other organisms, or specifically in humans
Astrobiology – the study of the formation and presence of life in the universe
Bacteriology – study of bacteria
Biotechnology – study of combination of both the living organism and technology
Biochemistry – study of the chemical reactions required for life to exist and function,
usually a focus on the cellular level
Bioinformatics – developing of methods or software tools for storing, retrieving, organizing and analyzing biological data to generate useful biological knowledge
Biolinguistics – the study of the biology and evolution of language.
Biological anthropology – the study of humans, non-human primates, and hominids. Also known as physical anthropology.
Biological oceanography- the study of life in the oceans and their interaction with the environment.
Biomechanics – the study of the mechanics of living beings
Biophysics – study of biological processes by applying the theories and methods that have been traditionally used in the physical sciences
Botany – study of plants
Cell biology (cytology) – study of the cell as a complete unit, and the molecular and chemical interactions that occur within a living cell
Developmental biology – the study of the processes through which an organism forms, from zygote to full structure
Ecology – study of the interactions of living organisms with one another and with the non-living elements of their environment
Ethology – the study of behavior
Evolutionary biology – study of the origin and descent of species over time
Evolutionary developmental biology – the study of the evolution of development
including its molecular control
Genetics – the study of genes and heredity
Histology – the study of tissues
Immunology – the study of the immune system
Microbiology – the study of microscopic organisms (microorganisms) and their interactions with other living organisms
Molecular biology – the study of biology and biological functions at the molecular level, some cross over with biochemistry, genetics, and microbiology
Neuroscience – the study of the nervous system
Paleontology – the study of prehistoric organisms
Pathology - the study of the causes and effects of disease or injury
Pharmacology – the study of drug action
Phycology – the study of algae
Physiology – the study of the functioning of living organisms and the organs and parts of living organisms
Population biology – the study of groups of conspecific organisms
Quantum biology – the study of quantum phenomena in organisms
Structural biology – a branch of molecular biology, biochemistry, and biophysics concerned with the molecular structure of biological macro-molecules
Synthetic biology – the design and construction of new biological entities such as enzymes, genetic circuits and cells, or the redesign of existing biological systems (LY)
Systems biology – the study of the integration and dependencies of various components within a biological system, with particular focus upon the role of metabolic pathways and cell-signaling strategies in physiology
Theoretical biology – the use of abstractions and mathematical models to study biological phenomena
Toxicology – the nature, effects, and detection of poisons
Virology - the study of viruses like submicroscopic, parasitic particles of genetic material contained in a protein coat – and virus-like agents
Zoology - the study of animals
Enzymology- the study of enzymes.
Saturday, 2 January 2021
आपण पाणी किती वापरतो?
*आपण किती पाणी वापरतो?*
***********************************
जगात उपलब्ध असलेला पाण्याचा साठा जर आपण जपून आणि उधळमाधळ न करता वापरला तर सगळ्यांना पुरून उरेल एवढा आहे. त्यामुळेच आपण किती पाणी वापरतो, याची मोजदाद करण्याची आवश्यकता भासते. यात अर्थात समानता नाही. काही देश कितीतरी पाणी वापरतात, तर काहींना थेंबार्थेबासाठी झगडावं लागतं. पिण्यासाठी, धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी आपण जे पाणी वापरतो ते सहज मोजता येतं; पण त्याव्यतिरिक्त प्रत्येक देशात उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी पाण्याचा वापर होत असतो. म्हणूनच जागतिक संघटनेनं वाॅटर फूट प्रिन्ट' हे एकक विकसित केलं आहे. त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाण्याचा वापर तसंच आयात केलेल्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी वापरलेलं पाणी आणि निर्यात केलेल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरलेलं पाणी या सर्वांची बेरीज-वजाबाकी करून त्या त्या देशानं वापरलेल्या पाण्याचे मोजमाप केलं जातं.
यानुसार जगाचा सरासरी वॉटर फूट प्रिन्ट दरडोई दर वर्षी १,२४३ घनमीटर असल्याचं दिसून आलं आहे. पण एकट्या अमेरिकेचा वॉटर फूट प्रिन्ट याच्या दुप्पट म्हणजे २,५०० घनमीटर आहे. दोन ऑलिंपिक दर्जाच्या तरणतलावातलं पाणी प्रत्येक अमेरिकन नागरिक दर वर्षी वापरतो. आपल्या ओळखीच्या एककात सांगायचं तर प्रत्येक अमेरिकन दर वर्षी २५ लाख लिटर पाण्याचा बापर करतो. याउलट युगांडा, इथियोपिया यांसारख्या आफ्रिकेतल्या देशांमध्ये हे प्रमाण पंधरा लिटरसुद्धा पडत नाही. भारत, चीन यांसारख्या आशियातील जास्त लोकसंख्या असलेल्या आणि उभरत्या अर्धव्यवस्थेच्या देशांमध्येही हे प्रमाण ७०० ते ९०० घनमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा कमी आहे.
अमेरिकेतील जास्त वापर हा मुख्यत्वे त्यांच्या आहारातील गोमांसाच्या अतिरेकी प्रमाणामुळे आहे. हार्ड नसलेल्या एक किलोग्राम गोमांसाच्या उत्पादनासाठी तब्बल १६००० लिटर पाण्याची गरज असते. म्हणजेच एका हॅम्बर्गरसाठी २४०० लिटर पाणी बापरलं जातं. त्यामुळेच अमेरिकेतल्या दर घरटी दर दिवशी पावणेसहा लिटर पाण्याचा उपसा होतो.
आपल्या देशात हे प्रमाण ९०० घनमीटर इतकं आहे. तरीही आपल्या जवळजवळ संपूर्ण शाकाहारासाठी लागणाऱ्या भाज्या, डाळी व तांदूळ, गहू यांसारख्या पिकांसाठी सिंचनासाठी फार मोठ्या प्रमाणावर जमिनीखालील पाण्याचा उपसा केला जातो. गेली काही वर्ष तर ज्या वेगानं या पाण्याचा साठा जमिनीखाली होत असतो त्याहीपेक्षा जास्त वेगानं उपसा केला जात आहे, त्यामुळे हे साठे आटत चालले आहेत. त्यावर तोडगा म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण करण्याचा, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा. या बाबतीत देशानं परिणामकारक उपाय योजले आहेत, असा निर्वाळा जागतिक संघटनेनं दिला आहे. तरीही हे प्रयत्न अधिक जोमदार होण्याची आवश्यकता आहे.
निरोगी व्यक्ती बनविणे शक्य आहे
( Genetically designed humans.... जीन मध्ये ढवळाढवळ करून हवा तसा मनुष्य बनवणे योग की अयोग्य या चर्चा करत राहू पण हे थांबणार नाही....
dr Pradeep Patil यांचा लेख
दोन किस्से सांगतो. नवरा-बायकोस हवे आहे “उत्तम’ मूल. सर्वोत्तम असेल तर बरेच. हव्या त्या रंगाचे, डोळ्यांचे, कोणत्याही रोगाचा मागमूसही त्याच्या गुणसूत्रात नसलेले, बलवान,… वगैरे, वगैरे. यादी तशी मोठी आहे. यासाठी नवरा-बायकोस नैसर्गिकरीत्या मूल जन्मले नाही तरी चालणार आहे. म्हणजे दोघेही ‘नॉर्मल’ आहेत तरीसुद्धा. कारण ‘सर्वोत्तम’ मूल जन्माला घालायचे असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे. ‘इन व्हिट्रो’ पद्धत. यात स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू तपासले जातील. त्यातील रोगट भाग काढून टाकला जाईल. ते ‘स्वच्छ, निरोगी’ केले जातील. मग दोन्ही एकत्र करून गर्भ तयार केला जाईल. कारण… त्यांना त्यांच्या मुलाच्या सर्व ‘क्वालिटीज्’ सर्वोत्तम बनवायच्या आहेत. होईल असे?
आता दुसरा किस्सा. राजूला प्रिया आवडते. प्रियाचा जन्म ‘वरील’ पद्धतीने झाला आहे. म्हणजे जन्मापूर्वीच ती गर्भावस्थेत असताना तिच्या जीन्सची किंवा जनुकांची तपासणी होऊन तिचे जीन्स निर्दोष केले आहेत. रोगच नाहीत. पुढे होणार नाहीत. या प्रक्रियेस 'पीजीडी' म्हणतात. पीजीडी म्हणजे प्रीजेनेटिक डायग्नोसिस. मराठीत बोलायचे तर जन्मपूर्व जनुकीय निदान. त्यामुळेच प्रिया आता बनली आहे हव्या त्या रंगाची, लाल ओठांची, रेखीव बांध्याची, हवी तशी-हवी तेवढी गोलाई असलेल्या शरीराची आणि हुषार… सारी किमया पीजीडीची. प्रिया मात्र शंकेने ग्रासलेली आहे. तिला राजूला निवडायचे तर आहे… पण राजू पीजीडीने जन्मलेला असेल का ? त्याचा मेंदू निर्दोष असेल का ? तो निर्दोष वर्तन करेल की पारंपरिक पद्धतीने जन्मलेल्या मुलांसारखाच असेल ? अनेक प्रश्न. ती या साऱ्या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे मिळवूनच राजूला होकार देणार आहे. असे घडेल का कधीतरी?
या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ अशी आहेत. येत्या ५० वर्षांत दिसू लागणारे हे चित्र आहे. याला पुरावा काय? पुरावा आहे पीजीडी या तंत्राचा. या तंत्राने गर्भाची तपासणी करून त्याच्या निरोगीपणाची खात्री करता येते. जर रोग आनुवांशिक असेल तर मूल जन्मण्यापूर्वीच जीन्समधील रोगी भाग काढून टाकला जातो. अमेरिकेत आता याची सुरुवातही झाली आहे. २००२ साली अशाप्रकारे सुमारे सहा हजार केसेसच्या चाचण्याही झाल्या आहेत.
गुणसूत्रातील दोषामुळे निर्माण होणारे अनेक रोग आहेत, टे-सॅक्स (Tay-Sachs)/संचयी रोग, हंटिंग्टन (Huntington) रोग, कुपोषित स्नायू विकार, स्तनांचा कॅन्सर, हिमोफिलिया, सिकल सेल अॅनिमिया, इत्यादी. जर या रोगांचे जनुक काढून टाकले तर जन्मणारे बाळ रोगमुक्त! यासाठी फक्त एवढे करायचे... गर्भ तयार होण्यापूर्वीच्या अवस्थेस भ्रूण म्हणतात, किंवा पेशींचा गोळा. या गोळ्यातून एक तुकडा घेऊन तपासायचा. याने त्या संपूर्ण गोळ्याच्या जीन्सची माहिती मिळते. जीन्स म्हणजे आपल्या शरीराचे गुणधर्म निश्चित करणारे घटक. या चाचणीस म्हणतात पॉलीमरेज चेन रिअॅक्शन.(पीसीआर). त्यानंतर रोगाने बाधलेला भाग काढायचा आणि तेथे निरोगी भाग बसवायचा. हिला जेनोम उपचारपद्धती म्हणतात. आता या पद्धतीने आपणास अतिबुद्धिमान मेंदू तयार करता येणार नाही का, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. मानसशास्त्रज्ञ स्टीव्हन पिंकर यांनी मेंदूत बुद्धिमत्ता कशी तयार होते हे सांगितले आहे. समजा, जेव्हा मेंदूत एखादा संदेश वेदनेंद्रियांकडून जातो तेव्हा मेंदूतील एक चेतापेशी उद्दीपित होते. पिंकर म्हणतात, ही एकच चेतापेशी ५०० ते १००० जीन्सच्या घटकांना सहभागी करून घेते. मग एवढे सारे जीन्स बदलणार ? यावर फ्रान्सिस कॉलिन्स यांनी उत्तर दिले आहे. ते ‘मानवी जनुक प्रकल्पा’चे प्रमुख आहेत. ते म्हणतात की, अनेक जनुके जर एखाद्या रोगात असतील तर निरोगी जनुकांबरोबर-जीन्सबरोबर-तुलना करून त्याआधारे जीन वेचून काढायचे. जीन्सचा एक नकाशाच प्रत्येक व्यक्तीत असतो. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या नकाशात विविधता असते. फरक असतो. अशा छोट्या छोट्या फरकांना एसएनपी म्हणतात. एकूण मिळून १० लक्ष एसएनपी आढळले आहेत. सर्व मानवजातीतील हे एकुणात असलेले फरक. म्हणजे प्रत्येकाच्या, आपणा सर्वांच्या जनुकात १० लक्ष लोकांच्या जनुकांचा संचय आहे. आपले पूर्वज मोजत आपण मागे-मागे गेलो तर १,००,००० वर्षांपूर्वीपासूनच्या १० लक्ष लोकांतील जीन्स आपल्यात संक्रमित होत गेले आहेत.
या एसएनपींची रचना जशी असेल तसा जीव जन्मतो. ही रचना आपल्या हातात येत आहे. म्हणजे मग माणूस उद्या कसा वागावा याची रचना करून मेंदू घडविता येईल ? माणसाचे वागणे, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व, विचार या साऱ्या गोष्टी केवळ मेंदूवर अवलंबून असतात की परिस्थितीच्या संस्कारांवर, हा एक मोठा वादविषय होता. परिस्थितीमुळे माणसाचा स्वभाव बदलतो-घडतो की मेंदूही त्याला जबाबदार आहे, याच्या शोधातून आता बरीच माहिती हाती आली आहे. स्वभावाचा अभ्यास करणाऱ्या मनोवैज्ञानिकांना आता हे आढळून येऊ लागले आहे की हुषारी किंवा बुद्धिमत्ता, खेळाडू वृत्ती आणि सुंदर दिसणे यात जनुकांचा महत्त्वाचा सहभाग आहे. यातून स्वभावाचे जनुकशास्त्र (Behavior Genetics) उदयाला आले आहे.
स्वभावाला जनुके जबाबदार आहेत. आपल्या स्वभावाच्या काही घटकांबाबत आपला स्वभाव जन्मतःच ठरतो. म्हणजे आपले आई-वडील व पूर्वज यांच्यातले काही स्वभावघटक आपल्यात उतरतात. आक्रमकपणा, तासन्तास टीव्ही बघत बसणे, दिवसातून ठराविक संख्येने सिग्रेटी ओढणे, १० वीपर्यंत शिकू शकणे/न शकणे, गुन्हेगारी वर्तन, घटस्फोट वृत्ती हे त्यापैकी असलेले काही घटक. या घटकांचे जीन्स आहेत. स्वभावाच्या या तर्हांची जनुकीय मानसशास्त्रज्ञांनी तीन गटांत विभागणी केली आहे. वैचारिक क्षमतेचा एक गट आहे. त्यातील बुद्ध्यंक (IQ) हा घटक मोजला गेला. त्यासाठी दहा हजार जुळ्यांचा अभ्यास केला गेला. ५०% जुळ्यांत आनुवांशिकरीत्या बुद्ध्यंकांचा परस्पर संबंध आढळला. याउलट जी मुले दत्तक गेली होती त्यांचा बुद्ध्यंक दत्तक घेतलेल्या पालकांशी क्वचितच जुळला असेही आढळले.
भाषा हे विचारक्षमतेचे महत्त्वाचे साधन आहे. त्रिमितीय संवेदन हाही त्याचाच एक भाग. हे दोन्ही आनुवांशिक असल्याचे आढळले. प्रौढ वय झाल्यावर या क्षमता प्रकर्षाने दिसतात, व जन्मदात्या मात्यापित्याशी जुळतात. लहानपणी त्या फारशा दिसून येत नाहीत. याचा अर्थ परिस्थिती विचारक्षमतेवर फार कमी परिणाम करते. बुद्ध्यंक हा अनेक जनुकांवर अवलंबून असतो. म्हणून त्यास बहुजनुकीय (Polygenetic) म्हणतात. रॉबर्ट प्लोमिन नावाच्या जनुक संशोधकाने आपल्या व्यक्तिमत्त्वातील पाच घटक या दृष्टीने तपासले. मोकळेढाकळेपणा, सारासार विचार करणे, बहिर्मुखता, सहमती दर्शविण्याची वृत्ती आणि मानसिक विकार हे पाच घटक ५०% आनुवांशिक आढळले आहेत. मानसिक रोगांच्या बाबतीतही तेच. काही रोगांत आनुवांशिकता आढळली आहे. उदा. छिन्नमनस्कता किंवा स्क्रिझोफ्रेनिया हा रोग जवळच्या नात्यात संक्रमित होण्याची शक्यता आठपट असते. अतिकाळजी या रोगातील काही लक्षणे ७ ते ९% प्रमाणात विशिष्ट जीन्समुळे दिसून येतात असे आढळले आहे. हे जीन्स मेंदूतील एक सेरोटोनीन नावाचे रसायन असते त्याच्या पातळीवर परिणाम करतात. सेरोटोनीन रसायनाचे असंतुलन झाल्यास काळजी व त्यासारखे इतर रोग निर्माण होतात.
याचा अर्थ निव्वळ जीन्स स्वभाव घडवतात असे थेट म्हणता येणार नाही. असे असले तरी जीन्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे दिसत आहे. परिस्थितीचा परिणामही स्वभावावर होतोच. उदा. आईवडिलांपेक्षा आपले जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी यांचा परिणाम आपल्या वागणुकीवर होतोच. त्याचबरोबर अपघात, आजार आणि तीव्र आघात हेही स्वभावावर परिणाम करतात. जर जीन्स महत्त्वाचे घटक असतील तर परिस्थितीपेक्षा जीन्समध्ये बदल करणे मानवाच्या हातात आहे. अशा रीतीने जीन्समध्ये सुधारणा करणे नैतिक ठरेल काय ? जीन्समध्ये ढवळाढवळ करणे अनैसर्गिक होय असे एक मत आहे. जर 'सुपर बेबीज ' जन्माला आल्या तर त्या सामान्य माणसांना कसे वागवितील? गुलाम बनवितील काय? निरोगी शरीर ठेवणे हे तर निसर्गाला आव्हान दिल्यासारखंच म्हणायला हवे. मग यातून जीवशास्त्राच्या नितीमत्तेला सुरवात होते. हे बायोइथिक्स जर पाळले गेले नाही तर? असे अनेक प्रश्न नवनवीन शोध लागले तेव्हाही निर्माण केले गेले होते. शेवटी सामाजिक न्यायसंस्था यात महत्त्वाची ठरते.
नाझींनी पूर्वी ‘युजेनिक्स’ किंवा सुप्रजननशास्त्र नावाची संकल्पना मांडली. त्यातून ज्यू लोकांचा नायनाट आरंभला. त्यास जगभरातून कडवा प्रतिकार झाला. आता आले आहे तेही सुप्रजननशास्त्रच, पण विधायक दृष्टी घेऊन. विधायकता कोणती ? स्त्रियांना आपले मूल गंभीर रोगग्रस्त आढळले तर त्याचा गर्भपात करण्याची मुभा राहील. जे मूल नैसर्गिकरीत्या जन्माला येते ते कसेही असले तरी त्याचे प्रेमाने संगोपन करणारे पालक आज आहेत. त्यांचे प्रेम म्हणजे स्वयंस्फुर्त प्रेम (Unbidden love) होय. हे मागे पडत जाईल आणि सर्वोत्तम बाळ जन्माला घालून त्यावर प्रेम करणारे परिवर्तनीय प्रेम (Transformative love) पालक उदयास येतील.
हे जरी असले तरी पीजीडी तंत्रज्ञानाचा गैरवापर होणार नाही का ? अणुबाँबच्या संहारकतेचा धसका मानवजातीने घेतल्यावर माणसे शहाणी झाली. बहुसंख्य लोकांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदाच झाला आहे, मग ते मोबाईल असो वा अन्य काही. पीजीडीचाही माणसांस विधायक वापर करावा लागेल. नवीन पिढी निरोगी व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे पीजीडीच्या वापरास थोपविणेही शक्य नाही. बुद्धिमान आणि निरोगी मानसिकतेच्या पिढीसाठी या जनुकीय तंत्रज्ञानाचे स्वागत करणेच हिताचे ठरेल.
Thursday, 17 December 2020
"कोविड मुळे जगातील काही बदल "
"कोविड मुळे जगातील काही बदल "
Covid-19 नंतर जगात अनेक बदल होणार आहे हे निश्चितच. या बदलात 'वर्क फ्रॉम होम' चा समावेश आहे. हा नवीन ट्रेंड असून त्याचे परिणाम दीर्घकाळ दिसून येतील. जगात काम करण्याच्या पद्धती नेहमीसाठी बदलून जातील.
आयुष्य प्रथम आणि काम नंतर हा विचार सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीच्या मनात आला. आपले प्राधान्य बदललेले आहे ,म्हणून कामाला आपल्या आयुष्याच्या अवतीभोवती ठेवणं हाच पहिला मोठा बदल आहे. आपले जीवन हीच प्रथम प्रायॉरिटी आहे, हे गांभीर्याने सर्व लोकांनी प्रथमच घेतलं.
विविध मोठ्या कंपन्यातील लोकांना त्यांचे काम जगातील काही भागात नेण्यासाठी बराच कालावधी लागत होता. त्यासाठी रेल्वे, बस ,विमानसेवा अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीत लागत होता. अशा लोकांना वर्क फ्रॉम होम साठी वर्षातील अनेक अतिरिक्त दिवस मिळतील. तसेच विविध प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाच्या तासांची गणती न करता कामाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतील .म्हणजेच तुम्ही किती तास काम केले? यामुळे आता फरक पडणार नाही, तर तुम्ही केलेल्या कामातून काय मिळवले ?त्याचा काय परिणाम झाला? यावर लक्ष केंद्रित करून त्याचा मोबदला म्हणजेच पगार दिला जाईल. म्हणजेच आता कामाचे आठ तास किंवा शिफ्ट या गोष्टी कालबाह्य ठरतील. तुमच्या कामाच्या परिणामा वरून तुमचे मूल्यमापन केले जाईल व त्यातून तुम्हाला योग्य ती अर्थप्राप्ती होईल.
सर्व लहान_लहान गावात देखील चांगली प्रगती साधता येईल .कारण उत्तम शाळा व वेगवान इंटरनेट यासाठीच फक्त गुंतवणूक करावी लागेल. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील सर्वोत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन केव्हाही उपलब्ध होऊ शकेल. त्याचा फायदा लहान गावातील लहान शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला ही घेता येईल. त्यासाठी केवळ चांगल्या कॉलिटीच्या इंटरनेट सुविधा असणे गरजेचे राहील.
जगात बहुतांश लोक आता मास्कचा वापर करत आहेत. आपला कोविड पासून बचाव करण्यासाठी असो किंवा शासनाच्या दंडाच्या भीतीने असो परंतु सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मास्कची सक्ती झाल्यानंतर थोडाफार विरोध झाला पण तो होऊ नये .कोविडच्या प्रकोपामुळे 2020 वर्ष संपताना मास्क वापरण्याची सवय जडल्याने संपूर्ण जगात सर्व लोकांच्या वागण्यात एक अपेक्षित व योग्य बदल घडून आला आहे. आज जरी विविध देशातील संशोधनाने वेगवेगळ्या लसींचा शोध लागला आहे. त्यात यश आल्यानंतर काय बदल घडेल हे आज कोणालाही सांगता येणार नाही.परंतु अजून तरी काही काळ मास्क सर्वांना घालावाच लागेल यात तिळमात्र शंका नाही. तसेच लस उपलब्ध झाल्यावर देखील आपल्या भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचणे हे लस शोधण्यात इतकेच किंवा त्याहूनही अवघड काम आहे . म्हणून मास्क शिवाय पर्याय नाही. कोविड जागतिक महामारी ने मास्क ला या पृथ्वीतलावरील प्रत्येक देशातील प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनवून टाकले आहे. जसजसा मास्कचा वापर वेगाने वाढतो आहे त्यापेक्षाही त्याची जगभरातील बाजारपेठ देखील वाढेलच निर्विवाद आहे.
आज सर्वत्र विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. अनेक पर्याय गरजेनुसार वापरले जात आहे. त्यात प्रामुख्याने डिस्पोजेबल ,विविध स्तर असलेले, हवा फिल्टर करणारे मास्क, सुंदर डिझाईनचे कापडी धुतले जाणारे मास्क इ.विकत घेऊ शकतात. डिस्पोजेबल मास्टर घेतले तर एक मुख्य समस्या निर्माण होते ती म्हणजे वापर केल्यानंतर विल्हेवाट लावणे.जय योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली नाही तर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी वापरलेल्या मास्क मुळेच कोविंडचा प्रसार होऊ शकतो. म्हणून डिस्पोजेबल मास्क एकदाच वापरून योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावणे, तो नष्ट करणे गरजेचे आहे.सर्वसामान्यांसाठी सर्वात चांगला पर्याय धुतले जाणारे दुहेरी अस्तर असलेले कापडी मास्क हाच आहे. एकदा वापरल्यानंतर सर्फच्या पाण्यात धुवून , सुकवून , इस्त्री करून पुन्हा वापरावा. आपणा स्वतःला आणि दुसऱ्यांनाही वाचवण्यासाठी मास्क वापरला पाहिजे आणि कोविंडचा संसर्ग रोखण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. आज मास्क घालण्यात स्वतःच्या हिता बरोबरच आपण सामजिक दृष्ट्या जबाबदार आहोत . केवळ मास्क वापरणे सक्तीचे आहे किंवा दंड टाळण्यासाठी तो वापरत आहोत असे न करता स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मास्क वापरावा.
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदुरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
Wednesday, 16 December 2020
Different Diseases
💉💉 Different disease💊💊
💊deficiency of RBC cause...
👉 Anaemina
💊deficiency of vitamin D cause...
👉Rickets
💊deficiency of vitamin C cause....
👉scurvy
💊deficiency of calcium & pasporous caused. ..
👉Rickets
💊parkinson is a disease of ....
👉Brain
💊Beri Beri disease is caused by...
👉used of milled rice
💊lake of vitamin B1(thiamin) caused...
👉Beri Beri
💊 Diabetes is the decreased secretion of ....
👉insulin
💊Amnesia is a disease related to....
👉loss of memory
💊Malaria is a disease which affects. ...
👉spleen
💊muscular & nervous disorder is due to the lake of....
👉vitamin E
💊lake of vitamin A caused....
👉sightblindness
💊lake of vitamin D caused. ...
👉Rickets
💊lake of vitamin K caused....
👉hemophilia
💊lake of vitamin E caused....
👉sterility
💊The vitamin capable of formation of blood is....
👉 vitamin C
💊citrus fruit are considered rich source of vitamin....
👉 vitamin C
💊The only vitamin which cannot be stored in human body is....
👉 Vitamin C
💊The only vitamin which is not fat soulable is....
👉vitamin C
💊The vitamin which is generally excreted by human in urain is....
👉 vitamin C
💊💊💊💊💊
#Biological____Science
1.What is the chemical name of Vitamin E?
🅰️Alpha tocopherol
2. Which Vitamin is also known as retinol?
🅰️Vitamin A
3. What is Calciferol?
🅰️Vitamin D
4. What is the other name of thiamine?
🅰️Vitamin B1
5. Which Vitamin is called niacin?
🅰️Vitamin B3
6. Which element is excreted through human sweat?
🅰️Sulphur
7. Pollution of water bodies by which element causes Minamata disease?
🅰️Mercury
8. Accumulation of which chemical leads to kidney stones?
🅰️Calcium Oxalate
9. Which heavy metal causes Itai Itai disease?
🅰️Cadmium
10. Which chemical was used earlier for giving anesthesia to patients?
🅰️Diethyl ether
11. Who is honored as Father of Modern Chemistry?
🅰️Antoine Lavoisier
12. Who invented periodic table?
🅰️Dmitri Mendeleev
13. Which is the most abundant gas in the earth's atmosphere?
🅰️Nitrogen (78.08%)
14. Which gas evolved from paddy fields and marshes?
🅰️Methane
15. Which toxic element present in automobile exhausts?
🅰️Lead
16. Which gases cause acid rain?
🅰️Sulphur dioxide, Nitrogen oxides
17. Which metal is used in the making of microchips?
🅰️Silicon
18. What is the toxicity caused by silicon called?
🅰️Silicosis
19. Which polymer is used to manufacture electric switches, computer disks etc.?
🅰️Bakelite
20. With which polymer, the cabinets of radio and TV made of?
🅰️Polystyrene
21. Which chemical is used to make rain coats?
🅰️Poly Vinyl Chloride(PVC)
22. Which type of plastics can be recycled?
🅰️Thermoplastics
23. What is the name given to plastics that cannot be recycled?
🅰️Thermosetting plastics
24. Which element is a liquid at ordinary temperature?
🅰️Mercury
25. What is the chemical name of baking soda?
🅰️Sodium bicarbonate
26. What is sodium carbonate commonly known as?
🅰️Washing soda or soda ash
27. What is sodium chloride?
🅰️Table salt
28 What is table sugar?
🅰️Cane sugar (Sucrose)
29. What is the element present on lead pencils?
🅰️Carbon (graphite)
30. Which gas is found in soda water?
🅰️Co2•┄═<<❁
Sunday, 29 November 2020
डॉ. जगदीशचंद्र बोस- थोर वैज्ञानिक
*🌸जगदीशचंद्र बोस🌸*
*भारतीय भौतिकीविज्ञान व वनस्पती शरीरक्रिया*
*जन्मदिन - ३० नोव्हेंबर १८५८*
बोस, सर जगदीशचंद्र : (३० नोव्हेंबर १८५८- २३ नोव्हेंबर १९३७). भारतीय भौतिकीविज्ञ व वनस्पती शरीरक्रिया- वैज्ञानिक. वनस्पतींच्या वृद्धीचे व प्रकाश, विद्युत्, स्पर्श यांसारख्या बाह्य उद्दीपनांना मिळणाऱ्या वनस्पतींच्या प्रतिसादांचे मापन करण्याकरिता त्यांनी केलेल्या आद्य कार्याकरिता जगप्रसिद्ध.
बोस यांचा जन्म बंगालमधील (आता बांगला देशातील) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण
सर जगदीशचंद्र बोससर जगदीशचंद्र बोस
कलकत्ता येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये झाले. कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळविल्यानंतर ते वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी लंडन विद्यापीठात गेले. तथापि शिष्यवृत्ती मिळाल्याने ते केंब्रिज विद्यापीठात निसर्गविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता गेले. तेथे लॉर्ड रॅली या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळाला. १८८४ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यानंतर १८८५ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. या पदावर नेमणूक होणारे ते पहिलेच भारतीय असल्यामुळे सुरुवातीला त्यांना वर्णभेदाला तोंड द्यावे लागले; पण काही वर्षांनंतर त्यांची योग्यता ओळखल्यावर असामान्य शास्त्रज्ञांत त्यांची गणना होऊ लागली. १९१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर कलकत्ता विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१७ साली कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था स्थापन केली आणि मृत्यूपावेतो तिचे संचालक म्हणून त्यांनी काम केले.
बोस यांनी १८९५ मध्ये अतिशय लघू तरंगलांबी असलेल्या रेडिओ तरंगांच्या प्रकाशसदृश गुणधर्मांसंबंधी [प्रणमन व ध्रुवण; ⟶ प्रकाशकी] काटेकोर प्रयोग केले व त्यामुळे त्यांची किर्ती सर्वत्र पसरली. विद्युत् ऊर्जा प्रेषणासंबंधी त्यांनी केलेले कार्य जे. सी. मॅक्सवेल व एच्. आर्.हर्ट्झ यांच्या कार्याचा विस्तार करणारे होते. या कार्यातून रेडिओ संदेशवहनाच्या शक्यतेत त्यांना रस निर्माण झाला आणि त्यांनी याबाबत केलेले काही प्रयोग एम्.जी. मार्कोनी यांच्या प्रयोगांशी समकालीनही होते. १८९५ मध्ये त्यांनी कलकत्त्यात रेडिओ संदेशवहनाचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते, असे म्हटले जाते. या प्रयत्नांतून त्यांनी त्या काळी रेडिओ तरंगांच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) वापरण्यात येणाऱ्या लोहचूर्णयुक्त नलिकाकार उपकरणात सुधारणा केल्या. या सुधारणा ⇨घन अवस्था भौतिकीच्या विकासात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
काही अजव पदार्थ विविध उद्दीपनांना देत असलेल्या प्रतिसादांचे जैव प्रतिसादांशी असलेले साम्य बोस यांच्या लक्षात आले. या निरीक्षणावरून प्राणी व वनस्पती यांच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांच्या) वर्तनांची तुलना करण्याकडे त्यांचे लक्ष ओढले गेले आणि उर्वरित आयुष्यात त्यांनी याच्याच अभ्यासावर विशेष भर दिला. त्यांनी या विषयावर लिहिलेल्या निबंधांना व दिलेल्या व्याख्यानांना व्यापक मान्यता मात्र मिळाली नाही. १९०१ मध्ये व १९०४ मध्ये त्यांन लंडनच्या रॉयल सोसायटीला सादर केलेले या विषयावरील निबंध स्वीकारण्यात आले नाहीत. याचे अंशतः कारण म्हणजे त्यांनी या निबंधात विषयाचे तत्त्वज्ञानात्मक विवरण केलेले होते. तथापि वनस्पतींच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी योजलेल्या वनस्पतींच्या अतिसूक्ष्म हालचालींची नोंद करणाऱ्या अतिशय संवेदनशील स्वयंचलित उपकरणांबद्दल आणि या उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी विविध उद्दीपनांमुळे होणाऱ्या वनस्पतींतील सूक्ष्म बदलांविषयी सातत्याने जमा केलेल्या माहितीबद्दल त्यांची किर्ती जगभर पसरली. वनस्पतींच्या वाढीचे एक कोटी पट विवर्धन करू शकणारे क्रेस्कोग्राफ हे स्वयंचलित उपकरण त्यांनी तयार केले होते. या उपकरणाच्या साहाय्याने बोस यांनी वनस्पतींनाही संवेदनाग्रहणक्षमता (उदा., इजा झालेल्या वनस्पतींचे थरथरणे) असते, असे प्रयोगांनी दाखवून दिले. यावरून आधुनिक जीवभौतिकीविज्ञांना आता आढळलेल्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या ऊतकांतील संवेदनाग्रहणातील साम्यासंबंधी बोस यांना अगोदरच अंदाज आलेला होता, असे दिसून येते.
केंब्रिज विद्यापीठाने त्यांना १८९६ मध्ये सन्माननीय डी.एस्सी. पदवी दिली व रॉयल सोसायटीने त्यांना १९२० मध्ये सदस्यत्व बहाल केले. ब्रिटिश सरकारने १९१७ साली त्यांना ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी युरोप व अमेरिकेत दौरे करून अनेक व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग (१९०२), प्लँट रिस्पॉन्स ॲज ए मीन्स ऑफ फिजिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन (१९०६), द मोटर मेकॅनिझम ऑफ प्लँट्स (१९२८) वगैरे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचे संशोधनपर निबंध कलेक्टेड फिजिकल पेपर्स या शीर्षकाखाली त्यांनीच स्वतः संकलित करून १९२७ मध्ये प्रसिद्ध केले. ते अतिशय देशाभिमानी होते व भारतीयांनी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेत वैज्ञानिक संशोधन करून भर घालावी, अशी त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठात आणि नंतर बोस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाला अतिशय प्रोत्साहन दिले. ते बंगालमधील (आता बिहारमधील) गिरिडी येथे मृत्यू पावले.
*======================
Subscribe to:
Posts (Atom)
Project Report on Viral Diseases
Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...
-
11th Science. Subject- Biology Chapter 1.Living World. 1.1 Basic principles of life. A. The living being once produced / born has c to survi...
-
Project Report on Heart / Heart Beat This project report is entitled "Heart" and all information about Heart, Heart Beat, Internal...
-
What is Klinefelter syndrome? A typical male has a total of 46 chromosomes (packages of DNA) – one copy of an X chromosome and one copy of t...